# कादंबरी – मानसी # भाग ५

this part is about is manasi will get new direction

                                                              # कादंबरी – मानसी # भाग  ५

                                                   भाग  ५   मानसीला  मिळेल का  नवी दिशा

मानसी आज बऱ्याच दिवसांनी घरात रिकामी होती.आज काय करावं तेच तिला कळत नव्हते . जॉब ला जाणऱ्या मुलीला जर अचानक अस घरी बसायची वेळ आली तर तिला ते फारच कठीण जाते .सकाळची आंघोळ ,नाश्ता उरकून बघते तर सकाळचे ९ वाजलेत . दिवस जाणार कसा ?काय करावं तेच तिला कळेना .

आई ला हे सगळं कळत होत .मानसी मनातून खूप  अस्वस्थ आहे हे तिला चांगलेच जाणवत होते .मानसीच मन  लवकरात लवकर  कुठे  तरी गुंतवणे फार गरजेचं होत .

आई ने तिला सांगितले "मानसी अग आज दारापुढे मोठी रांगोळी काढतेस का?संध्याकाळी माझ्या भिशीच्या बायका येणार आहेत . "

रांगोळी काढायला मानसीला खुप आवडते हे आईला चांगलेच माहित होते .

मानसीं पण एकही क्षण वाया न घालवता रांगोळीची पिशवी काढून दारापुढे रांगोळी काढायला बसली . आईला

पण मनातून बरं वाटलं . आता १ तास तरी ती यात रमेल . एकटी बसली कि तिला लगेच मनात विचार सुरु होतील .तिला बिझी ठेवणे फार गरजेचे होते

आपण म्हणतो ना आई ला आपल्या लेकराला झालेल्या दुःख ची झळ न सांगताच कळते .नुसत्या आवाजावरून तिला कळते कि काहीतरी बिनसलंय . मानसी च्या डोळ्यात तिला हे साफ दिसत होते . घर जरी तिच्या पैशावर अवलंबून नसले तरी तिच्या भवितव्यासाठी तिचा जॉब महत्वाचा होता . आणि आज काल एक प्रॉब्लेम असा आहे लोकांना  तुमच्या घरत काय चाललेय यामध्ये पण खूप इंटरेस्ट असतो. मानसी च्या आईला पण कुठे ना कुठे तरी हे प्रश्न भडसावंत होते . अचानक मुलगी घरी का बसली ? अचानक जॉब का सोडला?तब्बेतीची कारण सांगावे तर एवढं काय झालय तरुण मुलीला ?लग्नाचं बघावं तरी पहिला प्रश्न मुलगी काय करते ? एवढे शिकून घरी का ठेवलय ?आज एक दिवस कोणी काही विचारणार नाही पण उदया जर घरात दिसली तर लगेच प्रश्न सुरु होतील . त्या आधी आपण तयार असलो पाहिजे आणि त्या आधी मानसीला पण तयार केली पाहिजे यासगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी.

बोल बोलता खूप सुंदर, सुरेख अशी रांगोळी मानसीने दारापुढे काढली . तिचा   रांगोळीवर इतका छान हातखंडा होता कि असे वाटेल जादू आहे बोटांमध्ये .

रांगोळी झाल्यावर मानसीने आई ला हाक मारली

" आई बघ ग कशी आलीय ?आवडली का?"

आई अरे वाह! किती छान ! मस्तच !

मानसी पण खुश झाली रांगोळी पाहून . तेवढ्यात मोठं मोठ्याने ओरडण्याचा आवाज समोरच्या घरातून येऊ लागला . सामोर्च्यांची राजू ला तिची  आई मारण्यासाठी  हात उचलला कि ती आधीच ओरडत होती. आणि इतक्या जोरात ओरडायची कि एखाद्याला वाटेल आई किती मारतेय . हे सर्वांना माहीतच झालं होत.

मानसी ची आई राजू ला तिच्या आई पासून वाचवायला मध्ये पडायची .

नेहमी प्रमाणे  मानसी ची आई तिकडे गेली

राजुची आई " बघ ना वाहिनी . किती ओरडतेय अजून एकही फटका नाही मारला

कार्टी अजिबात अभ्यास करायला मागत नाही "

मानसी ची आई राजुला " राजू  अग  असं का करतेस बाळा , असा त्रास नाही द्यायचा आईला , शाळेत जातेस ना मग अभ्यास नको का करायला . असा सारखा सारखा मार  खाण  बरं  आहे का?"

राजू ची आई " अहो वहिनी खूप लाड झाले हिचे तिला  अजिबात अभ्यासाचे  महत्व राहिले नाही . आज मी तिला जेवायला देणार नाहीये .सारखं आपलं खेळ खेळ चालू असतं "

"तुमची मानसी बघा किती शांत आहे . छान अभ्यास केला ,आता छान नोकरी पण करते . वेळ अली कि घरात मदत करते . छान सर्वांशी हसून बोलून असते . आता बघा किती छान सुरेख रांगोळी काढलीय तिने "

"मानसी मला पण शिकव ग तुला वेळ असेल तेव्हा "

मानसी " हो काकू नक्की ."

मानसी ची आई आणि राजुची आई गप्पा मारत आहेत ह्याचा फायदा राजुने घेतला . ती तिथून पळाली आणि मानसी जवळ रांगोळीपाशी येऊन बसली. नि बघू लागली  मानसी कशी  रांगोळी काढतेय कसे रंग भरतेय .आणि मध्ये विचारू लागली " मी मदत करू का ?"

