नकळत धागे जुळती
भाग - एक
"आई मला ना फार भिती वाटतेय गं कसं होईल माझं? सर्व मला समजून तर घेतील ना? आणि मला तुला सोडून जाणंही आवडत नाहीये. कशी राहणार गं मी तिकडे? मी सगळं व्यवस्थित करू शकेल ना? " विभा तिच्या आईच्या म्हणजेच वसुंधराच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत होती.
"हे बघ विभूऽऽ ,अजिबात कसलेच विचार करू नकोस. मनावर कुठलही दडपण घेऊ नकोस. जावईबापू खूप समजूतदार आहे. तुझे सासू सासरेही किती छान आहेत, किती माया लावतात
तुला, थोडीफार भिती वाटती ती नॉमर्ल आहे बाळा आणि हे सर्व एन्जॉय कर बच्चा." वसुंधरा तिच्या केसांवरून हात फिरवत समजावत होती. तितक्यात विहा त्यांच्याजवळ येऊन बसली.
तुला, थोडीफार भिती वाटती ती नॉमर्ल आहे बाळा आणि हे सर्व एन्जॉय कर बच्चा." वसुंधरा तिच्या केसांवरून हात फिरवत समजावत होती. तितक्यात विहा त्यांच्याजवळ येऊन बसली.
"काय गं आई, माझा नाही करत असा लोभ." विहाने गाल फुगवले.
"अस्सं का? मग तुझा कोण करते गं?" वसुंधराने तिच्या डोक्यात टपली मारली.
" माझी तर दिदी आणि मोहन काका आहेत लाड करायला, माझे हट्ट पुरवायला." तसा वसुंधराने विहाचा गाल ओढला.
"नको ना आई, गाल दुखतात ग." विहाने गालाला हात लावला.
" चला लवकर झोपा, उद्या लवकर उठून आवरायचे आहे. सकाळचा मुहूर्त लक्षात आहे ना."
"हो, थांब ना थोडावेळ." विभा.
"दीदी उद्या आपल्यासोबत नसेल नं." विहा भावूक झाली होती. तिचे डोळे पाणावले होते. तिघेही भावूक झाल्या. आजपर्यंत ते तिघही एकमेकांसाठीच होत्या. वसुंधरा आई कमी आणि सखीच होती त्याची. विभाने विहाला कुशीत घेतले.
"सगळ्यांनाच एकदिवस लग्न करून जावं लागतं." वसुंधराने तिच्या केसांवरून हात फिरवला.
"मी नाही जाणार." विहा पटकन म्हणाली.
"लग्नाआधी सर्व असेच बोलता. विभू ही म्हणाली होतीच ना असं."
"हो ना .. जिजूंना पाहून लगेच होकार दिला." विहा विभाची खेचत म्हणाली.
"पण मी नाही जाणार फायनल डिसिजन आहे." ती अजूनही तिच्या निर्णयावर ठाम होती.
"मैने एक बार कमीटमेंट कर दि तो मै अपनी आप की नही सुनती।" ती तिच्या ड्रेसची नसलेली कॉलर ताट करत म्हणाली. तसे या दोघांच्या चेहर्यावर हसू पसरले.
सकाळचा मुहूर्त असल्याने लग्नाची वेळ होत होती. सर्व घाई करत होते. मोहनकाका आल्यापासून ते इकडे तिकडे सर्वच एकहाती सांभाळत होते. विभाला तयार करण्यासाठी ब्युटिशियनला बोलवण्यात आले. ती तिचं काम पार पाडत होती.
भटजीबुवांनी नवरीला बोलवले तसे तिचे मामा तिला घेऊन आले.
लग्नाच्या विधीला सुरवात झाली आणि दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. दोघही लग्नाच्या बेडीत कायमचे अडकले. जेवण वगैरे उरकून नवरीच्या निरोपाची वेळ आली. तिघीही मायलेकी एकमेकांच्या मिठीत गहिवरले. बघणाऱ्यांच्या ही डोळ्यात पाणी आले होते. विभा मोहन कांकाजवळ गेली.

"काका." ती त्यांच्या कुशीत शिरून रडू लागली. काकांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवून हाताने तिच्या गालावरचे आसवे पुसले. त्यांनी तिला गाडीत बसवले.
'काहीही काळजी करू नको. मी या दोघांची काळजी घेईल.' नजरेनेच त्यांनी तिला आश्वस्त केले आणि विभा आणि प्रणवची गाडी निघाली.
'काहीही काळजी करू नको. मी या दोघांची काळजी घेईल.' नजरेनेच त्यांनी तिला आश्वस्त केले आणि विभा आणि प्रणवची गाडी निघाली.
रात्री सर्व निजल्यावर ती सतीशच्या फोटोकडे पाहत त्याच्याशी बोलत होती.
'तुम्ही आज असते तर किती आनंद झाला असता तुम्हाला. आज आपल्या विभूचं लग्न झालं ती सासरी गेली. सासरही खूप छान मिळालं आहे. तुमची कमी आजही जाणवते हो.. अकरा वर्षाचा आपला संसार उघड्यावर आला. मला आजही ते दिवस आठवतात. अठरा वर्षाची झाले आणि आजी माझ्या लग्नाच्या मागे लागली. तशी वसुंधरा भूतकाळातील आठवणीत रममाण झाली.
काय असेल वसुंधराचा भूतकाळ? बघूया पुढच्या भागात.
क्रमश..
©®धनदिपा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा