Login

मैत्रेय भाग २

मैत्रीचे अनोखे बंध
भाग दुसरा

ईश्वरी, काव्या आणि सुधीर ही तीन त्रिकुट होती. यांची मैत्रीच वेगळी होती. पण कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा कधीच करत नसत. हाती  घेतलेलं  काम त्या दिवशीच पूर्ण झालं पाहिजे. त्यांना त्यांच्या कामात समाधान मिळत होतं. कामात  व्यस्त असूनही तिघेजण खूप मस्ती करायचे. त्यांच्या या त्रिकुटात  अजून एक मित्र सामील झाला. या त्रिकुटाची आता खऱ्या अर्थाने चौकट पूर्ण झाली होती.

या त्रिकुटाची चौकट राजच्या येण्याने पूर्ण झाली. राज या ऑफिसमध्ये नवीन होता. त्याला ऑफिस जॉईन करून एक वर्षही झालं नसेल. तरीही त्यांचे मैत्रीचे बाँडिंग भारी होते. सुरुवातीला राज कोणाशी बोलायचा नाही.

"मैत्री नको करायला, मैत्री केल्यावर मित्रमैत्रिणी सोडून जातात." असं त्याला वाटायचं.

"ओळख नाही हेचं बरं. आपण भलं आणि आपलं काम भलं." असाच तो राहायचा. हळूहळू सगळ्यांशी त्याची ओळख झाली. ती ओळख फक्त कामापुरती.

मुंबई सोडून राज पुण्याला आला तरी आठवणी पाठ कधीच सोडत नाहीत. राज हा लहानपणापासून मुंबईत राहिलेला. सगळं शिक्षण मुंबईत झालेलं. कामानिमित्त पुण्याला आला होता. त्याला पुणे शहर खूप आवडायचे. शिक्षणाचं माहेरघर म्हणजे पुणे. पुणे शहराची त्याला आवड खूप होती. कामाच्या निमित्ताने का होईना त्याला त्याच्या आवडत्या शहरात राहायला मिळत होतं. आई-वडिल आणि एक लहान बहिण असे छोटसं कुटुंब होतं त्याचं.

राजने  उच्च शिक्षण घेऊन ही नोकरी मिळवली होती. एका गरीब  कुटुंबात वाढलेला, परिस्थितीची जाणीव असलेला, एक हुशार मुलगा होता राज. तो डिप्रेशन मधून बाहेर पडतो का? हेच आई वडिलांना बघायचं होत.

प्रथम त्याची ओळख ईश्वरीशी झाली कारण त्याचा डेस्क हा ईश्वरीच्या बाजूला होता. ईश्वरी आणि राज एकाच डिपार्टमेंटला होते. राजने  ऑफिस जॉईन केल्यावर त्याला ट्रेंनिग ईश्वरीनेच  दिले. सुरुवातीला तो फक्त कामापुरतंचं बोलायचा.

ईश्वरी त्याला नेहमी म्हणायची, "अरे बोल रे, किती काम करणार? कधी कधी बोललंही पाहिजे."

ट्रेनिंग देता देता त्यांच्यात मैत्री झाली. ऑफिस कलिग कधी बेस्ट फ्रेंड झाला हे तिला कळलेसुद्धा नाही. त्यांचे त्रिकुट खऱ्या अर्थाने राजने पूर्ण केले.

सकाळी आल्याबरोबर चौघांच ठरलेलं असायचं, आधी पंच आणि लॉगिन केल्यावर ब्रेकफास्ट करायला जायचं. ब्रेकफास्ट करता करता गप्पा एवढ्या रंगायच्या की फक्त वीस मिनिटांचा टाईम पण एक तास कधी व्हायचा ते कळायचंच नाही.

काव्या मग आठवण करून द्यायची, "खडूस बॉस येईल, चला लवकर."

सुधीर मध्येच बोलायचा मग, "अगं बाई किती घाबरतेस?"

ब्रेकफास्ट असो किंवा लंच टाईम नेहमी चौघे सोबत असायचे.
कोठेही जाऊ तिथे चौघे असायचे. मैत्रीचा हा बंध अतुट होता. एकमेकांच्या घरी जाणं येणं असायचं. एकमेकांशी एकमेकांचं दु:ख असो किंवा आनंद शेअर करायचा. ही मैत्रीची चौकट कधीच तुटली नाही. ऑफिस मध्ये एक जण जरी आला नाही तरी एकमेकांना करमत नसायचं.

राज हा हसऱ्या चेहऱ्याचा. त्याच्या चेहऱ्यावर कधीच दु:ख दिसणार नाही. काव्या ही बडबड करणारी, सगळेजण तिला "बडबडी आली रे," असं चिडवत.
सुधीर हा मस्तीखोर. नुसत्या खोड्या काढणारा. तर ईश्वरी आपल्याच विचारात असणारी. अशी या दोस्तांची मैत्री.

राजच्या चेहऱ्यावर हसणं जरी असलं तरी तो आतून खूप दु:खी होता, पूर्णपणे तुटला होता. ग्रुपमध्ये हे त्याने कधीच कोणाला जाणवू दिलं नाही. दु:ख लपवण्याची त्याची कला त्यालाच माहित होती.

तो मुंबईहुन पुण्याला आला. घुसमट मनाची थांबावी, थोडा जेंच हवा म्हणून. परिस्थितीला सामोरे जायची तयारी असायची त्याची. एवढा तो स्ट्राँग झाला होता. पुण्याला आल्यापासून हळूहळू तो सावरत होता. डिप्रेशनमधून बाहेर पडत होता. हळूहळू रमायला लागला होता. भूतकाळ विसरून तो वर्तमानात जगायला शिकत होता. डिप्रेशनमध्ये त्याने जे गमावले होते ते त्याला पुन्हा मिळवायचे होते. पुन्हा नव्याने जगायचे होते. त्याची स्वप्न पूर्ण करायची होती. आई-वडिलांचं नाव मोठं करायचं होतं.

क्रमशः

खरंच होईल सर्व राजच्या मनासारखे? जाणून घेऊयात पुढील भागात.
0

🎭 Series Post

View all