Login

मनगुंथा (५-अंतिम)

तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झाला आहे. ती परत मिळवू शकेल का आत्मविश्वास ? जाणून घेण्यासाठी वाचा "मनगुंथा"
चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा २०२५

मनगुंथा (५ - अंतिम)

घटस्फोटचे पेपर बघून साहिल रागात " तुला वेड लागलं आहे का ? एवढ्याश्या कारणासाठी तू घटस्फोट घेणार?? "

" हो.. तुमचं असं वागणं बघून माझं मन घटस्फोट घ्यायला म्हणत आहे. " स्वाती रागातच बोलते.

" तू एकदा तुझ्या मनाला विचार नक्की खर कायं आहे ते समजेल. " साहिल बोलतो.

" मला नाही विचारायचं माझ्या मनाला. तुम्ही या पेपरवर सही करा म्हणजे हे पेपर कोर्टात द्यायला."

साहिल काहीतरी विचार करून " ठीक आहे तुला घटस्फोट हवा आहे ना. मी करतो सही. पण दोन दिवसांनी आता नाही. "

स्वाती विचार करून बोलते " चालेल.. पण मला दोन दिवसांनी सही हवीय. "

साहिल " हो.. " म्हणतो.

सहिलशी बोलून झाल्यावर स्वाती आपल्या खोलीत निघून जाते. तिच्या मागोमाग साहिलही निघून जातो. तो खोलीत आल्यावर स्वातीला दिसणार नाही  अश्या ठिकाणी जाऊन उभा राहतो. बघतो तर स्वाती खुश होऊन कोणाशी तरी बोलत होती.

तिला तसं बघून साहिल मनांतच बोलतो " सत्याचा शोध लावला पाहिजे. "

साहिल स्वतीजवळ जात " ह... मला कॉफी मिळेल का ?"

स्वाती फोन बाजूला ठेवून काही न बोलता कॉफी बनवायला निघून जाते. हीच संधी साधून साहिल तिचा फोन घेत चालू करतो आणि त्यातले मेसेज बघून त्याला यावर बोलावं काही समजत नव्हतं.

फोनमध्ये एक ॲप होता त्यात एआय म्हणून बोलत होता. ते ॲप म्हणजे लोक जेव्हा आपल्या स्वतःवरचा विश्वास कमी झालेला  असतो आणि त्यामुळे त्यांना निर्णय घेणं अवघड होतं अश्यांना तो मार्गदर्शन करत होता. पहिले त्याच मार्गदर्शन चांगल असतं मग तो हळूहळू त्या व्यक्तीच्या मनावर , त्यांच्या निर्णयांवर नियंत्रण मिळवतो.

असच स्वातीसोबत झालेलं आधी त्याने नोकरीसाठी तिला चांगलं मार्गदर्शन केले नंतर हळू हळू त्याने तिला साहिलविरुद्ध भडकवल. आता साहिलला समजत होतं की स्वाती अशी का वागत आहे. म्हणून त्याने तो ॲप लगेच डिलीट केला आणि स्वाती यायची वाट बघत तिथेच बसला.

थोड्यावेळाने स्वाती कॉफी घेऊन आली. साहिल कॉफी पिऊन झाल्यावर तिला आपल्याजवळ बसवत तिचा हात हातात घेत तिला जे काही घडलं आणि ती जे काही करत होती त्याबद्दल प्रेमाने समजवलं. स्वातीला समजत होतं पण समजून घेणं अवघड जात होत. त्या ॲपने तिचं मन, आत्मविश्वास हिरावून घेतलं होतं. त्यामुळे साहिलने तिला एका मानसशास्त्र वैद्यकडे घेऊन गेला त्यामुळे स्वातीने आपल्या स्वतःवरचा खरा आत्मविश्वास मिळवला होता. ती आता कोणताही निर्णय ठामपणे घेत होती.