सध्याच्या काळात मानसिक तणाव ही मनुष्य जातीतील खूप मोठी वाढती समस्या आहे. ही वाढती समस्या लक्षात घेऊन देखील आपण त्याला वारंवार दुर्लक्षित करतो आहोत त्याची खंत आहे. ह्या आपल्या इतक्या मोठ्या शत्रुची निर्मिती होते कोठून? तर त्याची निर्मिती आपल्या डोक्यात सतत वाडणाऱ्या विचारांच्या गर्दी मुळेच होत असते.
काही वेळेला आपणच आपल्याला होणाऱ्या तणावाला कारणीभूत असतो. आपल्या डोक्यात सतत चालणारे विचार त्यात प्रत्येक विचारांना महत्त्व देत बसणं आणि मग उदास होत राहणं हे आपल्याला फार चांगलं जमतं. आपल्या विचारांवर आपले कधीच नियंत्रण नसते. मोकाट सुटलेल्या विचारांना आपण त्यांना हवं तस वाहू देतो. मग ते आपल्याला नकारात्मकते कडे निराशे कडे घेऊन जातात आणि मग त्याची जागा मानसिक तणाव घेतो. जी आपल्या मानसिक व्याधी देवून जाते. जी आपली सोबत आयष्यभर निभवते. ज्याचा थेट परिणाम आपल्या आयुष्या वर होतो आणि आपल्या विचारांसोबतच आपल आयुष्य देखील नकारात्मकते कडे वळले जाते. आणि मग सगळा घोळ होऊन बसतो.
नेहमी आपण स्वतः किंवा आपले विचारच आपल्या मानसिक ताणावाला कारणीभूत असतात असे नाही. तर कधी कधी कोणती अचानक आलेली परीस्थिती किंवा अचानक घडलेला कोणता ही वाईट प्रसंग देखील आपल्याला आयुष्यात बराच मानसिक तणाव देवून जातात. कधी कधी अनारक्षित पने आपल्याला नको असलेल्या गोष्टी अचानकपणे घडून जातात ज्यातून सावरणं आपल्या हातात नसतं तर ते पुरेपूर परिस्थितीवर किंवा वेळेवर सोडायचं असत. परिस्थितीवर सोडलं तरी आपल्या हातातून काही तरी महत्त्वाचं निसटत असत आणि ती असते वेळ. पण त्या साठी काहीच पर्याय नसतो. त्या वेळेस आपल्या हातात असत ते फक्त खचून न जाता खंबीर पने उभे राहून परीस्थिती ला लढा देणे. ती वेळ सरून जाण्याची वाट पाहायची असते. संयम बाळगावा लागतो. ते सगळ्यांनाच जमत नसते. ते सागळ्याच्यांनी शक्य होत नसते. आणि ज्यांच्यानी ते शक्य होत नाही त्यांनाच मग मानसिक तणावाचा घेरा पडतो. तो पूर्ण पने त्यात घुसमटून जातो मग त्यातून त्याला बाहेर निघणं अशक्य होऊन जातं.
तणाव हा कोणाला असतो कोणाला नसतो असं नाही तर तो प्रत्येकालाच कमी जास्त प्रमाणात असतोच. त्यातून तो संयम ठेवून त्यातून कसा निभावतो हे पुरेपूर त्याच्यावर अवलंबून असते. संयम हे आणखीन एक जालीम शास्त्र आहे जे परीस्थिती वर मात करायला उपयोगी पडत. संयम हे कोणत्याही परिस्थितीत फार महत्त्वाचं असतं. मानसिक तणाव एक अशी गोष्ट आहे जी आपल्यात च वसते ज्याच्या पासून आपण कधीच कुठेच लांब नाही पळू शकत. आपण त्या पासून लांब जाण्याचा प्रयत्न केला की ते आल्यावर अजूनच हावि होऊ लागतात. म्हणून त्यांच्यापासून लांब जाण्याऐवजी त्यांना खंबीरपणे लढा द्यायला हवा.
हल्लीच्या धका धकी च्या जीवनात ह्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि ते माहीत असून सुद्धा त्याच्या कडे लक्ष न देता आपण त्या कडे दुर्लक्ष करत आहोत ह्याचीच मोठी खंत आहे. मानसिक तणावाचे परिणाम देखील खूप वाईट असतात जर त्यातून वेळेस सावरता आले नाही तर ते त्याच्या आयुष्यासाठी अतिशय वाईट ठरू शकते. मानसिक ताणामुळे हृदयाचे आजार, डिप्रेशन असे अनेक शारीरिक व मानसिक आजारांना तोंड द्यावे लागते. जे आजार आयुष्यभर आपली साथ सोडत नाही. एक वेळेस आयुष्य साथ सोडेल पण हे मानसिक तणावामुळे होणारे आजार नाही.
तणाव हे दोन प्रकार चे असतात एक शारीरिक तर दुसरा मानसिक. कोणत्याही वाईट गोष्टीचं आपल्याला शरीरावर किंवा मनावर अतिक्रमण होते तेव्हा तणावाचे निर्माण होते. शारीरिक तणाव हा माणसासाठी तितकाच हानिकारक असतो. जेव्हा कधी आपण आपल्या शरीराचा विचार न करता वाईट साईट खातो तब्येतीची पर्वा करत नाही तेव्हा मग त्याचे अतिक्रमण झाल्यावर एक वेळ अशी येते की आपले शरीर देखील आपली साथ द्यायला सोडते आणि एखाद्या आजाराचा आपल्यावर मारा होऊन आपण संकटात सापडतो. तेच जरी आपण कोणत्या व्यसनाच्या आधीन होऊन कोणाचं च ऐकत नाही तेव्हा आपले शरीर देखील आपले ऐकायचे सोडून देते आणि कधी कधी त्याचा परिणाम माणसाला मृत्यू च्या तोंडाशी नेऊन सोडतो तरी माणसाला त्याची बुद्धी येत नाही. त्या व्यतिरिक्त मानसिक तणाव हा बाहेरील नसून आपल्या आतून आपल्या नकळत वाढत असतो ज्या बद्दल आपल्याला कल्पना देखील नसते. कधी कधी आपल्या आयुष्यातले आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना च आपल्या मानसिक तणावाला जबाबदार असतात. जसं की घरात सतत होणारी भांडणे, आई वडिलांचं वेगळं होणं, वडिलांचं दारू पिऊन तमाशा करणं, इत्यादी. ह्या गोष्टी लहान मुलांच्या मानसिक तणावाचे कारण ठरतात. हो लहान मुलांना देखील मानसिक तणावातून जावं लागतं. हा एक असा आजार आहे ज्यात लहान मोठे कोणाची ही गय केली जात नाही. ह्या पासून कोणाचीही सुटका होत नाही.
सध्या ही जगभरातील सर्वात जास्त वाढती समस्या झाली आहे. ह्या वर चे उपाय तर अगदी सोपे आहेत ते बहुतेक लोकांना माहीत देखील असावेत पण ते वापरायला त्याचा उपयोग करायला कोणीच तयार नसते जणू सर्वांनी ह्या मानसिक तणावाखाली स्वतःचे आयुष्य खर्ची करायचे मनी स्वतःशी वचन च घेतले आहे. चला तर मग तणावापासून मला माहीत असलेले काही उपाय जाणून घेऊया ज्याने कोणा एकाच जरी भलं झालं तरी माझं आयुष्य सार्थक ठरेल. तर आपण मानसिक तणाव आपल्यातून पूर्ण पने संपवू नाही शकत हे खरंच आहे पण आपण त्याला नियंत्रणात नक्कीच ठेऊ शकतो आणि ते नक्कीच आपल्या हातात असतं. त्यासाठी आपल्याला मोठं काही रॉकेट सायन्स शिकायची गरज नसते. त्यासाठी गरज लागते ती आपल्याला आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवायची आपल्या भरकटणारे विचार सकारात्मकते कडे वळवायची. आता तुम्ही म्हणाल की हे नुसतं बोलायला लिहायला सोपं आहे प्रत्यक्षात कसं शक्य आहे? दिवसाला आपल्या डोक्यात हजारो विचार येऊन जातात. ते त्यांच्याच हिशोबाने वाहत असतात. त्यांना थांबवणं कसं बरं शक्य आहे? पण मी त्यांना थांबवायचं म्हणतच नाही आपण त्यांना न थांबवता त्यांना चांगल्या सकारात्मक विचारांकडे वळवायला हवं. उदाहरण म्हणजे जर कधी आपल्या डोक्यात वाईट नकारात्मक विचार आलाच तर त्याला थांबवायचा विचार न करता आपल्या विचारांना च कलाटणी देवून त्यांना चांगल्या विचारानं कडे घेऊन जायला हवं. आपल्या आयुष्यात घडलेला एखादा चांगला प्रसंग आठवायला हवा, आपल्या आयुष्यात आपली आवडती व्यक्ती ला आठवावे जिला आठवून आपल्याला सगळ काही विसरून जाऊ शकतो. किंवा त्या व्यतिरिक्त अशा वेळेस स्वतःला आपल्या आवडत्या कामात गुंतून घ्यावं म्हणजे त्या वाईट नकारात्मक विचारांपासून आपण दूर राहू शकतो. आणि आपल्याला आनंदी आयुष्य जगायला मदत होते. नकारात्मकते पासून वाईट विचारांपासून आपण दूर राहतो. ह्याच सारखं आपण आपल्या शारीरिक तणावापासून मुक्ती मिळवू शकतो. पण त्यासाठी आपल्याला आपल्या जीभे वर नियंत्रण ठेवायला शिकायला हवं. म्हणजे चांगलं पौष्टीक खाणे. नियमित व्याम योगा करणे हे सगळेच शारीरिक आणि मानसिक तणाव दोन्ही नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला मदत करतात.
चला तर मग मी सांगितलेल्या बहुतेक गोष्टी तरी तुमच्या पर्यंत पोहोचल्या असतील अशी मी आशा करतो. चांगले आयुष्य जगण्यासाठी माणसाचा मानसिक ताण नियंत्रणात असणे खरंच खूप गरजेचे आहे म्हणून त्यासाठी मी सांगितलेले च नाहीत तर तुम्हाला पटतील ते उपाय तुम्ही वापरू शकता. पण आपापल्या मानसिक तणावाकडे लक्ष द्या. माझे म्हणणे इतकेच की ' स्वतःला जपा, चांगले व आनंदी आयुष्य जगा '.
लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा