Login

मनगुंथा (३)

तिचा स्वतःवरचा असलेला आत्मविश्वास कमी झाला आहे. ती परत मिळवू शकेल का आत्मविश्वास ? जाणून घेण्यासाठी वाचा "मनगुंथा"

चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा २०२५

मनगुंथा (३)

साहिल रागात स्वातीला " तुला समजावून थकलो मी. आता . माझ्यात समजून घेण्याची शक्ती नाहीये. तुला नोकरी करायची असेल तर कर नाहीतर नको करू. नसेल करायची तर घरी बसून घर चालव. " एवढे बोलून तो आपल्या कामाला निघून गेला.

साहिलला अस बोलताना बघून स्वाती हुंदके देत रडू लागली. ती मनांत" मी स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकतं. त्यात संसार पण नीट नाही करू शकत. मी कशातच काही करू शकत नाही. "

हा पूर्ण दिवस ती मनांत सतत " मी काहीच करू शकत नाही" याच वाक्याचा विचार करत काम करत होती. यामुळेच तिचा स्वतःवरचा विश्वास कमी होत होता. रात्री साहिल कामावरून आल्यावर काही न बोलता जेवून झोपला होता. त्याचं असं वागणं बघून स्वातीला वाईट वाटतं होतं. ती बाल्कनीत बसून विचार करत फोन चाळत होती. अचानक तिला कसलं तरी नोटीफिकेशन आलं.

" हाय.. जर तुम्हाला वाटतं असेल तुम्ही काही करू शकत नाही तर हे ॲप डाऊनलोड करा. हे ॲप तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवेल सोबत आत्मविश्वाही वाढवेल."  नोटीफिकेशन बघून स्वातीने ते ॲप लगेच डाउनलोड केले.

दुसऱ्या दिवशी रात्री साहिल कामावरून आल्यावर बघतो तर स्वाती खूप खूश दिसत होती. कारण विचारल्यावर समजल की तिला एके ठिकाणी नोकरी भेटली आहे. याचं श्रेय तिने त्या ॲपला दिलेलं पण तिने त्या ॲप बद्दल त्याला सांगणं टाळलं.

असेच सुखाचे दिवस जात होते. स्वाती ॲप जे बोलेल तसं वागत होती आणि याचा निकालही सकारात्मक येत होता पण हे समजत नव्हतं की ते ॲप तिच्या आत्मविश्वासावर नियंत्रण मिळवत आहे. तिचे निर्णय तो ॲप घेत होता यामुळे ती स्वतःची ओळख संपवत होती.

एक दिवस साहिलला कामावरून यायला खूप उशीर झालेला. तिने विचारल्यावर " काम जास्त असल्याने यायला उशीर झाला. " अस उत्तर भेटले. पण या उत्तराने तिला समाधान भेटले नाही म्हणून तिने त्या ॲपवर मेसेज करून सगळं सांगितलं. यावर तिला हे उत्तर भेटले की " तो खरं बोलत असेल किंवा खोटंही बोलत असेल. " या वाक्याने स्वातीच्या मनात गोंधळ उठले होते.

क्रमशः
©भाग्यश्री परब
0

🎭 Series Post

View all