मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.१८

अंजू आणि सुबोध घरातल्या लोकांचा, मनीषाबद्दल होत असलेला गैरसमज दूर करून त्यांना पुण्याला येण्यास भाग पाडतील की, मनीषाचा आपल्या माणसांबद्दल असणारा विश्वासाच्या भ्रमाच्या भोपळ्याला फोडून तिला नव्याने जगायला शिकवतील?
बाबा, डॉक्टरांना घेवून येतात. मनीषा त्यांना येताना पाहून थोडीशी चुळबुळ करते. पणं डॉक्टरही तिला शांत पडून राहण्यास सांगतात. डॉक्टर तिला तपासून पाहतात. तिला अजुन ही ताप असतो. त्या मुळे डॉक्टर तिला आराम मिळावा म्हणून, झोपेचे इंजेक्शन देतात. सिस्टर ना तिला थोडा ज्यूस प्यायला देवून काही टॅबलेट ही द्यायला सांगतात. आणि बाबांकडे पाहून, ती ठीक असल्याचे सांगतात. आणि,सुबोध आला की, तुम्ही दोघे भेटायला या सांगून, तिथून दुसरा पेशंट तपासायला जातात..

मनीषा अस्वस्थपणे इकडे तिकडे पाहत असते. बाबा तिला धीर देत बोलतात. मनीषा बाळा जास्त विचार नको करुस. तू फक्त लवकर बरी हो बर.. संध्याकाळी अंजली आणि सुबोध येतील तेव्हा, तुझ्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. तो पर्यंत आराम कर. तू माझ्या मुलीसारखीच आहेस बाळा. त्या मुळे उगाच घाबरून जाऊ नकोस. मी आहे इथेच. तुला काही लागले तर मला हक्काने आवाज दे. म्हणत, बाबा पुन्हा खुर्चीत बसून पुस्तक वाचू लागतात. तो पर्यंत, सिस्टर ज्यूस घेवून येतात आणि तिला तो दोन तीन घोट तरी प्यायला लावतात. मनीषाची इच्छा नसते पणं समोर बसलेल्या बाबांना पाहून ती चूपचाप दोन चार घोट ज्यूस पिते. मग सिस्टर तिला काही औषध खायला देतात. आणि आराम करायला सांगतात. औषध आणि इंजेक्शनच्या प्रभावामुळे तिला आपोआप ग्लानी येते. आणि ती आपल्याही नकळत झोपी जाते.

इकडे सोनगावात, सुबोध दुपारी हॉस्पिटलच्या आवारात सिस्टरांना सोडतो. त्यांचे आभार तर त्याने घरीच मानलेले असतात. सुबोधच्या आईही त्यांचे आभार मानून त्यांना छान से गिफ्ट देतात. त्या मुळे त्या आधीच खूप भारावलेल्या असतात.
त्या मुळे सुबोध त्यांना सोडून, जास्त वेळ न दवडता तिथून घराकडे निघतो. अंजू' बाळाला घेवून त्याचीच वाट पाहत दारात येवून बसलेली असते.
आत्त्याबाय आणि विजू आपापल्या खोलीत आराम करत असतात.
सुबोधला आलेले पाहून अंजूच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित येते. ती आपल्या जागेवरून उठत हातातल्या बाळाकडे पाहत बोलते.
पिल्लू' पाहतोयस ना! तुझे बाबा आले बघ आपल्याला न्यायला. आता आपण आपल्या घली जानाल. मग छानसा मुहूर्त ठरवून आपण पिल्लुचे बारसे करायचे बर का? इतक्यात सुबोध गाडी पार्क करून, अंगणातल्या नळावर पाय धुवून, तिच्या पुढे येवून उभा राहतोही. ती काही क्षण दचकते. पणं, सुबोधला समोर पाहून पुन्हा गोड हसते. आणि बोलते.
"ओह, तुम्ही! किती घाबरले मी..."

