चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा २०२५
मनगुंथा (२)
सगळे गप्प बघून स्वाती " जर तुमची इच्छा नसेल तर मी नाही करत नोकरी. "
" अग.. आम्ही कुठे बोललो नको करू. तू कर जॉब. तुझ्या नोकरीला आमचा होकार आहे. " सासूबाई होकार देतात.
साहिल" हो.. आमचा होकार आहे. "
सगळ्यांकडून नोकरीसाठी होकार ऐकून स्वातीला खूप आनंद झाला. बोलून झाल्यावर सगळे आपापल्या खोलीत झोपायला निघून गेले.
खोलीत आल्यावर स्वाती म्हणते " अहो.. खूप धन्यवाद तुम्ही मला नोकरी करायला होकार दिला. "
साहिल तिचे हात हातात घेत " तू नोकरी केलेली मला आवडेल म्हणूनच तर होकार दिला. "
दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई , सासरे आणि सायली गावी आपल्या घरी जायला निघाले.
स्वाती तिघांकडे बघून " तुम्ही अजून काही दिवस थांबला असता तर बरं वाटलं असतं. "
" अगं.. आम्ही थांबलो असतो पण सायलीची बारावीची परीक्षा आहे त्यामुळे आम्हाला जावं लागेल. पुढच्या वेळी येऊ तेव्हा खूप राहू. आता आम्हाला जावं लागेल. " सासूबाई म्हणतात.
सायलीची परिक्षा आहे म्हणून स्वाती काही बोलली नाही. साहिल आणि स्वातीने सासू सासरे यांना पाया पडून निरोप दिला.
स्वाती आणि साहिलच्या लग्नाला तीन महिने होतं आलेले. आजही स्वातीचा चेहरा पडलेला होता.
तिचा असा पडलेला चेहरा बघून साहिल " स्वाती स्वतःवर विश्वास ठेव. तू प्रयत्न करत आहेस ना नोकरी शोधण्याचा. एक दिवस बघ तुला नोकरी नक्की भेटेल. "
स्वाती " साहिल.. अजून किती विश्वास ठेवू. या सगळ्यामुळे माझं कशातच मन लागत नाहीये. "
साहिल तिचे हात हातात घेत " हे बघ तू प्रयत्न करत राहिलीस तरच तुला नोकरी भेटेल. पहिला इंटरव्ह्यू फेल झाल्यापासून तू मनात नकारात्मक गोष्टीचा विचार करत आहेस. त्यामुळे तुझा स्वतः वरचा विश्वास कमी होत चाललाय. त्यात तुझ्या मनात " मी काही करू शकत नाही " हेच वाक्य असत सतत. मग नोकरी कशी लागणार तुला. "
स्वाती साहिलच्या हातातून हात काढून घेत " मला नाही समजून घ्यायचं हे सर्व. मी काहीच करू शकत नाही. "
स्वाती बोलत असताना अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला. बघते तर साहिल तिच्याकडे रागाने बघत होता.
क्रमशः
भाग्यश्री परब
भाग्यश्री परब
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा