# कादंबरी – मानसी # भाग ३ मानसीचा निर्णय
मानसी मोठ्या आत्मविश्वासाने बॉस च्या केबिन कडे गेली
सर may I come in ?
यस मिस मानसी "आप गयी नहीं अभी तक ?
सर दो मिनट बात करनी थी ।
अच्छा चलो आ जाओ । बोलो
"सर मैने decide किया है मैं वो डिपार्टमेंट मी काम नहीं करुंगी ।"
बॉस ला आता थोडा राग आला होता तोही त्याचा स्वर change करत
नहीं करुंगी मतलब ?
"सर आज दो केक ऑर्डर किजीये ।"
आत्ता तर त्याची चांगलीच सटकली .
"मिस मानसी आप कह ना क्या चाहती है ?"
"सर मैं भी जॉब छोड राही हू यांनी मुझे जॉब छोडना पडेगा । सर वो डिपार्टमेंट में जॉब नहीं करुंगी । अगर आप लोग जबरदस्ती करोगे तो मैं जॉब छोड दूंगी |”
बॉस बोलला " सोच लो मानसी अच्छी खासी जॉब छोडने कि बात कर रही हो "
बॉस ला पण आता वैताग आला होता सकाळ पासून तेच तेच बोलतॊय . actually त्याच्या दृष्टीने तो एक सिम्पल decision होता एका डिपार्टमेंट ची मुलगी सोडून चाललीय तर तिथे नवीन मुलगी काम नाही करू शकत तिथे कंपनी बद्दल माहिती असलेली मुलगी पाहिजे होतीं आणि ह्या टीम मध्ये खूप मुली होत्या .सो त्याने टीम लीडर कडून एक स्टाफ मागीतला.
टीम लीडर ला मानसी पासून काय प्रॉब्लेम होता काय माहिती पण तिने मानसी चे नाव दिल्यामुळे हे सगळं घडलं. बॉसच्या दृष्टीने मानसी रिजिड झालीय आणि ऐकत नाहीये . टीम लीडर ला टीम मध्ये मानसी नकोय .मानसीला डिपार्टमेंट change करायचे नाहीये . आणि सोनाली सोडून चाललीय तिची रिप्लेसमेंट काही सापडत नाहीये.
हा सगळा गुंता सुटत नाहीये .
बॉस मानसीला म्हणाला " तुम एक काम करो थोडे दिन वहा काम करो फिर मैं तुम्हे फिर यहा बुलाता हूं ।"
"नहीं सर एक बार शिफ्ट हो गयी फिर कुछ नही होगा ।मैं एक दिन भी वहा पर काम नहीं करुंगी "
"ठीक है जो तुम ठीक समजो " बॉस रागात बोलला आणि कामात व्यस्त आहे दाखवू लागला.
मानसी केबिन मधून बाहेर आली resignation type करायला लागली
नेक्स्ट १०मिनटात प्रिंटाऊट घेऊन signature करून बॉस ला द्यायला गेली .
बॉस ने resignation घेतला. बॉस ने रेसिग्नशन लेटर घेतले आणि काहीही बोलला नाही .जणू त्याने ते accept केले.
मानसी पण काही बोलली नहि .तिला जे बोलायचे होते ते तिने क्लिअर कट सांगितले होते . आज तिला कोणाला बाय बोलण्यात पण इंटरेस्ट वाटेना . वाईट तर वाटच होत . ज्या ऑफिस मध्ये आपण मन लावून काम करतो त्या ऑफिस मध्ये अचानक आपण इतके परके होऊ शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला जॉब सोडायला लागू शकते असे तिला वाटले पण नव्हते . सकाळी निघताना किती आनन्दाने ती घरातून निघाली होती . एका मिनिटात स्वतःची स्वप्न मोडल्या सारखी वाटू लागली होती . या मार्च एन्ड ला तिचे एक प्रोमोशन पण due होते . आणि फक्त १५ दिवस आधी आपल्या सोबत हे असे घडले .
जॉब सोडण्या शिवाय काही पर्यायच नव्हता . मुळात तिला ज्या ऑफिस मध्ये शिफ्ट करत होते ते ऑफिस लोकेशन आणि हे ऑफिस च लोकशन मध्ये खूप फरक होता . तिथे एकही लेडीज स्टाफ नव्हता . कधी कधी तिथे आजू बाजूला मोठं मोठी भांडणे व्हायची . माल उतरवणे , चढवणे अशी काम पण तिथूनच व्हायची .त्यामुळे बाहेरच्या राज्यामधले ड्राइवर ची ये जा असायची . तिकडे शिफ्ट होणे म्हणजे लेडीज साठी स्वतःची life कायम अडचणीत टाकल्या सारखी होती . काय करायचंय असला पगार असे म्हणायची वेळ आली असती . सो तिथे काम करण शक्यच नव्हते . सोनाली ने काम कस केले तिलाच माहित . मानसीला माहित होत तिथे ती काम करूच शकत नाही .त्यापेक्षा जॉब सोडणे केव्हावी चांगले .
मानसी घरी जायला निघाली .
तेवढ्यात टीम लीडर आली असं अचानक जॉब सोडून तू जाऊ नाही शकत . तुला एक महिन्याची नोटीस द्यावी लागेल
आत्ता मात्र मानसीची सटकली "oh ! Really .if you have any issues you can talk to boss!!
मानसी ने बॅग उचलली आणि तरातरा ऑफिस च्या बाहेर पडली ...
तेवढयात ऑफिस बॉय मागून धावत आला
मॅडम !मॅडम !तुम्हाला सर बोलवत आहेत .
आता काय झालं ? आता परत का बोलावत आहेत?आता मानसीला पण थकवा जाणवत होता .बहुदा ताप यायला लागला होता .बिचारीची दिवसभर खुपच वणवण झाली होती .
पुन्हा वरती जायचं बॉस च्या केबिन मध्ये जायचं ? तिने आता कुठे मनाने ठरवले होतं आता हे लोक पुन्हा काहीतरी ऑपशन्स काढणार जो कि तिला मान्य नसणार .आणि त्याला तिने रिजेक्ट केले म्हणून शेवटी तिचं नाव खराब होणार . बाकीचे सर्व फुकट तमाशा बघत आहेतच .ती चाललीय म्हणून काहींना आनंद होताना दिसतोय. कोणाला दुःख होतंय . आणि आपण एकमेव टार्गेट झालो आहोत हि भावना मानसीला फार त्रास देत होती . इतके वर्ष एका कंपनीत काम केल्यानंतर अचानक अश्या पद्धतीने जॉब सोडणे हि काय सोप्पी गोष्ट नव्हती . मनात अश्रुंचे काळे ढग दाटून आलेले आहेत .तेहि कोसळण्या साठी संधी शोधत आहेत . अशात पुन्हा मागे जाणे म्हणजे कठीण काम होऊन बसले होते .पण तरीही बॉस ने बोलावलंय म्हटल्यावर जाणे भागच होते . जेवढी तरातरा ती गेली होती तेवढीच जड पावलाने ती मागे वळली .
बॉस ला पण जरा कसतरी वाटले हिने इतक्या तडकाफडकी जॉब सोडून जायला निघाली . afterall ती एक चांगली employee होती. आणि मुख्य म्हणजे गुणी मुलगी होती . बॉस ला पण काय करावे सुचत नव्हते . हा मॅटर इतका पुढे वाढेल अस विचार पण त्याने केला नसेल . त्याच्या दृष्टीने मानसी पटकन तयार होईल असच वाटलं होतं . मानसी ला कसं retain करता येईल या कडे तो पाहू लागला .
मानसी ची स्वारी पुन्हा कॅबिन मध्ये आली .या वेळी मानसी बरोबर टीम लीडर ला पण बॉस ने बोलावून घेतले .
टीम लीडर सांगू लागली तिला सांगू लागली कि अग मानसी ह्यात तुझा फायदाच आहे तिकडे तुझं रिपोर्टींग डायरेक्ट बॉस च्या अंडर असेल .तुझ्या परफॉर्मन्स वर तिला commission पण मिळेल . आणि येत्या मार्च एन्ड ला आपण तुझे package पण रिवाइझ करू . मानसीला retain करण्यासाठी बॉस ने पोपट बोलावला होता . सकाळ पासून जिला मानासी शी बोलायला पण वेळ नव्हता आणि आता एकदम गोड बोलत होती. मानसीला हे सगळं प्रकर्षाने जाणवत होतं . ती काय बोलतेय ? तीच बोलणं ऐकण्यात मानसीला काहीच इंटरेस्ट राहिला नव्हता . उलट तिच्या मुळेच आपल्यावर हि वेळ आलीय हे तिला कळून चुकलं होतं.
"असा नोकरी सोडण्याचा तुझा डिसिजन एकदम चुकीचा आहे "
मानसीला खरंतर डोक्याच्या तिडीक येत होती त्या बाईच्या तिथे असण्याची .
ती बॉस कडे बघून बोलली
“ सर माझा डिसिजन चुकीचा असेलही .पण मी अबसेन्ट असताना माझा डेस्क दुसऱ्याला देणे ,माझ्या अबसेन्टी मध्ये माझा जॉब रोल बदलणे ,माझी बसायची जागा बदलणे,मी असताना माझ्या जागेवर दुसऱ्या मुलीला appoint करणे ,मला अचानक सांगणे आज पासून मी ह्या ऑफिस मध्ये नाही बसणे . हा एवढा मोठा डेसिझन मी नसताना माझ्या अपरोक्ष घेणे हे बरोबर आहे का ? बोलता बोलता मानसीचा आवाज कापरा ,रडवेला होत होता,डोळ्यात अश्रू तरळत होते. सोनाली जॉब सोडून जाणार आहे हे आपल्या सर्वांना एक महिना आधी माहित होते . सोनालीच्या जागी जर मी काम करायचे होते तर मला किमान १५ दिवस आधी मेल आला पाहिजे होता . जसा मी सोनालीचा हॅन्डओव्हर घेणार आहे तसा माझा हॅन्डओव्हर त्या मुलीने घेतला पाहिजे होता . माझ्या दृष्टीने हा माझ्या against केलेला कट आहे . अत्ता या क्षणी जर मी सोनालीची जागा घेतली तर मी जॉब जाईल या भीतीने घेईन . आणि तीच भीती मला माझ्या मनातून काढून टाकायची आहे . मानसीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या .त्या धारांमध्ये राग, दुःख ,प्रतिशोध ,झालेला अपमान साफ दिसत होता .
बॉस ला मराठी कळत होते पण बोलता येत नव्हते . त्याने शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि मानसीला बाहेर बसायला सांगितले . आणि कॅबिन मध्ये टीम लीडर आणि बॉस डिस्कशन करू लागले .
मानसी च अंग आत्तामात्र तापाने फणफणलं होतं . तिला बाहेर बसवेना . नाका तोंडातून गरम वाफा निघत होत्या . तिने ऑफिस बॉय ला पाणी आणायला सांगितले आणि पहिली आधी तापाची गोळी घेतली . १५ ते २० मिनिट झाले तरीही आतमध्ये काहीतरी चर्चा चालूच होती . चार वाजायला आले होते सोनालीचा सेंड ऑफ ची वेळ आली हुळू लोक ट्रेनिन्ग रूम मध्ये जायला तयार होयला लागली . मानसी ला बॉस ने सांगितलं
“तुम्हारा resignation मैं मेरे पास रखता हूं । but i have not accepted it . हम इस बात पर कल बात करेंगे . तब तक तुम्ह थोडा सोचने के लिये वक्त मिलेगा ।“
असं बोलून सर्व जण सोनालीच्या सेंड ऑफ ला निघाले .
मानसीला actually घरी जायचे होते . पण आज नाही थांबली तर बरोबर नाही दिसणार .म्हणून ती थांबली . सोनाली ला भेटली .तिला छान शुभेच्छा दिल्या .तिने पण सर्वांसाठी समोसे ऑर्डर केले होते. केक कापला .सर्वानी छान छान भाषण केले तिच्या साठी . तिच्या बरोबर घालवलेले ,अनुभवलेले क्षण सांगितले . टाळ्या ,हास्य ,तिला मिस करण्याचे दुःख ,सर्व सर्व घडत होते .ट्रेनिन्ग रूम दुमदुमत होती .
अचानक मानसी च्या मनात काय आले काय माहित ती उठली आणि भाषण करायला पुढे गेली . सोनाली ला छान शुभेच्छा तिने दिल्या . आणि
म्हणाली " मी आज अजून एक गोष्ट सांगणार आहे . आज माझा पण शेवटचा दिवस आहे .मी माझे resignation लेटर ऑलरेडी बॉस ला दिलाय . सोनाली बरोबर माझाही आज या ऑफिस मधला शेवटचा दिवस आहे "
सगळीकडे एकदम शांतता पसरली . बऱ्याच जणांना shock बसला होता . तिचं हे वागणं बॉस ला अजिबात पटलं नव्हतं हे त्यांच्याकडे बघितल्यावर लगेच कळत होत .
सर्वांचा निरोप घेऊन सोनाली आणि मानसी आपापल्या घराकडे निघाल्या .
क्रमश:
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा