' ताई, माझ्या लेकीचं अंग काल रात्रीपासून तापलं आहे. नुसती झोपून आहे ती.
मला आज नाही जमणार यायला . आजचा दिवस ऍडजस्ट करा फक्त.
मला आज नाही जमणार यायला . आजचा दिवस ऍडजस्ट करा फक्त.
सविताने आपल्या मालकिणीला म्हणजेच चेतनाला विनंती केली.
अश्या आयत्यावेळी सुट्ट्या कशा काय मागतेस गं तू?
माहितेय ना तुला आम्हाला किती त्रास होतो ते ?
पोरीला औषधं दे आणि ये वेळेवर. नाहीतर उद्यापासून कायमची येऊच नकोस.
चेतनाने आपलं बोलणं संपवून रागात फोन ठेवून दिला.
माहितेय ना तुला आम्हाला किती त्रास होतो ते ?
पोरीला औषधं दे आणि ये वेळेवर. नाहीतर उद्यापासून कायमची येऊच नकोस.
चेतनाने आपलं बोलणं संपवून रागात फोन ठेवून दिला.
इथे सविताने भरल्या डोळ्यांनी आपल्या १२ वर्षाच्या लेकीला कुरवाळले आणि तू झोपून रहा मी लगेच येते बोलून निघाली.
घरात शिरताच भरभर तिने नाश्ता बनवला आणि डायनिंग टेबलवर चेतना आणि प्रवीणला नेऊन दिला.
दुसरीकडे तिने त्यांच्या टिफीन साठी पोळी भाजी करायला घेतली.
दुसरीकडे तिने त्यांच्या टिफीन साठी पोळी भाजी करायला घेतली.
बघितलंस ना ..प्रवीण.. कामावरून काढून टाकायची भीती दाखवली तर कशी चटकन आली ते.
यांना असंच धाकात ठेवावं लागतं.
चेतना स्वतःच्या हुशारीवर खुश होत म्हणाली.
यांना असंच धाकात ठेवावं लागतं.
चेतना स्वतःच्या हुशारीवर खुश होत म्हणाली.
पण सविताच्या चेहऱ्यावर दिसणारी लेकीची काळजी, प्रेम , कामं आटपून घरी जायची घाई हे सर्व चाणाक्ष प्रवीणच्या नजरेतून सुटले नाही.
अगं पण तिची मुलगी आजारी आहे . दिली असतीस एखादी सुट्टी तर काय बिघडलं असतं? तसंही तिने गेल्या २ महिन्यात एकतरी सुट्टी घेतली आहे का ? .....- प्रवीण
तुला काय सांगू आता ? अरे मी पण काल रात्री बॉसला सिक लिव्ह मेल टाकला.
माझ्या ताईची उद्या क्लायंट सोबत मीटिंग आहे आपल्या शहरात. म्हणून ती आज राहायला येणार आहे.
आम्ही दोघी आज मस्तपैकी मुव्ही बघायला जाणार आहोत. त्यानंतर भरपूर शॉपिंग मग लंच.
आता मला सांग मी ताई सोबत जाऊ की घरातली कामं आवरत बसु? तसंही एखादा दिवस तरी नको का स्वतःसाठी ?
आणि तिलाही नेमकी आजच सुट्टी पाहिजे होती.

चेतनाच्या या उत्तराचा प्रवीणला फार राग आला.
मग राहू द्यायची ना कामं एखादा दिवस. थोडीतरी माणूसकी दाखव गं. तिला पैशाची, नोकरीची गरज आहे म्हणून ती आली आणि तू तिच्या मजबुरीचा फायदा घेतेस?
सविता sss सविता ssssss
प्रवीणने हाक मारली तशी सविता लगबगीने टिफीन घेऊन आली.
प्रवीणने हाक मारली तशी सविता लगबगीने टिफीन घेऊन आली.
सॉरी ,जरा उशिर झाला डबा भरायला. हे घ्या.
प्रवीण - सविता ते डब्याचं राहू दे. तुझ्या मुलीला तुझी गरज आहे. तू लगेच निघ. आणि हे थोडे पैसे घे. यातून मुलीसाठी औषधं आणि चांगली फळं घे. आणि तिला बरं वाटेल तेव्हाच तू आलीस तरी चालेल.
आभार मानून सविता निघून गेली.
हे तू चांगलं नाही केलंस हा प्रवीण
अरे अश्याने सोकावतील ही लोकं.
तिचं वाक्यं पूर्ण होण्याआधीच प्रवीण ऑफिसला निघून गेला.
अरे अश्याने सोकावतील ही लोकं.
तिचं वाक्यं पूर्ण होण्याआधीच प्रवीण ऑफिसला निघून गेला.
थोड्यावेळाने चेतनाची ताई घरी आली. दिवसभर दोन्ही बहिणी मॉल मधे फिरल्या . आधी मुव्ही , लंच त्यानंतर भरपूर शॉपिंग करूनच संध्याकाळी घरी परतल्या.
दुसऱ्या दिवशी व्हिजिट साठी ताई मलुल चेहऱ्याने तयार होऊन बाहेर आली. चेतना आणि प्रवीण पण एकत्र बाहेर पडू म्हणून वाट पाहत होते.
हे काय ताई एवढी थकल्यासारखी का वाटत आहेस ?
आणि हे काय तुझं अंग तर चांगलच तापलं आहे. बस तू आधी इथे.
चेतना काळजीने म्हणाली.
आणि हे काय तुझं अंग तर चांगलच तापलं आहे. बस तू आधी इथे.
चेतना काळजीने म्हणाली.
माहित नाही गं. पहाटेपासूनच जरा अशक्त वाटत होतं. गरगरल्या सारखं होतंय. - ताई
चेतना - आणि तरीही तू निघालीस ? ते काही नाही आज सुट्टी घे . आराम कर .
डोळ्यात पाणी आणून ताई म्हणाली, काही फायदा नाही त्याचा. मी मघाशीच क्लायंट ला मेसेज टाकला. पण त्यांनी सरळ डील कॅन्सल कराव लागेल अस सांगितलं आहे.
आणि जर हे कॅन्सल झालं तर माझी नोकरी गेलीच समज.
आणि हे मला परवडणारं नाही.
आणि जर हे कॅन्सल झालं तर माझी नोकरी गेलीच समज.
आणि हे मला परवडणारं नाही.
खरंय ताई..हल्ली लोकांना त्यांच्या कामाशी देणंघेणं आहे. माणुसकी उरलीच नाही. अनपेक्षितपणे प्रवीणने चेतना ला टोला लगावला.
ताईने मोठ्या मुश्किलीने चेतनाकडे पाहिलं
आणि पर्स उचलून निघून गेली.
जाताना तिची नजर चेतनाला माणुसकीने वागण्याचा धडा देऊन गेली.
आणि पर्स उचलून निघून गेली.
जाताना तिची नजर चेतनाला माणुसकीने वागण्याचा धडा देऊन गेली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा