मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.१५

आनंदच्या जीवनात मनीषाचे कसलेच स्थान नाही. हे पाहून अंजू काय करेल? मनीषा लवकर शुद्धीत येईल का? आणि तिला कळेल का? आनंद आपले मनीषाबद्दलचे मत बदलवेल? की,आहे त्या मतावर ठाम राहील?
म्हणजे, इथ पणं माझीच चूक का? मी काय केलं म्हणजे तुला पटल, त्या बाई सोबत माझे कसलेच संबंध नाहीत ते.
आनंद' रागात अंजूला विचारतो.

अंजू' बाळाला झोपवण्याचा प्रयत्न करत. आनंदला हळू आवाजात बोलते. "तुला काहीच कसं वाटतं नाहीये आनंद? हे सगळ किती सहज बोलत आहेस तू.'
अरे.. तुमच्या लग्नाला पाच वर्ष झालेत. त्या पाच वर्षातले, पहिलं वर्ष मनीषासाठी' ठीक ठाक गेले असेल. कारण, तू तिला बायको मानली नसलीस तरी, ती या घरची नवी नवी सून होती.आणि सूनेचे' नव्याचे नऊ दिवस कोणीही आनंदाने साजरे करते रे... पणं नंतर?"

"नंतर काय?
जे हाय तेच चालू राहील ना..
सून' जुनी झाली मग, आपला संसार सांभाळू लागली. झालं की मग!

अंजू कसेतरी हसते. आणि बोलते.
"संसार!
कोणाचा संसार रे?
तुला अर्थ तरी कळतो का संसार या शब्दाचा? अरे
आनंदा' तू किती लाईटली घेतोयस हे सगळचं.
इतकं सोपं असतं का स्त्रीचं जीवन?
मला तर, मनीषा' तुमच्या लग्नापासूनच आवडत नव्हती.
अस नाही की, तिच्या स्वभावात काही दोष होता. दोष, माझ्याच मेलीच्या नजरेत भरला होता.
पणं, ते जाऊ दे." ते इथे महत्वाचं नाहीये.'

पणं, तू जरा विचार कर ना...
अरे मी इतकी शिकली सवरलेली मुलगी. तरी ही, लग्नाला वर्ष होवून गेले की, माझ्या घरचे नाही पणं, आसपासच्या लोकांनी, मग, पाळणा कधी हलणार घरात? अस विचारून मला नकोसे केले होते.
पणं, ह्यांनी' मला वेळोवेळी सावरले.'

आणि त्यातच, आमच्या दोघांनाही कसली घाई नसताना ही, अनपेक्षित हे पिल्लू' आमच्या जीवनात आले. आणि आम्ही अगदी आनंदाने त्याचे स्वागत केले. वर, त्या बोलणाऱ्यांची तोंड बंद झाली ते वेगळेच.'

"पणं, मनीषाच काय? तू तर तिला साधं विचारत ही नाहीस की, तिला घरात कोणी काही बोलते का?
अरे कालच मी गणू ला लागलं म्हणून, तिला बोलता बोलता सहज बोलून गेले की, "त्यासाठी आई व्हावं लागत."
काय वाटलं असेल तिला?
मी तर बोलून रिकामी झाले. पणं तिच्या मनातली सल ती कोणाला बोलून दाखवणार रे?
तू तिच्याकडे पाहत नाहीस, तिचे काही ऐकत नाहीस. हे तर दिसतय. मग इतक्या वर्षात माझ्या व्यतिरिक्त किती आणि कोणी काय काय बोलले असेल तिला जरा तरी विचार कर!

आत्ता मला माझी चूक कळतेय आनंद.'
त्या मुलीने जे एवढ्या वर्षात सहन केले आहे ना! त्याचा विचार करूनच, तुझ्या बद्दल चीड निर्माण होतेय माझ्या मनात."

"एवढं काय सहन केलं ग तिने?
चांगल्या खात्या पित्या घरात सून बनून आली.
घरातल्या सगळ्यांची लाडकी झाली. अजुन काय पाहिजे हुतं तिला?'

"लाडकी!!"
अंजू कुत्सितपणे हसते.

"तुला तर कारणच पायजेल (पाहिजे) माझ्यावर चीडायला तर,
चीड मग!
ते परवडेल मला..कारण, मला तस ही, तिच्या बद्दल, काही ऐकण्याची इच्छा नाही.
हे जे सगळ होतंय ना! ते तिच्याच मूळच सुरू झाले आहे. त्यात माझा दोष काहीच नाहीये."

"त्या वेळी आईला सांगत होतो मी, तू तरी आबांना समजव. पणं, आईला तिच्या दूरच्या भावाची' ही पोरगी पसंद पडली हुती.
मला तर त्यांनी, कळू पणं दील नव्हत नीट. सहज नातेवाईकांना भेटायला जाऊ म्हणून नेल. आणि सुपारी फोडून आले सगळे.'

