मनातल्या मनात

This poem is about how we think in our inner mind & we try to keep it secret

                                                                                  मनातल्या मनात

मनातल्या मनात

आपण किती बोलतो

मनातलं प्रत्यक्षात

आपण कुठे सांगतो

मनातल्या मनात

आलेले विचार

लपवतो मनात

नाही करत प्रचार

मनातल्या मनात

असतात खूप गुपित

साठवलेली असतात

एका खोल कुपित

मनातल्या मनात

कधी भरून येत आभाळ

वाटे वीज बनुनी गर्जावे चारचौघात

मग मनच सांगत   जरा सांभाळ

मनातल्या मनात

असतात असंख्य स्वप्न

एका मागून एक प्रत्यक्षात

उतरवणे हाच काय तो प्रश्न !!

मनातल्या मनात

असत एक प्रेम

फक्त त्याच प्रेमाच्या मनात

असलं पाहिजे सेम

मनातल्या मनात

सूर जर जुळले

दोघांच्या मनात

तर प्रेमाचे अंकुर फुलले

मनातल्या मनातलं

ओळखायचं कसं ?

शब्दांविना आवाजातलं

मनापर्यंत पोहचायचं कसं ?

मनातल्या मनाची

असतात खूप कवाडं

मनाच्या कुलुपाची

उघडावी कशी कोयाड

मनातल्या मनाचा

आहे एक गुप्त रस्ता

 कळला ईशारा  डोळ्यांना  डोळ्यांचा

तर तुम्ही आम्ही काय करता !!!

© शीतल महामुनी माने