भाग चौथा
ईश्वरी लगेच बोलली, "का नको? जाऊ या ना रे. तू मुंबईला असताना गेला असशील ना? आम्ही मात्र कधीच गेलो नाही."
"नेहमीच्या ठिकाणी काय जायचं?"
खूप मनवल्यावर मनावर दगड ठेवून, "हो जाऊया आपण."राज म्हणाला.
काव्या बोलली, "ठरलं तर मग आपला प्लेस. अलिबाग डन.".
सुधीर मध्येच बोलला, "पण जायचं कसं काव्या?"
"अरे अनपढ राजला माहित ना?"
" ये येडपट मी कशाने जायचं? असं विचारत आहे."
"आपण गाडी करून जाऊया म्हणजे आपला वाटेत काही प्लेस भेटले तर आपण तिकडे पण जाऊ शकतो." असं ईश्वरी बोलली.
शुक्रवारी रात्री निघायचं ठरवलं. दोन दिवसांची सुट्टी मस्त एन्जॉय करायची. पण विकेंडला अजून दोन दिवस बाकी होते.
ईश्वरीला असं झालं होतं. "कधी हे दोन दिवस जातील. कधी फिरायला जाऊ. कधी मी माझ्या मनातलं त्याला सांगेल. पण लगेच मनात भीतीही याची. त्याला ही माझ्याबद्दल काही वाटत असेल ना? नसेल तर?" नको ते विचार तिच्या मनात घोळत होते.
इकडे राजचं मन अस्वस्थ होतं होते. परत त्याच ठिकाणी, त्याच आठवणी. यापासून आपण दूर जात होतो. पण आठवणी परत त्याच ठिकाणी आणून सोडतात. पण तो मैत्रीसाठी काहीही करायला तयार होता. कारण त्याने मैत्री खूप जवळून अनुभवली होती. शेवटी तो मैत्रीसाठी अलिबागला जायला तयार झाला.
काव्याला ईश्वरी बदल माहित होतं. फिरायला जायच्या आधीच तिच्या डोक्यात त्यांना एकमेकांना कसा टाईम देता येईल याचा विचार घोळत होता. शुक्रवारी चौघेही ऑफिसला लवकर आले. त्यांना संध्याकाळी लवकर निघायचं होतं अलिबागला. काव्या आणि सुधीरने अलिबागला राहण्याची सगळी व्यवस्था नीट केली.गाडीची तयारी राजने केली. चौघांनाही कन्फर्मटेबल होईल असं तिने हॉटेल बघितले होते. बीचच्या बाजूलाच तिने हाटेलचं बुकिंग केलं होतं. सुर्यास्त आणि सुर्योदय छान दिसतो. मन प्रसन्न वाटेल. सगळ्यांनी संध्याकाळी सात वाजता भेटायचं ठरलं.
सगळेजण सात वाजता भेटले. राज गाडी चालवणार होता.
काव्या बोलली, "ईशू तु बस पुढे, सुधीर बसेल मागे."
" ओय असं का ? मुले पुढे बसणार आणि मुलींनी मागे बसायचं."
काव्या आणि सुधीर यांच्यांत बसण्यावरून चिडचिड सुरू झाली.
राज आणि ईशू बोलले, "झालं यांच चालू. यांना कुठे न्यायचे बोललं तर यांचं आपलं नेहमीचं सीटवरून होत असतं."
ईशू बोलली,"अरे कोणी कोठे बसा पण बसा आता आपल्याला हॉटेलवर पोचायला लेट होईल."
राज आणि सुधीर पुढे बसले आणि ईशू, काव्या मागे बसली. प्रवास सुरू झाला.
मागे बसून काव्या त्याच्या खोड्या काढत होती.
"नंतर तू मागे यायचं हा! प्रत्येकाला पुढे बसायला मिळाले पाहिजे." काव्याने ईशू ला नकळत डोळा मारला. गालावर मस्त लगेच स्माईल आली.
"नंतर तू मागे यायचं हा! प्रत्येकाला पुढे बसायला मिळाले पाहिजे." काव्याने ईशू ला नकळत डोळा मारला. गालावर मस्त लगेच स्माईल आली.
प्रवासात त्यांच्या गप्पा, गाणी एकमेकांची मस्करी करणं चालू होतं. या मस्करीमध्ये काव्या ईशूची खेचत होती. राजने मस्त गाणी लावली होती. गाणी गात, हसत खेळत मस्त इन्जाय चालू होता. तर ईश्वरी राजमध्ये गुंतली होती. प्रवासात ती वेगळचं चित्र बघत होती.
गाडीच्या मागच्या सीटवर बसून ईशूला पुढे बसायला कसं पाठवता येईल? याचा विचार चालू होता. सुधीरला मागे बसायला बोलवणं म्हणजे खूप मोठं काम आहे.
एका ठिकाणी चहाची टपरी लागली. सगळे उतरले पण सुधीर काही उतरत नव्हता. राज आणि ईशू पुढे गेले. त्यांना वाटलं हे दोघे येतात मागून. ईशूने मागे वळून बघितले तर काव्या सुधीरला ओढत होती. चल ना तुला सांगायचं काहीतरी. सुधीर यासाठी बाहेर येत नव्हता. काव्या त्याच्या जागेवर बसेन त्यांना असं बघून दोघांना हसू आवरेना.
राजने आवाज दिला, "आम्ही चहाची ऑर्डर देतो. तुमचं आपलं चालू द्या."
मस्तपैकी चौघांनी चहा घेतला आणि प्रवासाला सुरुवात केली. पण यावेळेस ईशूला काव्याला पुढे बसायला लावलेच. सुधीरला बिचाऱ्याला मागे बसायला लागले. मागे बसून काव्या त्याला चिडवत होती. मस्ती करून झाल्यावर काव्याची बडबड नको ऐकायला आणि दिवसभर थकले पण होते उद्या फिरायला फ्रेश वाटलं पाहिजे.
क्रमशः
इशू देईल का राजला तिच्या प्रेमाची कबुली आणि दिलीच तर त्याची प्रतिक्रिया असेल? जाणून घेऊयात पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा