तुझी पाहतोय वाट...
एका वळणावरती
तुझी पाहतोय वाट
चांदण्यांच्या मंडपाने
आहे सजलेला घाट...
तुझी पाहतोय वाट
चांदण्यांच्या मंडपाने
आहे सजलेला घाट...
मेघ पांघरून नभी
चंद्र देतोय पहारा
थाट सौंदर्याचा असा
लाजतोय बघ तारा...
चंद्र देतोय पहारा
थाट सौंदर्याचा असा
लाजतोय बघ तारा...
हात गुंफून हातात
चालू सोबतीने जरा
प्रकाशाने मंद मंद
कशी मोहरते धरा...
चालू सोबतीने जरा
प्रकाशाने मंद मंद
कशी मोहरते धरा...
आता पुसून रुसवे
तूच मिटव अंतर
मावळत्या चंद्रमाची
खंत नको गं नंतर...
© कामिनी खाने
तूच मिटव अंतर
मावळत्या चंद्रमाची
खंत नको गं नंतर...
© कामिनी खाने
छायाचित्र सौजन्य : गुगल
सदर कवितेचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा