Login

मन झाले विरागी भाग तीन

. ऑफिस मध्ये हळूहळू बातमी पसरली. मीनल ने तिला एकट्यात विचारले तेव्हा मात्र नयनाच्या मनाचा बांध फुटला. मीनल च्या गळ्यात पडून तिने मन मोकळे केले. " सुख मला अशी हुलकावणी का देते, ज्या सुखा साठी मी अविनाश ना सोडले, ते सुख मला नीरज ने दिले पण ते क्षणभंगुर ठरले. माझी ओंजळ परत रिकामीच राहिली. मी इकडची ना तिकडची राहिले""अगं पण त्यांना कां तू सोडते"नीरज मना नी माझ्यापासून दूर गेलेत हे मला जाणवले. त्यांनाबांधून ठेवण्या इतका मजबूत रेशीम धागा माझ्याजवळ नाही ,तेव्हा त्यांना मोकळे करणे हाच पर्याय माझ्यापाशी आहे.---------------------------------------

मन झाले विरागी( भाग तीन)


आठ दिवस उटि ला फिरून नयना आणि नीरज दोघे परत कामावर रुजू झाले. हे आठ दिवस किती लवकर गेले कळलेच नाही. नयना नीरज च्या प्रेमात चिंबचिंब भिजून पूर्ण उमललेल्या फुलागत मोहक सुंदर दिसत होती.
ऑफिस मध्ये पोहोचल्या वर मीनल हळूच जवळ येऊन कुजबुजली " दृष्ट काढायला हवी तुझी"
एक महिना सरता सरता नीरज ने त्याची ट्रान्सफर जुन्या ब्रांच मध्ये झाल्याची बातमी दिली. प्रमोशन असल्याने नयना ने ते सहज स्वीकारले, या नव्या घरापासून तिचे ऑफिस खूपच जवळ होते त्यामुळे तिला नीरज साठी बराच वेळ काढता येई, त्याच्या आवडी निवडी, बरोबर फिरणे, संध्याकाळी किंवा रात्री लॉंग ड्राईव्ह सर्व स्वप्नात असल्यासारखे अनुभवत होती ती.
नीरजहळूहळू बिझी होत गेले असे सहा महिने भुर्रकन गेले. तरीही दोघे खूप आनंदात होते पण-- या सर्व सुखाला अचानक कुणाचीतरी नजर लागली. भरतीनंतर ची ओहटी सुरू झाली.
नयनाला मेनोपॉज चा त्रास सुरू झाला. लेडी डॉक्टर ला दाखवून काही औषधे घेऊन झाली. काही महिने त्यामुळे ठीकठाक गेले पण परत तक्रार सुरू झाली ऑफिसमधून ही तिने सुट्टी घेतली असे मधून मधून होत होते.
एक दिवस ऑफिस मध्ये बॉस ने विचारले "आज काल तुम्ही पार्टीला नसता मिस्टर एकटेच असतात ?
नयना ने तब्येतीचे कारण पुढे केले ,पण खरेतर तिला या पार्टीचे काहीच माहीत नव्हते. तिने नीरज जवळ विचारणा केली. त्यांनी "तुला बरे नसल्याने नाही विचारले" असे म्हणून वेळ मारून नेली.
नयना मनातून दुखावली, नीरज आपल्यापासून दुरावतो या कल्पनेने ती सावध झाली नीरज च्या मर्जीनुसार वागून त्यांच्या आवडीप्रमाणे त्याला खुश ठेवायचा प्रयत्न करू लागली.
लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले ते दोघं सुट्टी घेऊन फिरायला महाबळेश्वरला गेले, नयना खूपच उत्साहात होती. पण परत येताच तिच्या उत्साहावर पाणी पडले नीरज ना कंपनी दोनमहिन्यासाठी जर्मनीला पाठवत होती.
नीरज साठी हे सर्व नवीन नव्हते मागे बर्‍याच कंपन्यांच्या कामासाठी त्यांनी विदेश दौरे केले होते .
नयनाला सुट्टी घेणे शक्य नव्हते व सध्या तिची तब्येत ही ठीक नव्हती, त्यामुळे हे दोन महिने तिला एकटे पण सहन करणे भाग होते.
ती व नीरज रोज व्हिडीओ कॉलिंग करून बोलून घेत होते पण कधीकधी दोघांच्या वेळा जमत नसत दोन महिने असेच गेले नीरजच्या येण्याची तारीख जवळ आली.
नयनाने त्यांच्या स्वागताची तयारी केली.
नीरज आले, ते श्रावणातल्या मेघा सारखे, थोडे बरसले नी निघून गेले परत दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर. नयनाला काहीही कल्पना न देता.