"आईला मी म्हटल सुद्धा, मी या पोरी सोबत संसार करीन हे विसरून जा. पणं, नाय तिला तर तिचं' सून म्हणून, पसंद पडली.'
मला म्हणती कशी!
तुझ्या त्या साक्षी पेक्षा, कैक चांगले गुण हाय हीच्यात. ही घर एकत्र करून ठेवलं बघ. आणि तुझी ती साक्षी' आपल ह्ये घर मोडायला निघाली हाय."

"आई अस म्हणाली तुला?
पणं मग, तू ही डायरेक्ट स्टँड का नाही घेतलास. जायचं होत ना मग, घर सोडून. किमान मनीषा तर, या बंधनात अडकली नसती. तिची ती' आज कुठे ही, कोणासोबत तरी, सुखात संसार करत असती." म्हणत, अंजू झोपलेल्या बाळाला बेडवर व्यवस्थित ठेवते. आणि त्याच्या अंगावर पांघरून घालून त्याच्या शेजारी बसते.

आनंद तिच्या जवळ येत बसत बोलतो.
"जाणारच हुतो मी. लग्नाच्या दोन दिवस आधी तयारी बी केली हुती. पणं, ऐन वेळेला माझा प्लॅन फसला."

"काय सांगतोस?"

"खर ते सांगतोय. तुम्ही सगळे आपापल्या खोलीत आरामत निजला होता. मी माझी बॅग घीवून कुणी जागं नाय ह्याचा अंदाज घेत, सोफ्यात (दिवाणखान्यात) आलो. अन् दाराकडे गेलो. दाराची कढी काढायला हात वर नेला तर, तिथं आबांनी भलंमोठं टाळ लावल हुतं.'
बहुतेक, आबांना अंदाज आला हुता. मी पळून जाणार याचा. म्हणूनच, त्यांनी कड्क बंदोबस्त केला हुता.'
पणं, मी बी इर्षेला पेटलो हुतो.'

"मी सयपाक (स्वयंपाक) घराच्या मागच्या दारातन बाहेर पडायचं ठरवलं. आणि तिकडे गेलो. नशिबानं, तिकडच्या दाराला आबा कुलूप लावयाला विसरल हुतं. मला आयती संधी मिळाली हुती. पणं, मी दारातन बाहेर पडणारच की, माझ्या हाताला धरून कोणीतरी आत ओढलं."

"कोण होत ते?"

"दुसर कोण असणार? ( डोक्यावर हात मारत, तिरकस हसत)
आई होती ती.
तिने मला सोफ्यात ओढत आणल. आणि माझ्या समोर, आपला पदर पसरत डोळ्यातनं पाणी पाझरायला सुरवात केली. आणि बोलली."

आनंद' पुन्हा आपल्या भूतकाळातल्या आठवणीत हरवला.

"आनंदा आर्र, अस नको वागू रे लेकरां...
तुला एक लहान भैन (बहीण) हाय. तिचा तरी ईचार कर जरा. तू जर असा पळून गेलास तर, लोक आपल्या तोंडात शेण घालत्याल. तुझ्या' बा न आयुष्य भर मिळवलेली इज्जत मातीमोल नगं करू रे पोरा."

"आई मला हौस नाही आली असं करायची. पणं, तुम्ही तुमचा हेका सोडणां म्हणून, मला ह्ये पाऊल उचलायला लागतंय.
मला वाटलं हुतं, आबा नायं तर, तू तरी मला समजून घेशील. पणं, तू बी' आबांसारखीच निघालीस.
स्वतःच्या पोरीला' कितीच्या काय शिक्षण दिलत तुम्ही! आणि सून मात्र, अडाणी नायतर कमी शिकलेली पाहिजे तुम्हाला.

"आर्र, आनंदा तुला वाटतं, तुझ्या बायकोन शिकावं तर, शिकव की. आम्ही कुठं नाय म्हणतोय. पणं, ती साक्षी नको रं बाबा. आर, हाय काय तिच्यात? नुसतच "देखल्या देवा दंडवत" नसतो करायचा बाळ माझे.'

"तुझ्या परीस, लय पावसाळं बघितल्यात आम्ही.
म्या तुला सांगते. ती पोरं आपल नुसतं घर तोडत नाय तर, सगळी नातीपणं तोडायला निघाली हाय बघ. आर्र, या आधी तू कधी आय' बा शी अस वाकड्यात बुलला (बोलला) हुतास ( होतास) का ? जरा आटव (आठव) बर...

नाय आटवत ना.. कारण, तू कधीच आमच्याशी उलट बुलला नव्हतास रं... पणं, त्या पोरीने तुला पिरमाची पट्टी काय पढवली. अन्, तू लहान मोठ समदच इसरलास की.

"आई' तीनं मला काय बी नाय शिकवलं. तू उगाच कुठंच्या कुठं ईषय निऊ नगस.'

"तुला मी एकदाच शेवटचं सांगतोय. मला ह्ये लगीन नाय करायचं. अन् जरा का तुमी माझ्यावर जबरदस्ती केलीत तर, मी माझं काय करून घिन? मला बी माहीत नाय..."

"आर्र माझ्या कर्मा.
ह्याच दिसासाठी तुला जलम दिला हुता का म्या?" म्हणत, आई' डोक्यावर, छातीवर हात मारत अचानक रडू लागली.

"अन्, मी घाबरलो.
कुणी उठलं तर, माझे जायचे सगळेच दरवाजे बंद होतील. म्हणून मी जरा नमतं घ्यायचं ठरवलं.
आईला शांत करत मी बोललो."

"आई गप ना. अग, मला तुम्ही बी पाहिजेत आणि साक्षी बी. मी नाय ग त्या अनोळख्या, पोरी बरुबर आयुष्य काढू शकत. आमच्या दोघांचं बी वाटूळ होईल. ते तुला बघवल का?"

तर, आई म्हंटली
"काय नायं वाटूळं (वाटोळं) हूनार. लगीन झाल्यावर समद बदलत. तू बी बदलशिल. आणि आमचं आभार मानशिल. तवां, तुलाच वाटलं आपण, आय' बा' च, ऐकल ते भल झालं.'
आनंदा' तुला तुझ्या या, आयची शापत हाय. तू जर माघार नाय घेतली आणि पळून जाऊन त्या पोरी संगट (सोबत) लगीन केलस तर, तुला माझं आणि तुझ्या बहिणीच मेलेल तोंड बघावं लागलं.'
कारण, तू असं लगीन केल्यावर, लोकं' माझ्या पोरीच्या संस्कारावर पणं, बोटं ठीवतील. अन् त्ये म्या सहन नाय करू शकणार. त्या परीस आत्ताच, तिला बी पेटवते. अन् मी बी पेटवून घिते. मग तुला तुझ्या मनासारखं करायला तू रिकामा होशील."
म्हणत, आई सयपाक गेली, मी बी तिच्या मागे पळालो.
तिथे ठेवलेला रॉकेलचा कॅन उचलून ती पुन्हा तुझ्या खोलिकडं निघाली.

"बापरे! आई' मलाही मारायला निघाली होती?
"हुं" आनंद कसे तरी हुंकारतो.

"मी कसं तरी तिला सयपाक घरातच थांबवलं. तिला खूप समजावलं. गयावया केली. तिच्या' पायापणं पडलो. पणं, तिने माघार घेतली नाही. शेवटी मलाच माघार घेवून, आपल्या खोलीत जावं लागलं.'

"मला वाटलं अजुन एक दिवस बाकी आहे. अजुन ही वेळ आपल्या हातात आहे. तर, उगाच ताणुन धरण्यात अर्थ नाही.'
पणं, दुसऱ्या दिवशी सयपाक घराला पणं, टाळं लागलं होतं. आणि माझा साक्षी बरोबर संसार थाटण्याच्या स्वप्नाला पूर्ण विराम बी.."
म्हणत, आनंद रडू लागतो.

अंजूला' आनंद बद्दल वाईट वाटते.
तिच्या मनात अनेक विचार सुरू असतात.
"आपले आई' आबा स्वतःच्याच मुलांबाबत असे कसे वागू शकतात? आणि मनीषा' त्या बीचारीची, यात नक्की काय चूक आहे? की, तिला नाहक सगळच सहन करावं लागत आहे."

अश्रूंचा, ओघ कमी होताच, आनंद स्वतःला सावरतो.
आणि खंबीर होत बोलतो. तेव्हा मला काहीच ऑप्शन नव्हते. कारण, मी नोकरी जरी करत असलो तरी, थोडा वाईच का हुईना, आबांवर निर्भर हुतोच.
पणं, आता मी पूर्णतः स्वावलंबी झालो हाय. अन्, आता मी माझा निर्णय स्वतः घेवूच शकतो.
म्हणूनच, मी ठरवलं हाय."

"काय ठरवले आहेस?" अंजू आपल्या विचारून बाहेर येत, आनंदकडे प्रश्नार्थक बघत विचारते..

"हेच की, आता मी मला हवं त्येच करणार.
मी' मनीषा बरोबर काडीमोड घेणार. आणि या घरातनं बाहेर पडून, साक्षी' बरुबर (बरोबर) संसार थाटणार.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.



🎭 Series Post

View all