मानसी म्हणाली "राजू तुझा होमवर्क झाला का? तुझी आता परीक्षा जवळ आलीय तू अभ्यास का करत नाहीस ग ?"

"अग ताई मला ना बाई काय शिकवतात ते काही कळतच नाही . मग कसा होमवर्क करणार . आणि होमवोर्क नाही केला म्हणून मला रोज शिक्षा पण करतात बाई . काल  तर आईला बोलावून घेतले बाईंनी . म्हणून तर आई आज जरा जास्तच चिडलीय .

मुलांचं कसं असत ना मनातलं पटकन बोलून जातात . तिचा काय प्रॉब्लेम आहे हे राजू ने लगेच सांगून टाकला . आता काय सोल्युशन  काढायचं ते तुम्ही ठरवा .

मनात विचार साठले कि मनाचं पण डबकं तयार होत . मनात आहे ते बोललं कि वाहत्या पाण्याच्या झाऱ्या सारखं खळखळत राहत.

मानसी  ला  पण एकदम गहिवरून आलं . लहान मूल किती निरागस असतात ना . अर्थात राजू काही आता लहान राहिली नव्हती चांगली ९ वीत होती . पण अंगातील मस्ती काय कमी झाली नव्हती . अभ्यासात काही इंटरेस्ट च नव्हता वाटत . का ती खरोखरच प्रॉब्लेम मध्य होती . एखाद्याला सारखं सारखं रागावले. ,मारले आणि म्हटले कि तू मूर्ख आहेस तर एक दिवस त्याला पण असे वाटायला लागत कि आपण मूर्ख आहोत

तसाच काहीसं झालं होत राजुच       

मानसीला काय वाटलं काय माहित ती राजुला म्हणाली "मी घेऊ का तुझा अभ्यास ?

राजुला इतका आनंद  झाला पटकन उठली आणि दप्तर आणायला पळाली घरात .

मानसीची रांगोळी काढून झाली होती ती रांगोळीच्या आजू बाजूच्या वस्तू उचलत होती तोपर्यंत राजू दप्तर घेऊन हजर

तिला अभ्यास मध्ये एवढा इंटरेस्ट आहे हे बहुदा तिला सुद्धा माहित नसेल . मानसीने हात धुतले आणि तिला म्हणाली "मी आलेच फ्रेश  होऊन तो पर्यंत तू तुझा होमवर्क ची वही काढ .बघू काय कळले नाही ते . मला आलं तर तुला समजावून सांगितले"

मानसीची आई आणि राजुची आई दोघी पाहत होत्या दोघींकडे काय चाललंय ते चालू दे

तोपर्यंत मानसीच्या आई ने राजू च्या आई ला

सांगितले  "मानसीने जॉब सोडलाय  .. आता दुसरा मिळे पर्यंत घरीच असेल . मीच म्हटले थोडा आराम पण होईल .जॉब काय काय मिळेल परत ."

राजू ची आई पण म्हणाली " हो का अच्छा .. बरं आहे हो एकदा लग्न झालं कि कसला आलाय आराम मुलींना "

आणि दोघी आपापल्या कामाला लागल्या .

इकडे मानसी ची स्टुडन्ट अभ्यासात खूपच मागे राहिली होती तिला साधा २ चा पाढा पण बोलता येत नव्हता . मग कस काय गणित सोडवणार ती .

मानसी ने आजचा अभ्यास काय आहे तो समजून घेऊन तिला जमेल तस तिला समजावलं आणि करून घेतला

तोपर्यंत राजूची शाळेत जाण्याची वेळ झाली तर ती घरी गेली .

दुपारी बाबांचा फोन आला .” काय करताय दोघी माय  लेकी . “

मानसी ची आई "काही  नाही हो,माझं आपलं काम चालू आहे . मानसी ने छान मोठी रांगोळी काढलीय . संध्याकाळी आमची भिशी आहे ना म्हणून आणि राजुचा अभ्यास घेत बसली होती टाइम पास म्हणून . आता बसलीय t.v. बघत .

बाबा : ओके , अग तुला सांगायला विसरलो तिच्यासाठी छान दोन पुस्तके काढून ठेवलीत .तिला सांग माझ्या टेबलावरून घ्यायला .

आई "थांबा तिच्याकडेच देते फोन "

बाबा "हॅलो मानसी . झाला का नाश्ता वगैरे

मानसी "हो बाबा "

बाबा "मग आजच काय प्लांनिंग आहे ?

मानसी "काही नाही , आईची भिशी आहे तर थोडी मदत करेन तिला .. बाकी काही नाही .

बाबा "अग  माझ्या डेस्क वर दोन छान पुस्तके काढून ठेवली आहेत बघ तुला आवडतील

मानसी "हो चालेल बाबा वाचीन मी "

बाबा "ओक बाय "

बाबांचं पण सगळं लक्ष मानसिकडे होतं .जे झालं ते फार वाईट झालं . जॉब काय मिळेल . असलेला जॉब अशा पद्धतीने जाणे यामुळे कॉन्फिडन्स जाऊ शकतो . यातून बाहेर  नाही पडली तर डिप्रेशन येऊ शकते . त्यामुळे तिला छान छान बुक्स वाचायला त्यांनी काढून ठेवली .

🎭 Series Post

View all