Login

मनगुंथा (४)

तिचा स्वतःवरचा असलेला आत्मविश्वास कमी झाला आहे. ती परत मिळवू शकेल का आत्मविश्वास ? जाणून घेण्यासाठी वाचा "मनगुंथा"

चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा २०२५

मनगुंथा (४)

असेच काही दिवस साहिल उशीरा येत होता त्यात त्याच तेच उत्तर ऐकून आणि मनाला समाधान न झाल्याने स्वातीच्या मनात शंका निर्माण होत होती.

एक दिवस अचानक स्वाती साहिलला नको ते बोलली आणि दोघांमध्ये मोठे वाद झाले.

" तुम्ही काहीतरी लपवतं आहात? " स्वाती विचारते.

" मी काहीच लपवत नाहीये स्वाती. " साहिल उत्तर देतो.

" मगं तुम्ही एवढ्या उशीरा का येता ? "

" अगं.. मला काम जास्त असतात म्हणून उशीर होतो घरी यायला. जर तुला माझ्यासोबत वेळ घालवायचा आहे तर मी मॅनेजरला विनंती करून एक दिवसाची रजा घेतो. मगं तुला कुठे जायचं तिथे घेऊन जातो. " स्वातीच्या प्रश्नावर साहिल उत्तर देतो.

" नाही.. तुम्ही माझं मन दुसरीकडे भडकवू नका. असं वाटत आहे की तुमच माझ्यावरच मन भरलं आहे. तुम्हाला दुसरी..."

स्वाती पुढे काही बोलणार त्या अगोदरच साहिल रागाने जोरात तिच्यावर ओरडला " स्वाती... मनांत येईल ते काहीही बोलू नकोस. तुला हे सगळं कोणी सांगितलं हा ? तुला कायं वाटतं मी असं वागेन?"

स्वाती म्हणते " हो तुम्ही वागू शकता असं.. नाहीतर त्यादिवशी ' तुला नोकरी करायची तर कर ' असं मुळीच बोलला नसता. "

साहिल थोडं शांत होत " तू समजून का घेत नाहीयेस? ( ती काही बोलत नाही बघून ) तुझं मन शांत झालं की यावर निवांत बोलू." एवढं बोलून तो आपल्या खोलीत निघून गेला.

इथे स्वाती बाल्कनीत एका बाजूला बसून रडत होती. रडून झाल्यावर तिने आपला मोबाईल काढला आणि ते अँप उघडून मेसेज केला " आज साहिल माझ्याशी भांडले. ते काहीच खरं बोलत नाहीये. काय करू ? "

" तो खरं बोलत नाहीये म्हणजे काहीतरी असणारच. एक काम कर तू त्याला घटस्फोट दे. ज्या नात्यात किंमत नाही ते नातं टिकवण अवघड आहे. "

या उत्तरामुळे स्वाती मनांत " हा बरोबर बोलत आहे. आजकाल साहिल वेगळे वागत आहे त्यात ते उशिरा पण येत होते काही दिवस आणि आज त्यांनी माझ्यावर आवाज चढवला. खरं काय ते पण बोलले नाही. मी त्यांना घटस्फोट देणं योग्य आहे. "

असेच दोन तीन दिवस निघून गेले. दोघं एकमेकांशी काही बोलत नव्हते. स्वातीला साहिलच गप्प बसणं त्याचावरची शंका अजून वाढवत होती आणि साहिल स्वातीचं मन शांत झाल्यावर ती स्वतःहून बोलेल असं वाटत होतं.

एक दिवस अचानक स्वातीने घटस्फोटाचे पेपर साहिलच्या पुढ्यात ठेवले. हे बघून साहिलच्या चेहऱ्यावर राग उफाळून येत होता.


क्रमशः
©भाग्यश्री परब
0

🎭 Series Post

View all