सानिकाच्या घरी जावून लग्नासाठी मागणी घातल्यावर तिच्या घरचे होकार देतील का. ती प्रशांतवर विश्वास ठेवून त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते का ते पाहूया या भागात.
जडली प्रीत ही न्यारी - भाग ४ (अंतिम भाग)
प्रशांतने सानिकाला फोन केला, “हॅलो.. काय म्हणाले घरचे. आवडलो का मी त्यांना?”
सानिकाच्या दादाने बहिणीच्या भविष्याची काळजी म्हणून प्रशांतची सगळी माहिती काढलेली . तो खरंच एक गुणी मुलगा आहे हे समजले होते. सानिका प्रशांतला म्हणाली, “होऽऽ… आवडलात ना!” पण आता रीतीनुसार ते तुमच्या घरी येणार आहेत, पुढची बोलणी करायला.”
“कधीही येऊ दे, माझी काही हरकत नाही. पण मी तुम्हाला आवडलो का..? तो तिची इच्छा विचारू लागला पण त्याचे बोलणे मध्येच थांबवून ती त्याला म्हणाली, “त्या आधी तुम्ही मला सांगा की अजूनही तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार आहात?” सानिका आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी विचारत होती.
“असे का विचारताय. मीच तर लग्नाची मागणी घातलीय ना?”
“असे का विचारताय. मीच तर लग्नाची मागणी घातलीय ना?”
“हो.. घातलीय, पण तुम्ही इतके सुंदर आहे माझ्यापेक्षा किती छान दिसता. अन् मी अशी.. तुम्हालाच आवडले नसेल मी.”
“काहीही नका बोलू हं.. थोडा तरी विश्वास ठेवा ना. सगळे पुरुष सारखे नसतात ओ! मी तुमचं सौंदर्य न पाहताच तुमच्यावर स्वभावावर आणि तुमच्या मनावर प्रेम केलंय. तुम्ही सुंदर नाहीत असं कोण म्हणतं. माझ्यासाठी तुम्ही सुंदर होता, आहात आणि कायम राहाल. अजूनही की माझ्या निर्णयावर ठामच आहे. मला तुमच्याशीच लग्न करायचे आहे. फक्त तुमचा निर्णय सांगा.
सानिका थोडावेळ स्तब्ध झाली. कारण तिला हे सगळं स्वप्नच वाटत होतं. तिचा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की मुलं इतकं चांगलं वागू शकतात? त्याचं तिच्यावरचं प्रेम पाहून आता ती ही त्याच्यात गुंतू लागली. त्याच्या विचारत हरवून गेलेल्या सानिकाला तो तिकडून म्हणाला “काही तरी उत्तर द्या… मी वाट पाहतोय.”
त्याचे प्रेम पाहून तिचे मुलांविषयीचे मत बदलू लागले. सगळी मुलं सारखी नसतात. स्वभावानुसार माणूस बदलू शकतो हे तिला पटले होते.
इतका जीव लावणारा मुलगा कुणाला नको असेल बरं? तिने हलकेच हसून लाजत लाजत त्याला होकार दिला. त्याला म्हणाली, “यापुढे तुम्ही मला अहो जाओ नाही बोललं तरी चालेल. मी होणारी बायको आहे ना तुमची. आपण दोघे किती लांब आहोत. तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात.”
इतका वेळ आतुर होऊन तिच्या उत्तराची तो वाट बघत होता. पण आता तिच्या होकराने इतका खुश झाला की तो आनंदाने नाचायचंच बाकी होतं. आलेले दडपण गेल्यामुळे सुटकेचा श्वास सोडून तो तिच्याशी बोलू लागला.
या अंतराची पर्वा करू नकोस. तुझ्यापासून दूर राहूनही तुझ्यावर मी इतकं प्रेम केलंय, की जवळ आल्यावर ते व्यक्त करायला मला शब्दच सापडले नाहीत. मी कुठेही असलो तरी तुझं नाव माझ्या हृदयात असतं आणि तुझी आठवण माझ्या मनात ताजी असते. जेव्हा जेव्हा मी नैराश्याच्या अंधारात जातो तेव्हा तुझ्या प्रेमाचा प्रकाश मला तुझ्यापर्यंत आणून सोडतो.
ज्यांचं प्रेम खरं आहे ते कुठलाही अडथळा पार करू शकतात. अंतर कधीही प्रेमानं जोडल्या गेलेल्या दोन हृदयांना वेगळं करू शकत नाही.
जेव्हा जेव्हा मला तुझ्यापासून लांब असल्याचं वाईट वाटतं, जेव्हा मला तुझी खूप आठवण येते, तेव्हा मी स्वतःला आठवण करून देतो की मी किती भाग्यवान आहे की मी खूप खास कोणाला तरी मिस करतोय.
जेव्हा जेव्हा मला तुझ्यापासून लांब असल्याचं वाईट वाटतं, जेव्हा मला तुझी खूप आठवण येते, तेव्हा मी स्वतःला आठवण करून देतो की मी किती भाग्यवान आहे की मी खूप खास कोणाला तरी मिस करतोय.
मी झोपेत असताना मला तुझी स्वप्नं पडतात, आणि जेव्हा मी जागा असतो तेव्हा मला तुझ्याकडे यावंसं वाटतं. मी तुझ्यापासून कितीही लांब असलो तरी मनाने कायम तुझ्या जवळच आहे आणि तुझा चेहेरा कायम माझ्या डोळ्यांपुढं आहे.
