पाचवा भाग
काव्याही खूप थकली होती. कानात हेडफोन घालून ती पण झोपली.
ईशूने मागे वळून बघितलं, "अरे हे दोघे झोपले पण. ईश्वरी तुला झोपायचं असेल तर झोप, थकलीस ना? मी चालवतो गाडी."
"अरे नको मला तशीही झोप येत नाही. आम्ही सगळे झोपल्यावर तुला गाडी चालवताना झोप आली तर?"
ते दोघे झोपले होते तर राजने गाण्यांचा आवाज जरा कमी केला.
गाडीत फक्त गाण्यांचा आवाज आणि शांतता पसरली होती. मधून मधून ईश्वरी राजला बघत होती. एकमेकांकडे बघून एक छोटीशी स्माईल करायची. अलिबागला पोहोचल्यावर ईश्वरीने काव्या आणि राजला उठवले.
"चला उठा पोहोचलो आपण."
रुमची चावी घेऊन काव्या आणि ईश्वरी एका रुमकडे वळले. राज आणि सुधीरला त्यांच्या बाजूची रुम बघितली होती.
रुममध्ये जायच्या आधी राज तिघांना बोलला,"आता रेस्ट करा सकाळी लवकर उठून बीचवर जाऊया."
"हो चालेल." म्हणत सगळे आपापल्या रूममध्ये गेले.
रुममध्ये गेल्या गेल्या काव्याने ईशूला विचारलं, "काय गं विचारलंस का त्याला?"
"नाही गं, काव्या मला खरचं भीती वाटते. अगं प्रेम करतेस ना? अगं त्याला सांगितलेच नाही तर त्याच्या मनात काय चाललं आहे ते कसं कळणार?"
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठून बीचवर गेले. पहाटे बीचवर फिरायला जाणं खूप मस्त वाटत होतं. वातावरण थंड होतं. निरव शांतता सगळीकडे पसरली होती. कसलं टेंशन नाही, फ्री माईंड.
"पहाटेचा सुर्योदय पाहायला किती भारी वाटतं ना?" ईशू बोलली.
"अगं खूप भारी वाटतं. सुधीर तिकडे बघ किती भारी वाटतं. चल आपण तिकडे जाऊया." ईशूला आणि राजला बोलता यावं म्हणून काव्या सुधीरला घेवून तिथून निघून गेली.
काव्याला बीचच्या बाजूला चहावाला दिसला.
"ये सुधीर! चल आपण चाय पिऊया, तिकडे जाऊया." काव्या आणि सुधीर निघून गेले.
इकडे राज आणि ईश्वरीला काय बोलावं दोघांनाही सुचेना.
अडखळत दोघांनी बोलायला सुरुवात केली. ईशूला सुचेनाच काही, कसं विचारु? तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तर राज जुन्या आठवणीत रमला होता.
अडखळत दोघांनी बोलायला सुरुवात केली. ईशूला सुचेनाच काही, कसं विचारु? तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. तर राज जुन्या आठवणीत रमला होता.
ईश्वरीच राजला बोलली, "राज चल ना लाटांकडे जाऊ." बोलत बोलत राज आणि ईश्वरी चालू लागले.
लाटांकडे बघून ईशूला राजशी बोलायला धाडस झालं.
"राज मला तुझ्याशी बोलायचं आहे."
" हा ईशू बोलना, काय झालं? डोळे घट्ट बंद करून ईशू राजला बोलली.
" राज माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत."
राजला क्षणभर कळलेच नाही, तो आश्चर्यचकित झाला. काय बोलू सुचेना. तनू गेल्यानंतर राजने कधीच कोणत्या मुलीचा विचार केला नव्हता. त्याला ईशूबदद्ल काही वाटत नव्हते. ती फक्त आपली एक चांगली बेस्ट फ्रेंड आहे.
"ईशू, मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं, ते फक्त तनूवर. मी ती सोडून गेल्यापासून मी कधीच कोणत्या मुलीचा विचार नाही केला. मी काय सांगतोय ते समजून घे. आम्ही पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. रिलेशनपेक्षा आमचं मैत्रीचं नातं खूप भारी होतं. खूप चांगले मित्र होतो आम्ही. पण काळाने आघात केला. कार ॲक्सिडंट मध्ये तिचा मृत्यू झाला."

ईशूला हे ऐकून तिचे डोळे भरून आले.
"तु तुझ्या भावना व्यक्त केल्या पण मला कधीच तुझ्याबद्दल काही वाटलं नाही. पण हे खरं तू मैत्रीण म्हणून खूप खास आहे."
मैत्री या शब्दात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. मैत्रीवरती किती मनातलं ओळखणारी खरी ताकद मैत्रीमध्ये असते. आयुष्यात खूप नाती येतात आणि जातात पण मैत्रीच नातं असं आहे ना की प्रत्येक पावलावर आपल्याला भेटत असते. मैत्री या नावातचं एक रहस्य दडलेलं असतं. जुळलेली मैत्री कधीच तुटत नाही. दूर असूनही जवळ भासते ती म्हणजे मैत्री. क्षणोक्षणी आठवते ती म्हणजे मैत्री. ओढ लावणारं एक नातं म्हणजे मैत्री. आपल्या हक्काचं एक असं नातं म्हणजे मैत्री.
त्या मैत्रीत मग कधी कधी गोडवा येतो, कधी कधी रुसवाही येतो. विश्वासाचं एक फूल म्हणजे मैत्री. अनोळखी असलेलं नातं कधी मैत्रीत होतं ते समजतचं नाही. मित्रमैत्रिणी सोबत असली की असं वाटतं कधीच हा आताचा क्षण संपू नये. मैत्री हा शब्द कानावर पडताच एक आधार वाटतो. एक नातं असतं, कधीच न तुटणारं, जुळलेलं एक ऋणानुबंधाचं नातं. काय जादू असते मैत्रीत तेचं कळतं नाही.

राज तुला हवा तेवढा वेळ घे. पण तु यातून बाहेर पड. पण एक लक्षात ठेव तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही. आपल्या मैत्रीचे शब्दच वेगळे होते ना? दोघेही हसतात.
समाप्त
©® रेश्मा बोडके
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा