मी महाराष्ट्रात जन्माला आल्याचा आणि अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी माझी मातृभाषा असल्याचा मला अभिमान आहे.
मराठी भाषेचे उज्वल अस्तित्व, जतन आणि संवर्धन त्याचप्रमाणे तिच्या उन्नतीकरता मी कटिबद्ध आहे.
जगभरात कुठेही असलो तरी मराठी भाषेवरील निरतिशय प्रेमात खंड न पडू देण्याची ग्वाही एक सच्छा मराठी भाषिक म्हणून मी देत आहे.
कुठल्याही सांस्कृतिक बदलांच्या व भाषेच्या आक्रमणसमोर मराठीची पीछेहाट होऊ न देण्यासाठी व्यवहारात तिचा सातत्यपूर्ण वापर करणे ही माझी जबाबदारी आहे.
मराठी भाषा ही माझ्यासाठी मायेची पांघर आहे. तिच्या सौंदर्यवृद्धीसाठी प्राणपणाने झटणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी अहर्निश पार पाडत राहीन.
?? मी मराठीचा ! मराठी माझी ! जय महाराष्ट्र ! जय मराठी ! ??
कुमारी - स्नेहल गोविंद चव्हाण, देवरूख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा