मनीषा - लढा अस्तित्वाचा.भाग.२५.

मनीषा झालेल्या गोष्टी विसरून, पुन्हा सुबोध आणि अंजूच्या आनंदात सहभागी होईल का? मयंकला जेव्हा मनीषाचा भूतकाळ कळेल तेव्हा तो' कसा रीॲक्ट होईल?त्याच्या मनातील मनीषा विषयीच्या, प्रेमळ भावना तो स्वीकारेल की, पुन्हा आपल्या वाटेने निघून जाईल??
अंजूने पटकन सुबोधचा हात पकडला. आणि त्याला दाराकडे पाहायला सांगितले.
सुबोधने तिकडे पाहिले. त्याच्या सोबत सगळ्यांनीच दाराकडे पाहिले.
मनीषा' तर एकदम अस्वस्थ झाली. पणं, तरीही ती स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करू लागली.
सुबोधने' अंजूला पकडुन हळुवारपणे जागेवरून उठवले. आणि तोच आत्त्याबाय' अंजूकडे येत बोलल्या. "अग बाय माझे. बस बस उठू नग. आमी हाय हित."
"आई' अग ये ना. इकडे ये. नाय बाळा. असू दे. तुमचं होवू द्या समदं. मग म्या येते."

"अहो सासूबाई' या हो इथे. आधी तुमच्या मुलीचे औक्षण करा."
"राहू द्या वं जावयंबापू. तुमचं समदं आटपून झालेल दिसतंय. आमालाच जरा उशीर झाला म्हणायचा यायला. आता त्ये पेढा का बर्फी येती, तेवढं बघा बिगी बिगी (लवकर) म्हंजी झालं."

"आई' अग, किमान ओवाळून तरी घे."

"हो अंजूच्या आई. तिला ओवाळून घ्या तुम्ही. कधी पासून, तुमची मुलगी वाट पाहत होती तुमची."
"आवं, विहीन बाय." .

"आई' घे ना ग प्लीज." अंजूच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
"अग बाय माझे! रडू नगसं. घेते म्या ओवळून. द्या ताट द्या तेवढं विहीन बाय." म्हणत, त्या ताट घेवून अंजूला ओवाळतात."

आनंद' मागे उभा राहून, सगळ पाहत असतो. तोच, त्याची नजर अंजूच्या शेजारी उभी असलेल्या, मनीषावर स्थिर होते. मनीषा ही हळूच चोर नजरेने त्यालाच पाहत असते. तिला' कोणीतरी, 'मनावर मैलाचा दगड' ठेवल्या सारखे वाटत असते. ओवाळून झाल्यावर, अंजू आणि सुबोध झाकून ठेवलेल्या डिश मधील, एका डिशला ओपन करतात. आणि त्यात बर्फी निघते. दोघांच्या ही चेहऱ्यावर समाधान पसरते.

त्या नंतर, एक छोटा केक कापून आनंद द्विगुणित साजरा केला जातो. मनीषा सर्वांना केक वाटप करु लागते. आनंद एकटक तिच्याकडे पाहत असतो. आत्त्याबाय त्याच्या जवळ जाऊन उभ्या राहतात. आणि हळूच त्याला बोलतात.
"बघितलस् आनंदा, इथं आपण येण्याची कोणाला काय बी पडली नव्हती. समदं आधीच उरकलं हुतं. म्या आली म्हणून, पून्हांदा (पुन्हा) त्ये ओवळायच नाटक केलं बघ. नायतर कोण हाय का आपल्याला ईचारणार? म्या म्हणत होते ना, नको जायला म्हणून, त्येचं बराबर हुतं बघ "

"अग आई' आपण उशिरा आलोय म्हंटल्यावर कार्यक्रम सुरू होणार हे ठरलेलेच होत. बाकी लोकं किती वेळ वाट बघत बसणार आपली? जाऊदे ते. तू आलीस म्हणून, अंजू किती खुश झाली ते बघ."

"हम्म!
नुसत नाटक हाय त्ये. मला कळत नाय व्हय. त्या मनीला बघीतलीस का? लयच नटमोगरी झालीय की आता. शेरात (शहरात) राहुन, पख (पंख) फुटलत बग तिला."

"आई!!!"
इतक्यात, मनीषा. त्यांच्या समोर येत केकच्या प्लेट देते.
"आम्हास्नी नको हाय." म्हणत, आत्त्याबाय तिच्याकडे न बघताच तोंड फिरवतात. पणं, आनंद तिच्या हातून प्लेट घेतो.
मनीषा तिथून पुढे जाते. तोच, मयंक आणि विवेक तिच्या आईला घेवून घरात येतात.
आईला पाहून मनीषा खुश होते. आणि तिच्याकडे जात बोलते.
"आई. अग किती वेळ?
तुला लवकर यायला सांगितले होते ना, मी आणि आई बाबांनी."
"हो ग बाय. पणं, मलाच नको वाटलं. माझ्या मेलीच्या हातानं आंजी तायला ओवळून एवढ्या चांगल्या कार्यक्रमात कश्याला ईष ( विष ) कालवायच बाय; कुणाला नाय आवडलं तर..."

"काकू, अहो तुम्हाला म्हंटले ना मी. अस काही नसते. सगळे आपल्या मनाचे खेळ असतात. तुम्ही इथे आल्याने इथल्या कार्यक्रमात आणखी उत्साहच संचारेल. ना की, विष बिष पसरेल. हो ना विक्या..?"

"हो तर काय? काकू तुम्ही उगाच टेन्शन घेता. चला आता अंजू वहिनीला भेटा तरी. त्यांची खात्री पटली ना की, तुम्ही इथे आलाय ते. तेव्हाच त्यांना अन्न गोड लागेल बघा."
"व्हय व्हय पोरांनो. आलेच म्या तुमी व्हा पुढं."

मनीषा डोळ्यांनीच, मयंक आणि विवेकचे आभार मानते. मयंक पुन्हा तिच्या डोळ्यात हरवतो. विवेक त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे भाव बघून त्याचे हरवणे समजतो. आणि पटकन त्याला ओढतच घेऊन सुबोध आणि अंजूकडे जातो.

"विक्या' अरे थांब. अरे थांब ना.. कशाला ओढतोयस तू मला? मी काय तुला गाय किंवा बैल वाटलो का?" "बरोबर बोललास मया. बैलच आहेस तू. कसा बघत होतास तू मनूकडे? तिला किती ऑकवर्ड वाटेल कळतय का तुला?"
"काहीही. तिने डोळ्यांनी किती छान आभार मानले आपले. तेच पाहत होतो मी."

"मया' तू आता किती ही लपव. पणं, तुझ्या मनात काय चालू आहे ते कळतय बर मला."
"क.. का... काय म्हणायचं आहे तुला?"
"तुझ्या क.. का... कायच? उत्तर! तुला चांगल माहीत आहे. मी फक्त वाट पाहतो. ते तू कधी सांगतोस ते."
"ये विक्या' चल लवकर. तो बघ सुबोध आपल्याला बोलवतोय. म्हणत, मयंक' विवेकला ओढत सुबोधकडे नेतो.

"मने पोरी. ही आत्ता गेलेली पोरं' लय गुणाची हायत ग, आपली त्यांच्याशी ओळख ना पाळख पणं, पोरांनी त्यांच्या स्वभावानं थोड्याच येळात माझ मन जिंकल बघ.
कोण हायत कोण ही?"
"अग आई' ते दादाचे खास मित्र आहेत. ते तिघ पणं एकत्र शिकत होती."
"व्हय. चांगली मित्र भेटल्यात सुबोधरावांना."
म्हणत, आई पुढे होतात. तोच त्यांची नजर आनंद आणि आत्त्याबायंवर पडते.

"मने' अग ही दोघं आलीत की. आबा बी आलाय का इथ?"
"आई जाऊदे ना."
"अग पणं,"
"आई' ते त्यांच्या मुलीसाठी आणि बहिणीसाठी आलेत. आबा नाही आले. आणि बाकी काही मला विचारू ही नकोस. मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. हे मी आधीच तुला.."
"हो ग बाय माझे."
"चल वहिनीला भेट तू आधी. म्हणत, मनीषा आईला घेवून अंजू आणि सुबोधकडे नेते."

अंजू आणि सुबोधजवळ, मयंक' विवेक त्याचे बाकी मित्र मंडळी जमा झालेली असतात. सगळ्यांची चेष्टा मस्करी सुरू असते. म्हणून, मनीषा लांबूनच अंजू आणि दादाला आई आल्याचे दाखवून, तिला सरळ सुबोधच्या आईकडे घेवून जाते.

आत्त्याबाय ते पाहून बोलतात.
"अग बया' ही बी हाय व्हय मनी सोबत? मला वाटल एकटीच असल."
"आई जाऊ दे ना."
"काय जावं दे? या अवदसेनं इथं इवून, माझ्या पुरीच्या जीवनाची वाट लावली हाय. दिसत नाय का तुला?"
"आई. आत्ता उगाच विषय वाढवू नकोस. तू जा आत जाऊन बस अंजूच्या रूममध्ये."
"हा जातेच मी. माझे पाय बी लय दुखत हायत." म्हणत, त्या तिथून जातात. मनीषा आईला' सुबोधच्या, आई' बाबांच्या रूम मध्ये सोडून बाहेर येताना, आत्त्याबाय आणि ती समोरासमोर येतात.
अंजू जरा दचकते.

आत्त्याबाय तिला पाहून बोलतात.
"अग बाय! बाय! बाय. मने' तू हायस व्हय? म्या ओळखलच नव्हतं की, मगाशी तुला. लयच बदलली हाय की तू." मनीषा' कसे तरी हसून फक्त "हम्म" करते.
"मग काय? आता तर तू मोकळ्या जनवरा सारखी सुटली अशिल (असशील) की? कुणी आडवणार बी नाय आता म्हणा. म्हंजी आता तुझी मजाच हाय म्हणायचं की?"

मनीषा चिडते. आणि बोलते.
"कस आहे ना? तुमचे विचार ही तुमच्या वागण्यासारखे झाले आहेत. त्यांना कसला तो लगामच राहिला नाहीये. आपण कुठे आहे? काय बोलतोय? कोणाशी बोलतोय? याच तरी जरा भान ठेवा."

"व्हय का? तुझ्या संग अजुन कोणत्या भाषेत बोलाया (बोलायला) पाहिजे म्या?
आपली नाटकं दाखवून, माझ्या जावयावर मोहिनी टाकलीस. माझ्या पुरीला बी, आपल्या बाजून केलंस. आणि आमच्या नात्यात ईष (विष) कालवलस. अन् तुझ्या संग म्या गोड बोलायची अपिक्षा (अपेक्षा) ठिवतीस व्हय ग सटवे!
"तोंड सांभाळून बोला आत्त्याबाय.
आता मी तुमची सून नाहीये की, तुम्ही जे बोलला ते मी निमुटपणे ऐकेन."
"व्हय का?
तुला' म्याच सून मानत नाय आता. आमची मनी त्याच दिशी मिली. जवा ती नाटक करून घरातून पळाली."

"कोण घरातून पळाली? अहो जरा तरी लाज ठेवा. मरणाच्या दारात होते मी. जगण्यासाठी धडपडत होते. तरी तुम्हाला पाझर फुटला नाही. एकदा तरी हॉस्पिटल मध्ये येवून माझी अवस्था पहायची होती तुम्ही?
तुमची सून होते ना मी? मग माझ्याबद्दल इतकं ही करावं वाटलं नाही तुम्हाला?'
स्वतःच्या पोराच्या चुकांना लपविण्यासाठी, मला दिवस रात्र फक्त आणि फक्त टोमणे देत राहिलात. माझ्याकडुन जितके काम करून घेता येईल, तेवढे करून घेतले तुम्ही. आणि बोलत आहात, मी नाटक केले. आधी स्वतःच अंतरंग बघा. म्हणजे कळेल तुम्हाला नाटक मी नाही तुम्ही सर्वांनी माझ्या सोबत केले ते.."

घरात पाहुण्यांची वर्दळ सुरूच होती. प्रत्येक जण येता जाता मनीषा आणि आत्त्याबायंना पाहून पुढे जात होते.
त्यात आत्त्याबायंनी नको तिथे उभे राहून विषय काढला होता. ह्या मुळे वातावरण तणावपूर्ण झालेच होते.
मयंकला हॉल मधून, मनीषा' अंजूच्या, आई सोबत चिडून काही तरी बोलत असल्याचे दिसते. तसा तो विवेकला दाखवतो. दोघांच्या ही मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
आनंद ही तिथेच कोपऱ्यात उभा राहून, अंजू आणि सुबोधचे फोटो सेशन पाहत असतो. तेव्हाच त्याचे लक्ष त्याच्या आईकडे जाते. तिच्या सोबत मनीषाला पाहून, तो काय समजायचे तो समजतो. आणि पटकन त्यांच्याकडे जातो.

"आई तू अजुन इथेच आहेस! चल आत चल पहिली."
"व्हय. पणं, ही बया बग की माझ्या संग.."
"आई तू चल म्हणतो ना, मनीषा सॉरी तू जा. मी बघतो आईकडे." म्हणत, आनंद' आईला ओढत रूम मध्ये नेतो.

मनीषा स्वतः च्या रागाला आवरण्यासाठी, मोठयाने श्वास घेते. आणि आसपास न बघता, कोणाशी काहीही न बोलता, डोळ्यातले पाणी लपवत, तडक आपल्या घरी निघून जाते. मयंक आणि विवेक दुरूनच तिला पाहत असतात.

"मया मला वाटतं, वहिनीच्या आईचे अन् मनूचे काहीतरी मॅटर झालेलं दिसतेय."
"हुं. मला ही तसेच वाटत आहे."
"आपण जाऊन विचारुया का मनूला? काय झाले ते तरी कळेल!"
"नाही रे मया. ती आपल्याला नाही सांगणार."
"हम्म ते पणं आहे म्हणा.
पणं मग.."
"आता शांत बस. सुबोध आणि अंजूचे फोटो सेशन संपले की, आपण सुबोधला सांगू. मग कळेलच आपल्याला ही."
"हा ते योग्य होईल."
म्हणत, मयंक आणि विवेक पुन्हा, सुबोध आणि अंजूकडे जातात.

क्रमशः
©️®️प्रियदर्शनी देशपांडे.

🎭 Series Post

View all