“लव्ह यु पिल्लू मिस यु सो मच…”
लव्ह यू अँड मिस यू टू म्हणत तिनेही त्याचे प्रेम स्वीकरले.
“लव्ह यु पिल्लू मिस यु सो मच…”
लव्ह यू अँड मिस यू टू म्हणत तिनेही त्याचे प्रेम स्वीकरले.
त्याने तिच्यासाठी केलेली चारोळी पाठवली.
“तुला मला नकळत येथे
प्रेम कहाणी घडली आहे
आभाळ एवढी प्रीत सये
पापण्यांमध्ये दडली आहे”
प्रेम कहाणी घडली आहे
आभाळ एवढी प्रीत सये
पापण्यांमध्ये दडली आहे”
आता त्या दोघांचे प्रेमळ बोलणे वाढू लागले. काही दिवसातच सानिकाचे वडील आणि दादा प्रशांतच्या घरी आले अन् त्याच्या आईसोबत लग्नाची पुढील बोलणी झाली. प्रशांतला वडील नव्हते लहान भाऊ, तो अन् आई असे तिघेच होते ते. आई थोडी वयस्कर होती त्यामुळे तिलाही आपल्या मुलाचे लग्न होऊन तो सुखात संसार करावा हीच इच्छा होती. बहिणींची लग्न होऊन त्या सासरी सुखात होत्या.
काही दिवसांतच लग्नाचा चांगला मुहूर्त काढून प्रशांत अन् सानिकाचे लग्न आनंदाने लावून दिले.
सानिका बायको म्हणून घरी आली. मधुचंद्राच्या रात्रीच प्रशांत सानिकाला जवळ घेत म्हणाला, “आज खऱ्या अर्थाने तू माझी बायको झालीस पण मी तुझ्या प्रेमात पडलो तेव्हापासूनच तुला बायको मानलेलं.”
“अजून एक.. तू नेहमी हे लक्षात ठेव की आपण एक चांगले मित्र होतो, आहोत आणि यापुढेही ही मैत्री आपल्या नात्यात कायम राहायला हवी. एकमेकांवरील विश्वास हा कधीच कमी होऊ द्यायचा नाही. निःसंकोचपणे तू माझ्याशी बोलावंस हीच अपेक्षा आहे.”
ही कोणत्याही नात्यात विश्वास हा खूप महत्वाचा असतो. अन् तुम्ही ते सिध्द करून दाखवले. तुमच्यासारखा नवरा मला मिळाला हे माझं भाग्यच आहे.
तो तिच्या नजरेला नजर देत म्हणाला “अन् तुझ्यासारखी समजूतदार, मनापासून जीव लावणारी, एक जबाबदार बायको मला मिळाली हे माझं भाग्य म्हणायचं.”
सानिका त्याच्याकडे बघून हसली अन् त्याच्या नजरेत हरवून गेली. त्याच्या छातीवर डोकं ठेवून डोळे मिटून घेतले. त्याने तिला आपल्या कवेत सामावून घेतले.
बघता बघता पाच वर्षे निघून गेली. त्या दोघांनी मिळून आपला संसार प्रेमाने फुलवला. आता त्यांना दोन गोंडस मुलं झालेली. एक मुलगी अन् मुलगा त्यांच्या गोकुळात आनंदाने खेळत होते.
बाहेर खेळायला गेलेली त्यांची मुले घरात आली त्यांनी हाक मारली “ए आई.. आम्हाला खूप भूक लागलीय.” असा मोठ्याने आवाज ऐकू येताच सानिका आणि प्रशांत भानावर आले.
“हो रे माझ्या बाळांनो… हात पाय स्वच्छ धुवून या मी जेवन वाढते.” असे सानिकाने मुलांना सांगितले.
प्रशांत तिला म्हणाला, “किती पटपट दिवस निघून गेले गं काही कळलेच नाही. हो पण माझे तुझ्यावरचे प्रेम मात्र आहे तेवढेच आहे आणि कायम राहील.”
सानिका लाजून म्हणाली, “ते सांगायची गरज पडत नाही ओ. तुमच्या नजरेतून दिसतं अन् तुमच्या वागण्यातून ते जाणवतं मला.”
“तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा पुरुषांवर विश्वास ठेवायला शिकले. तुम्ही भेटला नसता तर ते शक्यच नव्हते. सोशल मीडियाच्या सानिध्यातही कोणीतरी चांगली व्यक्ती आपल्याला भेटू शकते याचा विचारही कधी मनात आला नाही.” ती भावूक होऊन त्याला म्हणाली.
“अगं वेडे.. या सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे आपल्याच हातात असतं. जितके वाईट परिणाम असतात तसेच चांगल्या गोष्टीसुद्धा घेण्यासारख्या असतातच की.” तिचा हात हातात घेऊन तो तिला समजावत होता.
“खरंय तुमचं. काय घ्यायचे अन् काय नाही हे आपल्याच हातात असतं. फेसबुकमुळेच तुम्ही मला मिळालात हेसुध्दा तितकंच सत्य आहे.” दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघू लागले.
“तू माझे जग आहेस गं!” असे म्हणत तो चार ओळी तिच्यासाठी बोलून गेला.
“विश्वास कातळासारखा
तुझ्या माझ्या ठायी असू दे
आपल्या प्रीतीचा ऋतु
सये बारमाही गोड हसु दे.”
—----------
तुझ्या माझ्या ठायी असू दे
आपल्या प्रीतीचा ऋतु
सये बारमाही गोड हसु दे.”
—----------
समाप्त :
©® सौ. वनिता गणेश शिंदे