मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२१

काय मग? कसा वाटला आजचा भाग? मनीषा मध्ये झालेला बदल आवडला ना.. पणं तो इतका सहज नाही झाला बर का! त्याची ही एक कथा आहेच जी हळू हळू उलगडेल.तेव्हा वाचत रहा मनीषा - लढा अस्तित्वाचा.
चार वर्षा नंतर
पुण्यात...

आज आभाळ चांगलेच भरून आले होते. थोड्याच वेळात पावसाची शक्यता होती. वातावरणही चांगलेच गरम झाले होते.
अंजूच्या घरात मात्र, वेगळीच लगबग सुरू होती..
छोटा संदेश ( अंजू आणि सुबोधचा मुलगा) इकडून तिकडे नुसता पळत होता.
अंजू पुन्हा एकदा अवघडलेल्या अवस्थेत होती. स्वतःच्या रागावर नियंत्रण करत, संदेशला एकाजागी थांबविण्याचा प्रयत्न ती करत होती. सुबोध आणि त्याचे काही मित्र डेकोरेशन मध्ये गुंग होते. त्याचे बाबा आणि आई काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
घरात पाहुण्यांची लगबग सुरू झाली होती ती वेगळीच.
आज अंजूचा ओटी भरण कार्यक्रम होता.
आता या वेळेस दोघांनाही बर्फीची अपेक्षा होती.
नटखट संदेशचे पाय मात्र एका जागी थांबत नव्हते. शेवटी, चिडून अंजूने त्याला' आपल्या अत्त्याला बोलवून घेवून यायला सांगते.
तसा, संदेश सुसाट घराबाहेर पळतो.
खालच्या मजल्यावर राहत असलेल्या आपल्या अत्त्याला तो दारात जाताच हाक मारू लागतो.

"आत्तू...
ये आत्तू' तू कुठे आहेस?
आत्तू..."

"आर देवा..
संदेश राव' तुम्ही हायासा व्हय ? तरी म्हटल म्या, लाडक्या आत्तूच्या नावानं कोण गजर करतंय?"

'आज्जी' आधी सांग आत्तू कुठे आहे?
आईने' तिला आत्ताच्या आत्ता बोलावलंय.
हे सांगायला पाठवलं मला."

"व्हय का बाबा? आर, तुझी आत्तू' आत्ताच बाहिर गेली की, तू बघितली नाय का?"

"अस कस होईल?
मी तल दालानेच आलो की.
मला तल, नाही दिसली ती."

"आत्ता ग बया!
मग काय उडत गेली की काय तुझी आत्तू?"

"हेऽ हेऽ हेऽऽ
तिला पंख कुठं आहेत उडायला? काय पणं बोलते तू आज्जी."

"अरे लबाडा!
तुला तर समदच माहीत हाय की.
बर त्ये जावं दे.
म्या ना, गोड गोड शिरा केला हाय. कोण खाणार हाय का?"

"मीच की. दुसल कोण नाहीच इथे तर, कोण खाईल. हेऽ हेऽ हेऽऽ"

इतक्यात, संदेशची आत्तू वॉशरूम मधून बाहेर येते.
गुलाबी सलवार कमीज मध्ये, मोकळ्या भिजलेल्या केसात, तीचे रूप आणखी उजळलेले असते.
तिला पाहताच, संदेश पळतच, तिच्याकडे जातो. आणि "आत्तू" म्हणत, बिलगतो...

त्या वेळी, एफ एम वर नेमके गाणे सुरू असते.

फिरुनी नवी जन्मेन मी
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी

स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा

भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी हरपेन मी
हरवेन मी हरपेन मी
तरीही मला लाभेन मी
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी

आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी बहरेन मी
लहरेन मी बहरेन मी
शिशिरांतुनी उगवेन मी
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
( गाण्याचे लिरीक्स. साभार. गूगल.)


गाण्यातल्या शब्द न शब्द, आत्तु मनातून पित असते.
तोंडाने गुणगुणत, स्वतःला त्या गाण्याच्या कडव्यात शोधणाऱ्या, आत्तूला
बिलगलेला संदेश' तिच्याकडे पाहत बोलतो..

