Login

कैरीचे लोणचे

❤️❤️❤️
पाककला आजीच्या बटव्यातली

कैरीचे लोणचे

साहित्य:

कैरीचे छोटे तुकडे - 2 कप
बारीक चिरलेले आले - 1 tbsp
बारीक चिरलेली लसूण - 1 tbsp
उभ्या चिरलेल्या मिरच्या - 2
कढीपत्ता
मोहरी - 1 tsp
मेथी दाणे - 1 tsp
हिंग - 1/2 tsp
हळदी पावडर - 1/2 tsp
काश्मिरी मिरची पावडर - 4 tsp
बडीशेप पावडर - 1/4 tsp
साखर - 1/4 tsp
तिळाचे तेल - 2 tbsp
व्हिनेगर - 2 tbsp
मीठ - चवीनुसार

कृती:


1) कैरीचे छोटे तुकडे कापून घ्या.
2) मीठ लावा आणि 8 तास ठेवा.
3) तेल गरम करून त्यात मोहरी, मग आले, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून चांगले परता.
4) सर्व पावडर मसाले घाला आणि गॅसवर चांगले तळून घ्या. 5) कैरीतून आलेले पाणी घालून चांगले उकळवा.
6) गॅस बंद करा आणि कैरीचे तुकडे घाला.
7) थंड झाल्यावर साखर आणि व्हिनेगर घाला.