Login

मराठी राजभाषा दिवस , मराठी भाषा दिवस

27फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिवस...राजभाषा दिवस.. मी मराठी माय मराठी असे गर्वाने आपण नेहमीच म्हणतो याच माय मराठी आपल्या मातृभाषेचा आज दिवस. आपण सर्व हा प्रण करूया , मराठी भाषा नवीन पिढीस लिहायला ,बोलायला वाचायला शिकवून मराठीला वाचवूया..
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
जाहलो खरेच धन्य एकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी.....?
             आज २७फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिवस... आजचा हा दिवस म्हणजे साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस... कुसुमाग्रजांचे मराठी भाषेवरील प्रेम, तीचे महत्त्व कायम टिकून राहावे, मराठी भाषेला सन्मान मिळावा म्हणून त्यांनी केलेली धडपड, हे सारं लक्षात घेता त्यांचा जन्मदिवस हा जगभरात "मराठीभाषादिवस" म्हणून साजरा केला जातो...
       २१फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी "मायबोली मराठी सप्ताह" म्हणून साजरा करतात.. मराठी भाषा ही संपूर्ण भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेंपैकी एक आहे म्हणजे भारतात 3र्या क्रमांकावर मराठी भाषा आहे..

        माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी......?

           मराठी भाषा ही देवनागरी लिपीतून लिहिली जाते. मराठी भाषेचा वापर हा अनेक ग्रंथ, ओव्या, भारुडे यात आढळतो.. ई.स १२७८मध्ये म्हाईंभटानी लीळाचरीत्र मराठीतूनच लिहिले. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना ई.स १२९०मध्ये केली. त्यानंतर अनेक संत कवींनी आपल्या रचना, ग्रंथ याच मराठी भाषेत केलेल्या आहेत. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि  १९४७नंतर मराठी भाषेला अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली.

           मराठी भाषा ही खूप समृद्ध आहे.असे म्हणतात की प्रत्येक 10मैलावर मराठी भाषा बदलत जाते जसे की अहिराणी, कोल्हापुरी, वर्हाडी, कोळी, मालवणी, खानदेशी, झाडी अश्या कित्येक भाषा आपल्याकडे बोलल्या जातात...


          परंतु, आता मराठी जी आपली मातृभाषा आहे तिचे संवर्धन करणे, तिचा सन्मान करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.कारण आताच्या परदेशी भाषांच्या संपर्कात आल्याने मराठी भाषा टिकवून ठेवणे खूप आव्हानात्मक झाले आहे. "
येणाऱ्या काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहील काय?" हा मुद्दा सद्ध्या डोक वर काढताना दिसतोय कारण सद्ध्या अनेक लोक आपली मराठी बोलायची सोडून इतर भाषांना महत्व देतात,मुलांना सुद्धा इतर भाषा याव्यात यासाठी धडपड चाललेली असते पण आपल्याच मातृभाषा कडे दुर्लक्ष करतात...
त्यासाठी आपण आपल्या मुलांना मराठी बोलायला, लिहायला,वाचायला शिकवून मराठी भाषा वाचवूया... शक्य होईल तिथे मराठी भाषेचा वापर केला पाहीजे, त्यामुळे मराठी भाषेचा जागर होत राहील.या मराठी भाषेतील गोडवा पुढच्या पिढीस पोहचवण्याचे कार्य हे आपल्यालाच करायचे आहे.त्यासाठी
       "वाढवू मराठी,गाजवू मराठी आणि बाळकडू म्हणून पाजवू मराठी!!”म्हणजेच
आपल्याला जास्तीत जास्त आपल्या मराठी भाषेचा अभिमान ठेवून तिचा जास्तीत जास्त वापर करायला पाहिजे आणि मराठी भाषेचे संवर्धन करून आपली संस्कृती सुद्धा जपली पाहिजे....
               मातृभाषा महाराष्ट्राची,
                आहे मराठी भाषा,
              तिला समृद्ध करण्याची,
                आहे माझी आशा.
           साहित्याचा वारसा चालवूया गडे,
              मराठी पाऊल पडते पुढे.?
तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...आणि कायमच गर्व,अभिमान असू द्या मराठी भाषेचा...प्रयत्न करा जास्तीत जास्त मराठी भाषा वापरण्याचा.... धन्यवाद??
@अश्विनी दुरुगकर.
#मराठीभाषादिवस #मराठी #मराठीभाषा #मीमराठी #मायमराठी #२७फेब्रुवारी #अश्विनी
#AshaviniDurugkar
@अश्विनी दुरुगकर पेशने??
लेख आवडला असल्यास लाईक,कमेंट,शेअर करा? आणि हो follow करायला विसरू नका...☺️?

0