"कुठे होतीस तू आत्तू?
तुला किती हाका मालल्या मी."

संदेशचे ते थोडे स्पष्ट, थोडे बोबडे बोल ऐकून,
आत्तू गालातल्या गालात हसते. आणि संदेशला खुर्चीत बसवते. ओल्या तोंडावरून ओघळणाऱ्या थेंबाना टॉवेलने हळुवार टिपून. ती आपले ओले केस अलगद पुढे करते. आणि त्यांना टॉवेलचा एक झटका देते. तसे, तिच्या केसातल्या पाण्याचे टपोरे मोती संदेशच्या चेहऱ्यावर उडतात. आणि तो थोडस चिडून लाडिकपणाने बोलतो.

"ये आत्तू. मी भिजलो ना ग."

तसे, संदेशची आत्तू म्हणजेच, मनीषा,आपले गुणगुणने विसरून, हसतच वळते. आणि संदेशला अंगावर घेवून बोलते.

"हो की रे राजा. मला लक्षातच नाही आले." मनीषा आपले कान पकडून बोलते. "सॉली बर का."
संदेश' हाताची घडी घालून दुसरीकडे पाहत, नुसता "हुं" करतो.

मनीषा केसांना व्यवस्थित टॉवेल गुंडाळते.
आणि संदेश जवळ येवून त्याला पुन्हा, "सॉली ना राजा." म्हणत, गुदगुल्या करू लागते. तसा, संदेश "नको आत्तू. नको ना." म्हणत, हसत तिला आडवू लागतो.
मनीषा त्याला, आपल्या कडेवर उचलून घेत, कडकडून मिठी मारते. संदेशही आपल्या आत्तूला घट्ट मिठी मारतो.
मनीषा त्याचे पापे घेत विचारते.

"बर, आता गेला ना रुसवा."
"हम्म"
"आणि काय रे लाडू, तू आणखी काय म्हणत होतास?"
"अग, आत्तू' तुला किती हाक मालली मी, मम्मी ने तुला बोलवलं आहे. कायतली काम आहे वाटत तीच."
"बर! जाऊया की मग.
आधी तू' आज्जीने केलेला शिरा खाणार आहेस ना?"
"हो ग!
विसललोच मी.
ये आज्जी' शिरा दे ग मला."
"व्हय रे माझ्या लाडोबा. देते ह." म्हणत, मनीषाची आई' शिरा आणायला स्वयंपाक घरात गेली.
तो पर्यंत, मनीषा आणि संदेश गप्पा मारत बसले.

"आत्तू तुला माहित आहे का?"
"नाही...
काय रे?"
संदेश' आज्जी किचनमध्ये असल्याची खात्री करून घेतो. आणि मनीषाला आपल्या जवळ येण्यास सांगतो.
मनीषा त्याच्या जवळ येते. संदेश हळूच बोलतो.
"अग, आज्जी म्हणत होती की, तू ना' उडत गेलीस. तुला पंखतली आहेत का?
हीऽ हीऽ हीऽ..."

मनीषा डोक्यावर हात मारत बोलते.
"अरे देवा. खरच की, मला तर पंखच नाहीत." "आज्जीला तर काही कळतच नाही. काही पणं, बोलत असते." म्हणत दोघे ही हसतात.

मनीषाची आई' त्या दोघांना मनसोक्त हसताना पाहून, प्रेमाने दुरूनच त्यांच्यावरून आपले हात फिरवून बोटे मोडते.
आणि मनातच म्हणते. "कोणाची नजर नको लागायला माझ्या लेकरांना."
आणि पटकन दोन प्लेट शिरा घेवून बाहेर येते.
संदेश' शिरा खाण्यात मग्न होतो. मनीषा' आईला, संदेश बरोबर शिरा खायला सांगून, स्वतः पटकन बेडरुम मध्ये जाते. आणि स्वतःचे बऱ्यापैकी सगळे आवरते. तो पर्यंत, संदेशही शिरा खाऊन मोकळा होतो. आणि मनीषाने' त्याच्यासाठी आणलेल्या खेळण्यांसोबत खेळत बसतो.

मनीषाची' आई मात्र, मनीषाकडे काळजीने पाहत असते. आईला आपल्या आसपास, असे काळजीत फिरताना पाहून, मनीषा' तिच्या जवळ येते आणि तिला खुर्चीत बसवते. आणि विचारते. "काय झाले आई? अशी का अस्वस्थपणे माझ्या मागेपुढे फिरत आहेस?"
तेव्हा, आई डबडबलेल्या डोळ्यांना पुसत म्हणते.
"मने बाळा, मला लय भ्या (भीती) वाटत आहे."
"का ग, काय झाले?"

"अग, आज अंजी तायचे ओटीभरण हाय. म्हंजी, तुझ्या सासरची लोकं पणं येणार असतील की!!"
"आई तू उगाच काळजी करतेय. पहिली गोष्ट तर, आता ते माझे सासर राहिले नाहीये.
त्यामुळे, तू इतका विचार नको करू.
ते आले तरी, त्यांच्या मुलीसाठी येतील.
अग, मरणाच्या दारात पोहचलेल्या सूनेसाठी, त्यांच्याकडे तेव्हा वेळ नव्हता. तो दिला असता तर...'
मनीषा क्षणभर त्या विचारात हरवते. आणि पुन्हा ते विचार झटकून बोलते.
"तरी ही, मी त्यांना पुन्हा संधी देवून पाहिली होतीच ना?
पणं, काय केले त्यांनी?
जाऊदे. आजच्या आनंदी क्षणी ती आठवण ही नको मला.
तुला एवढच सांगते मी. की, तू नको काळजी करू. ते लोक, आता माझ्या आयुष्याचा भाग नाहीयेत. तेव्हा, त्यांच्या येण्या न येण्याने मला काही फरक पडत नाही."

"अग पणं..."
"आई.
अग, अंजू ताईने' सॉरी आता ती माझी वहिनी आहे हे विसरलेच मी. तू ही लक्षात ठेव आई.
तुझ्यासाठी ती आज ही अंजू ताई आहे. आणि
माझ्याही मनात, तीच भावना आहे. ताई काय आणि वहिनी काय? नाव बदलले पणं, तिच्यासाठी माझी भावना मात्र कायम आदराचीच राहील.
तर, मी तुला काय सांगत होते.

"ह्येच की, आंजी ताय ने तुला नवीन.."
"हा तर, वहिनीने मला एक नवीन आयुष्य दिले आहे. ते असेच पुन्हा त्या गोष्टीत अडकण्यासाठी का? नाही ना? अग, आज मी तुझ्याशी इतकी शुद्ध बोलू शकते. ते तिच्या मुळेच ना!
आता मी खूप पुढे गेले आहे ग...
मग, तू का उगाच मी विसरलेल्या गोष्टींना पुन्हा उजाळा द्यायला भाग पाडत आहेस?
मी विसरले. तसेच, तू ही विसरून जा. तुझी ती मनी कधीच मेली समज. आता ही मनीषा नवीन आहे. तिला आपले ध्येय ही माहीत आहे. आणि वर्तमानात तिला काय करायचे आहे हे ही.
तू तर, आभार मानायला पाहिजे, सुबोध दादा आणि अंजू वाहिनीचे, तेव्हा त्या अवघड क्षणी ते माझ्या पाठीशी देवासारखे ठाम उभे राहिले नसते तर, तुझ्या या मनीचे शेवटचे दर्शन पणं, कदाचित तुला झाले नसते."
अग बाबांना तर कुठे..."
म्हणत, मनीषाचे डोळे पाणावतात.

आईंना पणं भरून आल्यासारखे होते. आणि त्या पटकन बोलतात.
"ये बाय माझे. भरल्या घरात असल वंगाळ नग बोलुस."
"नको ना बोलू. मग, तू पणं आता त्यातून बाहेर पड.
मला नाही जगायचं पुन्हा त्या आठवणीत.
खूप त्रास होतोय ग आई' त्या आठवणींचा."
"बर बाय. नाय ईषय (विषय) काढत पुन्हा. जावं दे त्ये सगळ.
आता थोडा शिरा खा. अन् मग, जा वरच्या घरी. बघ अंजी ताय काय म्हणत्यात त्ये!"

क्रमशः
©️®️ प्रियदर्शनी देशपांडे.

🎭 Series Post

View all