कुठेतरी काहीतरी चुकतय असे नयनाला आतून जाणवत होते." मुठ्ठि जितकी घट्ट करावी वाळू तितकीच जास्त हातातून निसटून चाललीये व हातात काहीच उरत नाहीये".
ज्या नीरज सोबत घरटे बांधून तिने संसार करायची स्वप्न पाहिले तो तर प्रवासी पक्षी निघाला, तिला एकटे टाकून तिचा हंस उडून गेला ,परत कधी येईल किंवा नाही व आल्यावरही त्याला स्वतःमध्ये किती काळ गुंतवून ठेवू शकते? शेवटी शरीराचे ऋतुचक्र आपल्या हातात नाहीं हे आतून जाणवू लागले.
.
ज्या कारणास्तव तिने अविनाश ला दुखावले तेच सत्य आता तिच्यासमोर उभे होते, पण या वेळेस गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात ती उभी होती.
नीरजला तिने विचारले, तेव्हा मग ते स्पष्ट बोलले, ते तिच्यासाठी स्वतःचं करिअर , Spoil नाही करू शकत एकाच जागी फार दिवस राहण्याचा त्यांचा स्वभावही नाही, सत्य समोर आले तेव्हा मग नयनाने स्वतः आपणच त्यांना मोकळे करावे असा निर्णय घेतला.
आता आपल्याला एकट्याने आयुष्य काढायचे या कल्पनेने तिच्या मनाचा तोल सुटत होता.
नीरज ने घर नयना च्या नावाने केले होते, आर्थिक काळजी नव्हती पण, आपण हरलो या भावनेने ति खचली
. ऑफिस मध्ये हळूहळू बातमी पसरली. मीनल ने तिला एकट्यात विचारले तेव्हा मात्र नयनाच्या मनाचा बांध फुटला. मीनल च्या गळ्यात पडून तिने मन मोकळे केले.
" सुख मला अशी हुलकावणी का देते, ज्या सुखा साठी मी अविनाश ना सोडले, ते सुख मला नीरज ने दिले पण ते क्षणभंगुर ठरले. माझी ओंजळ परत रिकामीच राहिली. मी इकडची ना तिकडची राहिले"
"अगं पण त्यांना कां तू सोडते"नीरज मना नी माझ्यापासून दूर गेलेत हे मला जाणवले. त्यांनाबांधून ठेवण्या इतका मजबूत रेशीम धागा माझ्याजवळ नाही ,तेव्हा त्यांना मोकळे करणे हाच पर्याय माझ्यापाशी आहे.
"पण मग आता "?
अविनाश कडे परतण्याचा मार्ग मी स्वतः बंद केला. पुढचे अजून काहीच ठरवले नाही.


पुढचे काही दिवस नयनाने सुट्टी घेतली. नीरज चे हे मोठे घर सोडून दोन खोल्यांचे छोटे घर भाड्याने घेऊन मोजके सामान घेते या घरात शिफ्ट झाली.
ते घर , त्या सुखद आठवणीं पासून दूर जाण्याचा हा एक असफल प्रयत्न होता.
-क्रमश:
---------------------------------------