Login

मैत्रेय भाग ३

मैत्रीचे अनोखे बंध
भाग तिसरा

ईश्वरी आणि राज यांच्या मैत्रीचे बाँडिंग खूप भारी झाले होते. कॉफी प्यायला, कुठे बाहेर फिरायला, ऑफिस मधून निघताना दोघेही सोबत निघायचे. मैत्रीचा हा धागा अजून घट्ट होत होता.

राज त्याचा भूतकाळ जरी विसरत चालला होता. तरी त्याला पुन्हा प्रेमात पडणं नको होतं. नको तो पुन्हा डाव, नको त्या जुन्या आठवणी. तर इकडे ईश्वरी राजच्या हळूहळू प्रेमात पडत होती. नकळत ती त्याच्याकडे ओढली जात होती. तिला नक्की समजत नव्हते. काय होतयं तिच्या मनाला. सुट्टीचा दिवस पण तिला घरी नकोसा वाटू लागला. त्याच्याशी बोलणं जरी नाही झालं तरी उदास व्हायची.

एक दिवस राज ऑफिसला आला नव्हता. त्याने बॉसला तसं फोन करुन सांगितलं होतं. पण तो ग्रुपमध्ये कोणालाच काही बोलला नाही. ईश्वरीचं लक्षच लागत नव्हतं कशात. ती त्या दिवशी ऑफिसमध्ये कोणाशीच नीट बोलली नाही. मन उदास करुन बसली होती.

काव्याला समजेना,नक्की हिचं काय बिनसलं? लक्षच नाही कशात.

"काय गं ईशू! काय झालं तुला? कसलं टेंशन आहे का? तू अशी का वागते? तुला बरं नाही का? बरं नसेल तर प्लिज घरी जा. बॉसला सांगायचं टेंशन नको घेऊ, मी आहे ना?"

"अगं काव्या मी बरी आहे. मला काही नाही झालं. अगं पण राज!"

" राजच काय?"

"तो येणार आहे की नाही माहित नाही. त्याचा फोनसुद्धा लागत नाही."

"अगं एवढेच ना? असेल तो काही कामात. गेला असेल फॅमिली सोबत बाहेर कुठे. अगं करेल फोन नंतर."

काव्या तिला असं पहिल्यांदा बघत होती. इतका राजचा विचार करताना. एवढ कासावीस होताना. तिच्या नजरेत त्याच्याबद्दलची काळजी दिसत होती.

"ये ईशू तुला विचारु का?"

" हो, विचार की."

"तू त्याच्या प्रेमात तर नाहीस ना? असेल तर सांग त्याला बिनधास्त. विचार त्याला डायरेक्ट. तशीही तू दिसायला काही कमी नाही. त्यालाही तू आवडत असणार. तसंही तुझ्या डोळ्यात दिसतं त्याच्याबद्दलचं प्रेम."

"अगं मी कधी त्याच्या प्रेमात पडले, मला कळलेच नाही. काव्या खरंच मी प्रेमात पडले. खरचं त्यालाही आवडत असेल का मी? नसेल आवडतं तर माझी मैत्री तुटेल का? तो मला समजून घेईल का? विश्वासघात तर नाही ना होणार? काव्या मी त्याला प्रपोज करून मैत्री तर नाही ना गमवणार? कळत नाही गं त्याच्या मनात माझ्याबद्दल काय आहे? अगं! मी त्याच्या तोंडून मैत्रीबद्दल खूप काही ऐकलं आहे. त्याच्या आणि माझ्या मैत्रीला मला तडा जाऊन नाही द्यायचा."

"एक दिवस असचं मी त्याच्याशी बोलताना मैत्री बद्दलचे खूप ऐकले. असं वाटतं त्याने आयुष्यात काहीतरी गमावलं आहे. पण तो सांगत नाही कोणाला. खूप जवळचं असं त्याचं हरवलं आहे. अस वाटत राहतं. हसत असतो पण त्या हसण्यात पण त्याचं दु:ख लपलं आहे, असं वाटतं. त्याला खरचं आपल्या सोबतीची साथ हवी आहे असंही वाटतं."

"ईशू ऐक ना आपण त्याच्या मनातलं काढून घेऊ. आपण एक प्लॅन करू. या विकेंडला आपण फिरायचा प्लॅन करूया. मस्त फिरणंही होईल. तुम्हांला बोलताही येईल. तुम्हांला एकमेकांसोबत टाईमही  स्पेंड करता येईल. उद्या राज आला का आपण ब्रेकफास्टला गेल्यावर बोलूया. मस्त दोन दिवस लागोपाठ सुट्टी आली आहे, तर मस्त बाहेर फिरून येऊया. तेवढाच आपल्या सगळ्यांना फ्रेश वाटेल."

दुसऱ्या दिवशी सगळे ब्रेकफास्टला भेटले.

"काव्या, आपण सगळे फिरायला जाऊया का? खूप दिवस झाले आपण कोठेच नाही गेलो. विकेंडला मस्त बाहेर फिरुन येऊया." सुधीर मध्येच बोलला.

" अगं पण जाणार कोठे? आधी प्लेस तर ठरवा." काव्या मध्येच बोलली.

"ईशू आणि राज तुम्ही सांगा कोठे जायचं फिरायला. तुम्हां दोघांना माहित असलेलं प्लेस सांगा."

"मला वाटतं आपण माथेरानला जाऊया." सुधीर म्हणाला.

"ओय सुधीर! कितीवेळा आपण तिकडे गेलो यार नको तिकडे."

ईशू बोलली, "आपण अलिबागला जाऊया का? मस्त समुद्र किनारी फिरणं होईल."

राजचा चेहरा पडला होता. अलिबाग म्हणजे आठवणींच घर असं त्याच्या मनात आले.

"नाही नको तिकडे." राज म्हणाला.

क्रमशः

नक्की कुठे जाणार आता हे सर्व मित्र फिरायला? फिरायला गेल्यावर नेमकी काय घडणार? राजच्या अलिबागला जाण्याच्या नकारावर काय असेल बाकीच्या तिघांची प्रतिक्रिया? सर्वकाही जाणून घ्या पुढील भागात.
0

🎭 Series Post

View all