"अरे,
घाबरण्यासारखे काय केले मी? तुझ्या समोरच तर आलो मी." म्हणत, सुबोध तिच्या हातातले बाळ आपल्या हातात घेतो. आणि त्याच्या सोबत खेळत बोलतो. "काय ग! बाकीचे कोणी नाहीत का घरात?
तू एकटीच बाळाला घेवून बसली आहेस अंगणात ते."
अंजूचा हसरा चेहरा पुन्हा उतरतो. ती खाली मान घालून बोलते. "आहेत ना. आई आणि वहिनी आपापल्या रूम मध्ये आराम करत आहेत. गणू ही थोड्याच वेळापूर्वी झोपायला आत गेला."

"मग तू का नाही आराम करायला आत गेलीस?
बाहेर ऊन किती पडले आहे. पिल्लूला त्रास होईल ना!
हो ना पिल्लू. मम्माला काही कळतच नाही ना.."
म्हणत, सुबोध हसत अंजूकडे पाहतो.
ती ही बाळाकडे पाहून बोलते.
"आले पिल्लू' तुझ्या पप्पांना सांग की, मी आत्ताच उठलो आहे. तुम्ही येण्याआधी पाच दहा मिनिट झाले असतील मला उठून. मम्मा एकटीच बाहेर थांबली होती. मी उठल्यावर तिने मला ही बाहेर आणले."
म्हणत, अंजू' सुबोधकडे पाहून, तोंड वाकडे करते. तसा सुबोध हसतो. आणि त्याचे हसू पाहून, बाळही गोड हसते. अंजू' सुबोध आणि बाळाकडे पाहून सुखावते.

ती सुबोधला आत येण्यास सांगून, स्वयंपाक घरातून पाणी आणण्यासाठी जाते. सुबोध आत येवून बसतो.
पाणी पिऊन सुबोध बाळाला घेवून अंजूच्या खोलीत जातो. अंजू ही त्याच्या मागे खोलीत निघून येते.
दोघे मिळून जरावेळ बाळा सोबत खेळतात.
नंतर अंजू बाळाला दूध पाजून झोपवते.
आणि सुबोधला जेवण्यासाठी स्वयंपाक घरात चलण्यास सांगते. दोघे ही स्वयंपाक घरात येतात. आणि अंजू' दोघांचे ताट तयार करून घेते. दोघे जेवायला बसतात. तसा, सुबोध विषय काढतो.

"अंजू' अग मला येऊन किमान अर्ध्या तासाच्या वर वेळ झाला आहे. पणं, अजुन ही सासूबाई किंवा विजया वहिनींची काहीच चाहूल लागेना. त्या दोघी जेवल्या की नाही? नाहीतर आपल्या बरोबर जेवायला तरी बोलवं."
तसे, अंजू बोलते. इतक्या आरामात दोघी झोपल्या आहेत. म्हणजे, जेवल्या नसतील असे वाटत आहे का तुम्हाला?"

सुबोध' घास खात फक्त "हम्म!" करतो.

"सुबोध' खूप काही बदलले आहे इथे कालपासून.
मनीषा होती तो पर्यंत, ह्या घरात पाहुणचार, आपुलकी थोडी तरी दिसत होती. पणं, ती या घरापासून दूर होताच. इथल्या माणसांचे खरे चेहरे दिसायला लागले आहेत.
मला खरच नव्हत हो माहीत. माझेच कुटुंब इतक्या उलट्या काळजाचे असतील ते..."
अंजू' भरलेल्या डोळ्यांनी सुबोधकडे पाहत बोलते.

"अग काय बोलतेस तू अंजू?
"शिता वरून भाताची परीक्षा" करणे योग्य नाही. एका रात्रीत असा काय चमत्कार झाला आहे? की, तू तुझ्याच जन्मदात्यांना ,आणि भाऊ, वहिनीला सरळ उलट्या काळजाचे म्हणून रिकामी होत आहेस.."

अंजू' आपल्या हातातला घास पुन्हा ताटात ठेवून नमस्कार करते. आणि सुबोधला बोलते.
सुबोध तुम्ही असायला हवे होता इथे. म्हणजे, कळले असते तुम्हाला मी असे का म्हणतेय!
अहो, कालचे राहू द्या. पणं, आज सकाळपासून तरी मनीषाच्या काळजीने तुम्हाला कोणी फोन केलेला आठवत आहे का? बर ती या घरात नाही. म्हणून, तिच्या काळजीने कोणी खाणं पिणं सोडलेले दिसत आहे का?'
नाही ना!
आबा,शंकर भाऊ, आणि आनंद आपापल्या कामावर गेलेत. आई आणि वहिनी घरातले जुजबी काम करून, खाऊन पिऊन आपापल्या रूम मध्ये निवांत झोपल्या आहेत. या वरून तरी समजून घ्या मी असे का म्हणतेय ते!"

सुबोधही आपले जेवण आटोपते घेत बोलतो..
"हम्म!
जाऊदे अंजू. ज्याच्या त्याच्या भावना आणि विचार. आपण फक्त आपले कर्म चांगले करायचे.
अग हो! तुला सांगायचं राहिलं. मघाशी मी सिस्टरांना हॉस्पिटल मध्ये सोडायला थांबलो होतो. तेव्हा, बाबांचा कॉल आलेला मला. मनीषा वहिनींना शुद्ध आली आहे."

"काय खरच?
देवच पावला म्हणायचं." म्हणत, अंजू' वर बघून हात जोडते.

"हो ना! खरच देव पावला. नाहीतर डॉक्टरांनी सांगितले होते. चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात वहिनीला शुद्ध नाही आली तर, तिच्या जिवावर बेतेल."

"बापरे.
आता आहे ना ती ठीक?"

"हम्म! अजुन पूर्ण नाही. पणं तिने शुद्धीत येणे महत्त्वाचे होते."

"अजुन नाही म्हणजे?"

अग, अजुन तिचा ताप उतरला नाहीये. आणि खूप अशक्त आहे ती. डॉक्टर तर म्हंटले. तुम्ही लोक तिला खायला प्यायला देता की नाही?

इतक्यात, स्वयंपाक घरात अचानक भांड्याचा आवाज का येतोय? हे पाहण्यासाठी आत्त्याबाय दाराजवळ येतानाच, सुबोधचे शेवटचे शब्द त्यांच्या कानावर पडतात. आणि त्या चिडून बोलतात.

"व्हय व्हय! वाऱ्यावर सोडली हुती ना तिला आमी.
जेवण तर कधी दिलंच नाय तिला."

सुबोध आणि अंजू दोघे ही आत्त्याबायंचा आवाज ऐकून दचकतात.
अंजू उठून त्यांच्या जवळ येत बोलते. "अग आई, त्यांना तसे नव्हते म्हणायचे..
तू उगाच.."

"काय? म्या उगाच काय?
म्या ऐकलं की समद. तो डाक्टर' काय बी म्हणल. मंग काय तुमी बी तेच समजणार का जावयंबापू?"
आत्त्याबाय' सुबोधकडे पाहत विचारतात.

सुबोध आपल्या जागेवरून उठतो. आणि बोलतो.
"तसे नाही सासूबाई.
वहिनी खूप अशक्त झाली आहे. तिला, साधा पाण्याचा ग्लास उचलण्याची पणं ताकत राहिली नाहीये. म्हणून डॉक्टर तसे म्हंटले.
त्यात काय एवढं?"

"व्हय! एवढं काय हाय त्यात? अस तूम्हासणी वाटलं व.
पणं, आमच्या सारख्या गावच्या लोकांना त्यो आमचा आपमान वाटतू.
त्या मनीला' आमी कधी मागं सर बी म्हटल नाय. अन् आता ती आमचीच आब्रू येशीवर ( वेशीवर) टांगायला चालली हाय की.."

आत्त्याबायंचा आवाज ऐकून, विजू ही झोपेतून उठून दिवाणखान्यात येते. स्वयंपाक घरातून आवाज येतोय हे कळल्यावर ती कोणी आपल्याला पाहायला नको हा विचार करून, पटकन बाथरूम मध्ये शिरते.

आत्त्याबायंचा रूद्र अवतार बघून अंजू बोलते.
"आई तू शांत हो आधी. सुबोध तुम्ही जा बरं बाहेर. आम्ही आलोच. म्हणत, अंजू डोळ्यांनीच सुबोधला बाहेर जायला खुणावते. तसा, सुबोध जास्त वाद न वाढवता, अंजूच्या खोलीत निघून जातो.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.


🎭 Series Post

View all