Login

मराठी भाषा..!

मराठी भाषा गौरव दिनच्या निमित्त सादर केलेली मराठी भाषा कविता..!
मराठी भाषा गौरव दिन..!
मराठी भाषा...

मातृभाषा आपली मराठी
प्रेम वात्सल्य भावनांची गोडी
विचार व्यक्त होण्याचे माध्यम
शब्दबद्ध वर्णनाची जोडी

मराठी भाषा एक विषय
आविष्कृत संस्कृतीची छाप
थोर मोठ्यांचे जीवनचरित्र
क्रम प्राप्त मोठा व्याप

भाषेचे जीवनस्पर्श परिस्पर्श
अनुभवाचे कथनही फार
सामाजिक अध्यात्मिक मूल्ये
नैतिक मूल्यांचे खोलते द्वार

मराठी हृदयाची भाषा
दैनंदिन जीवनाचा आधार
कळ्यांची फुले व्हावी तसे
साहित्यरूपाने होई स्वार

माणसाला व्यक्त होता येई
व्यक्त होणे स्थायी भाव
मातृभाषा संबंध दृढ करी
होई समृद्ध मनाचे गाव...

©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
0

🎭 Series Post

View all