मनीचे भाव (पंचाक्षरी काव्य)
होते अबोल
मनीचे भाव
शब्द जाणते
मनाचे ठाव
मनीचे भाव
शब्द जाणते
मनाचे ठाव
शब्द प्रेमळ
सुखावतात
शब्द जे कडू
दुखावतात
सुखावतात
शब्द जे कडू
दुखावतात
शब्द येता जे
ओठी विखारी
मनास लागे
खूप जिव्हारी
ओठी विखारी
मनास लागे
खूप जिव्हारी
शब्द करती
ओले नयन
विचार करे
खूप गहन
ओले नयन
विचार करे
खूप गहन
शब्दांना देता
प्रसंगी धार
चिरून टाके
काळीज पार
प्रसंगी धार
चिरून टाके
काळीज पार
नाती जी सारे
शब्द तोडते
धागे मैत्रीचे
शब्द जोडते
शब्द तोडते
धागे मैत्रीचे
शब्द जोडते
जरा जपून
शब्द वापरा
उच्चारताना
विचार करा
शब्द वापरा
उच्चारताना
विचार करा
कशी सांगू ही
शब्द लिलया
अद्भूत असे
शब्द किमया
शब्द लिलया
अद्भूत असे
शब्द किमया