चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा २०२५
मनगुंथा (१)
मुंबई येथील एका छोट्याश्या चाळीत रात्रीच्या चकमकत्या लाईटीत डीजेच्या तालावर काही माणसं नाचत होती तर एका घरासमोर तोरण आणि
फुलांनी मंडप सजवला होता , मंडपासमोरच एक छोटा पोस्टर लावलेला त्यात मुलगा आणि मुलगीचा नवरा नवरीच्या वेशात फोटो होता त्यावरूनच समजत होतं की इथे लग्नसोहळा चालू आहे.
फुलांनी मंडप सजवला होता , मंडपासमोरच एक छोटा पोस्टर लावलेला त्यात मुलगा आणि मुलगीचा नवरा नवरीच्या वेशात फोटो होता त्यावरूनच समजत होतं की इथे लग्नसोहळा चालू आहे.
थोड्याचवेळात समोरून नवरा नवरी येताना दिसले. पुढे काही माणसं नाचत होती आणि मागून ते दोघं हातात हात घालून हळू हळू चालत येत होते. शेवटी ते घरापर्यंत पोहोचले. घराच्या दारासमोर उभ्या असलेल्या नवरदेवाच्या आईने दोघांना हळदी कुंकू लावून ओवाळले आणि नवरीकडे हसत बघून " पोरी.. माप ओलांडून आत ये. "
सासूने जसं सांगितलं तसं ती माप ओलांडून आत येते तिच्यासोबत तोही आत येतो.
सासूने जसं सांगितलं तसं ती माप ओलांडून आत येते तिच्यासोबत तोही आत येतो.
आत आल्यावर नवरदेवाची आई म्हणाली " आता सगळ्यांनी आराम करू थोडं नंतर पुढचे विधी करू. ( एका मुलीकडे बघत) सायली वहिनीला तुझ्या खोलीत घेऊन जा. ( नवरा नवरीकडे बघत ) सगळे विधी आणि सत्यनारायण पूजा झाल्याशिवाय तुम्ही दोघ एकत्र नाही राहू शकतं. "
दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा असल्याने सगळे लवकर उठले. पुजा दुपारी तीन वाजेपर्यंत चालू होती.नंतर हळू हळू सर्व पाहुणे जेवण करून निघून गेले.
सगळे गेल्यावर नव्या नवरीच्या सासू आणि सासऱ्याने त्यांना आपल्या जवळ बसवून म्हटले, " स्वाती आणि साहिल आता तुमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे म्हणजेच संसाराला सुरुवात झाली आहे. या नव्या आयुष्यात अनेक अडथळे येतील पण स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. "
आपल्याला सासू सासरे इतके छान भेटले म्हणून स्वातीचे मन आनंदाने भरले होते. स्वाती हसतं " हो आई. " म्हणते.
चौघ बोलत असताना अचानक कोणीतरी " अरे.. माझी ओळख तरी करून द्या. जाऊदे मीच देते माझी ओळख. हाय वहिनी मी सायली.. तुमची नणंद. तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकता. "
सायलीच्या बोलण्यावर स्वाती गोड हसली आणि स्वतःला सावरत गंभीरपणे सर्वांकडे बघून " ह... मला काहीतरी बोलायचं आहे..मी.. मी.नोकरी करू शकते? "
स्वाती जे काही बोलली त्याने बाकीचे गंभीरपणे एकमेकांकडे बघू लागले. सर्वांना अस बघून स्वातीच्या मनात धडकी भरली.
क्रमशः
©भाग्यश्री परब
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा