Login

मनातल ओळखता येत नाही

माझी एक कविता
मनातल ओळखता येत नाही
आणि तू पटकन काही सांगत नाही
गुंता भावनेचा सोडवता सोडवता
जीव आता थकला माझा
तुझ्या भावना मात्र माझ्या पर्यंत पोचत नाही

आयुष्य हे असच आपण जगायचं का?
नेहमी असच अबोल रहायचं का?
किती घेऊ तुला समजून मी
ही दरी कधी संपेल का?

म्हणाला होतास तु एकदा
आयुष्याच्या वाटेवर मी देईल साथ तुला
म्हणून बघितले स्वप्न तुझ्या बरोबर जगण्याचे
किती खुश होतो आपण आहे का? याची
तुला आठवण? एकदा तरी मागे वळून बघशील का?
आपल्या मनातल बोलशील का?

आपल्या भावना माझ्या पर्यंत पोहोचवशील का
आपल्या भावना माझ्या पर्यंत पोहोचवशील का

0

🎭 Series Post

View all