मोहात पाडणारी आंब्याची चविष्ट बर्फी
साहित्य :
आंबे
खवा
बुरा साखर किंवा नसेल तर पिठी साखर
वेलची पावडर
थोडासा बदाम पिस्ता काजू इत्यादी आवडेल तो सुकामेवा
आंबे
खवा
बुरा साखर किंवा नसेल तर पिठी साखर
वेलची पावडर
थोडासा बदाम पिस्ता काजू इत्यादी आवडेल तो सुकामेवा
कृती:
1. सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून पाण्यात अर्धा तास भिजवून नंतर रस काढून घ्यावा. मिक्सर किंवा ब्लेंडर ने रस एकसारखा करून घ्यावा. हे करताना त्यात काहीही टाकायचं नाही, साखर दूध विरहित आंब्याचा रस असावा.
2. हा रस नॉनस्टिक पॅनमध्ये मध्ये आटवून घ्यायचा. आटवताना शेवटी शेवटी दोन चमचे तूप घालायचं. या रसातून सगळं पाणी निघून जाऊन घट्ट गोळा होईपर्यंत त्याला आटवायचं. कढईला आता तूप सुटायला लागलं असेल.
3. आता या बर्फीसाठी खवाही पक्का असायला हवा. त्यात ओलावा नको. विकत आणलेला खवा असेल तर त्याला थोडा वेळ पुन्हा शेकून घ्यायचं.
4. घरी खवा बनवायचा असेल तर तो पक्का आणि मऊ बनवावा.
खवा आणि आंब्याचा गोळा हे मऊ (smooth) आणि एकसारखे असावे , म्हणजे ते नीट एकत्र होतील. गरज वाटली तर खवा मिक्सर मध्ये एकसारखा करून घ्यायचा म्हणजे गोळे राहणार नाहीत आणि नीट एकसारखा होईल.
खवा आणि आंब्याचा गोळा हे मऊ (smooth) आणि एकसारखे असावे , म्हणजे ते नीट एकत्र होतील. गरज वाटली तर खवा मिक्सर मध्ये एकसारखा करून घ्यायचा म्हणजे गोळे राहणार नाहीत आणि नीट एकसारखा होईल.
5. आटवलेला रस आणि खवा एकत्र करून पुन्हा थोडं शेकून नंतर थंड व्हायला ठेवायचं. हा गोळा आता एकदम घट्ट असायला हवा, म्हणजे हाताने छोटासा गोळा करून बघितलं तर हाताला न चिकटता नीट गोळा व्हायला पाहिजे .
6. थंड झाल्यावर त्यात मावेल एवढी बुरा साखर टाकायची . वेलची पूड टाकून एकत्र करायचं . साखर इतपत हवी की हा नीट गोळा होऊन त्याचा बर्फीचा नीट तुकडा होऊ शकेल.
7. मग ताटाला किंचित तूप लावून घ्यायचं आणि त्यात हा गोळा थापायचा किंवा ताट उलटे घेऊन त्याला किंचित तूप लावून त्यावर लाटण्याने लाटून सपाट करायचा . सजावटीसाठी ड्रायफ्रूटस टाकून घ्यायचे किंचित आणखी थापून आवडेल त्या आकारात सुरीने बर्फी कापून घ्यायची. सेट झाल्यावर खायला आणि डब्यात भरायला तयार !
काही उपयुक्त टिप्स :
काही उपयुक्त टिप्स :
1. बर्फीसाठी आंबे घेताना त्याला विशिष्ट चव असलेले आंबे घेऊ नयेत. जसं की शेपा किंवा लंगडा आंबा नको . बाकी हापूस, केशर, दशेरी तोतापुरी ,बदाम यातला कुठलाही चालेल किंवा दोन एकत्रही चालेल. जेवढी रसाची चव चांगली तेवढी बर्फी चांगली होईल. रस किंचित आंबटगोड असेल तर बर्फी अजून छान लागते.
2. आटवलेला रसाचा गोळा हवाबंद डब्यात फ्रीझरमध्ये पाच-सहा महिनेसुद्धा चांगला राहतो. याची पुन्हा सीझन संपल्यावर सुद्धा बर्फी करता येते.
3. तसे तर रस आणि खवा याचे ठराविक प्रमाण नाही पण तरी जितका रसाचा गोळा तितका किंवा त्यापेक्षा कमी खवा आपण टाकू शकतो.
© स्वाती अमोल मुधोळकर
तर या उन्हाळ्यात ही बर्फी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली तेही अवश्य कळवा.