चांदण्यात फिरताना भाग - 30
मेघना प्रत्येक फोटो अगदी निरखून बघत होती. सगळे फोटो बघून तिला किती आनंद होतं होता.. आणि तो तिच्या चेहऱ्यावर साफ दिसतं होता. लग्नात केलेली मजा मस्ती, जेवण, प्रत्येक कार्यक्रम आणि त्यात सहभागी झालेले सगळे पाहुणे. त्यांनी जोडीने केलेले सगळे विधी.. हे सगळे फोटोग्राफरने अगदी अचूक टिपले होते. त्यांच्या हातात जादूच असते म्हणा. प्रत्येक निघून गेलेला क्षण ते असे सुंदरपणे फोटोत कैद करून ठेवतात.. आणि मग तेच पुन्हा पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नकळत डोळे पाणावतात. आज मेघनाच्या तसेच काहीसे होतं होते.
ह्याच तर आठवणी असतात आपल्या कॅमेरात कैद करून ठेवलेल्या . काही तारखेसह लिहुन ठेवलेल्या. त्या कितीही जुन्या झाल्या तरी दरवेळी बघतांना आपण त्यांना नव्याने अनुभवत असतो. पुन्हा तेच क्षण जगायचे असेल तर त्यांना असे कैद करून ठेवायचे, म्हणजे ते कधीच निसटून जात नाहीत आपल्या हातातून आणि आपण त्यात पुन्हा पुन्हा हरवत जातो.
शेवटच्या पानांवर पाठवणीचे फोटो बघून मेघनाचे डोळे पुन्हा भरून आले. उद्या ती पुन्हा सासरी जाणार ह्याची तिला प्रकर्षाने आठवण झाली आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती पुन्हा रडू लागली. आई पण मायेनं तिला कुरवाळत होती, समजावून सांगत होती.
"ए रडू बाई, उद्या घ्यायला येणार आहेत तुला भाऊजी आणि तू आजच रडत बसलीये. जायचं नाहीये का तुला? सांग तस मग मला! मी सांगतो त्यांना.. उद्या नका येऊ पुढच्या आठवड्यात या म्हणून हिला न्यायला."
अक्षय मुद्दाम अजून तिला चिडवत बोलला.
अक्षय मुद्दाम अजून तिला चिडवत बोलला.
"काही नको, ते येताय ना उद्या. येऊ दे मग."
मेघना त्याला दम देत डोळे पुसत बोलली.
मेघना त्याला दम देत डोळे पुसत बोलली.
"बघ बघ आई, हिलाच घाई झालीये ते नाही सांगत.. उगाच रडत बसली आपल्यासमोर."
अक्षय त्याच चिडवणे काही सोडत नव्हता.
अक्षय त्याच चिडवणे काही सोडत नव्हता.
"तू गप रे, आई बघ ना हा कसा बोलतो मला."
मेघना लगेच पुन्हा आईला सांगू लागली एखाद्या लहान मुलीसारखी.
मेघना लगेच पुन्हा आईला सांगू लागली एखाद्या लहान मुलीसारखी.
"गप्प बसा रे दोघे पण तुम्ही. बरं मेघना मी काय म्हणते.. उद्या काय स्पेशल बनवायचं त्यांच्यासाठी."
मम्मीने उद्याच आताच ठरवून घेऊ म्हणून लागलीच तिला विचारून घेतले.
मम्मीने उद्याच आताच ठरवून घेऊ म्हणून लागलीच तिला विचारून घेतले.
"आता बघ म्हणजे त्यांना नॉनव्हेज पण चालते आणि गोडाचे जेवण पण आवडते."
मेघना त्यांना काय काय आवडते ते सांगू लागली.
मेघना त्यांना काय काय आवडते ते सांगू लागली.
"मम्मी, त्यांना नॉनव्हेज जास्त आवडत ग! तेच बनव तू."
अक्षय बोलला, कारण त्यालाही आवडत होते ते.
अक्षय बोलला, कारण त्यालाही आवडत होते ते.
"नॉनव्हेज नाही बनवता येणार आपल्याला बाळा, लग्नाला अजून सव्वा महिना नाही झाला. त्यानंतर बनवू शकतो आपण."
मम्मी दोघांना समजावत बोलली.
मम्मी दोघांना समजावत बोलली.
"मेघना, तूच सांग आता काय बनवायचे उद्या आपण त्यांच्यासाठी."
मम्मी पुन्हा विचार करून बोलत होती .
मम्मी पुन्हा विचार करून बोलत होती .
"मम्मी आपण गोडाचंच बनवूया, त्यांना रसमलाई आवडते. हलवा, बदामाचा शिरा, गुलाबजाम, पुरणपोळी, खीर.. अजून बरेच काही काही आवडते."
मेघनाने तर पूर्ण लिस्टच दिली होती.
मेघनाने तर पूर्ण लिस्टच दिली होती.
"ए आग बस कर, इतकं काय एकदम नाही खाणार ते. एकच सांग काय ते."
अक्षय तीच ऐकून तर हैराण झाला.
अक्षय तीच ऐकून तर हैराण झाला.
"अरे हो रे, माहितीये मला. मम्मी आपण ह्यातलं काहीतरी बनवू.. रसमलाई बनवूया का?
पप्पा उद्या तुम्ही गोठ्यातून चार लिटर दुध घेऊन या सकाळी लवकरच. म्हणजे मी लवकरच तयारीला लागेन."
मेघना तिच्या पप्पांना सांगू लागली.
पप्पा उद्या तुम्ही गोठ्यातून चार लिटर दुध घेऊन या सकाळी लवकरच. म्हणजे मी लवकरच तयारीला लागेन."
मेघना तिच्या पप्पांना सांगू लागली.
"बरं, अजून काही पाहिजे असेल तर आत्ताच सांगून ठेव."
पप्पा पण खुश होऊन बोलले.
पप्पा पण खुश होऊन बोलले.
"नाही पप्पा, बाकीच मी अक्षयला सांगेन. तुम्ही सकाळी लवकर उठतात म्हणून दूध आणून द्या फक्त."
"बरं, चला पोरांनो झोपा आता. बराच उशीर झालाय. मी जातो झोपायला. गुड नाईट."
असे म्हणून पप्पा झोपायला निघून पण गेले. त्यानंतर आई पण सगळं आवरून झोपायला गेली. अक्षय पण मॅच बघत बसला.
असे म्हणून पप्पा झोपायला निघून पण गेले. त्यानंतर आई पण सगळं आवरून झोपायला गेली. अक्षय पण मॅच बघत बसला.
मेघनाला झोप तर येत होती, पण आदित्यच्या फोनची वाट बघत बसलेली आणि लगेच त्यांचा मेसेज आला.
"कित्ती छान ना!"
आपण मनापासून ज्याची आठवण काढत असतो तो ही आपली आठवण काढतोय. ही फिलिंगच किती सुखद असते.
"कित्ती छान ना!"
आपण मनापासून ज्याची आठवण काढत असतो तो ही आपली आठवण काढतोय. ही फिलिंगच किती सुखद असते.
मेघना लगेच उठून सीडी आणि अल्बम घेऊन तिच्या रूममध्ये आली. लॅपटॉप वर सीडी चालू केली, आता आदित्यला दाखवुया म्हणून. ते पण खुश होतील इतके सुंदर फोटो बघून.
मेघना वर आली नाहीतर फोन वाजला, घाईघाईने मेघनाने कॉल उचलला. एकतर हातात जड बॅग अल्बमची.. ती कशी बशी बेडवर ठेवली आणि बोलायला सुरुवात किली.
"हाय स्वीटी."
"हाय आदि."
"काय मग, कशी झाली पार्टी."
"खूप मस्त, इतक्या दिवसांनी सगळ्यांना भेटून खूप छान वाटले." मेघना अगदी खुश होऊन बोलत होती.
"अरे वाह, आणि उद्याची तयारी केली का?"
"उद्या कसली तयारी?"
मेघना मुद्दामच बोलली.
"विसरलीस का?"
आदित्य तिला आठवण करून देत बोलला.
आदित्य तिला आठवण करून देत बोलला.
"हा हा हा.. कशी विसरेन. तुम्ही येताय ना उद्या."
"मी नुसतं येतच नाहीये, उद्या तुला घ्यायला येतोय.. आणि हो, बॅग भरून ठेवलीस का तुझी."
आदित्य तिला एक एक काम सांगत होता.
आदित्य तिला एक एक काम सांगत होता.
"नाही अजून, भरते ना मी उद्याच. आता खूप दमले मी."
"बरं ठीक आहे, दमली तर झोप मग.. आपण उद्या बोलू."
आदित्य पण मुद्दामच बोलला तसं तिला.
"नाही तस नाही, म्हणजे मला आता फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. कामं नका ना सांगू तुम्ही."
"हा हा हा हा, बरं राणी सरकार. मग अजून काय काय केलं?"
"आज आपल्या लग्नातले फोटो आणि सीडी अक्षय घेऊन आला, तेच बघत होते मी सगळ्यांसोबत."
"अरे वाह, लवकर आले की. आपले पण त्यालाच सांगितलंय ना! म्हणजे डबल अल्बम करायला सांगितलाय त्याला. केला असेल तर आपल्याला इकडे घेऊन येता येईल लगेच."
"हो, दोन्हीकडचे अल्बम सेमच असणार ना आता, मग आता हा मिळाला आहे तर हाच घेऊन जाऊ तिकडे."
"हम्मम, बरं झालं लवकर मिळाला ते."
"सगळे फोटो खूप सुंदर आलेत आपल्या सगळ्यांचेच."
मेघना अजूनही फोटो बघतच बोलत होती.
मेघना अजूनही फोटो बघतच बोलत होती.
"आता मी बघतो आता उद्या आल्यावर."
"हम्मम्म, मी तेच बघत बसलीये. कितीदा बघून झाले पण मन भरत नाही."
"अरे, अस काय आहे त्यात."
"तुम्ही.."
मेघना लाजतच बोलत होती.
मेघना लाजतच बोलत होती.
"घ्या, इथं मी स्वतः बोलतोय ते सोडून फोटोत बघत बसली मला."
"हा हा हा हा हा.. वेड लागलंय मला तुमचं."
"खरंच का, उद्या भेटल्यावर बघायला पाहिजे तुला."
"हा हा हा हा, बरं कधी निघणार तुम्ही? लवकर निघा तिकडून म्हणजे दुपार व्हायच्या आता पोहोचाल जेवणाच्या वेळेवर."
"हम्मम सकाळी लवकरच निघेल."
"आई आणि गार्गी पण येताय ना?"
मेघनाने ते सुद्धा विचारून घेतले म्हणजे तशी करायला बरी उद्याची.
"येणार होत्या, पण गार्गीचा अजून एक पेपर बाकी आहे म्हणून आई तिच्यासाठी घरी थांबणार आहे."
"अरे, अस आहे का? मग तुम्ही एकटेच येणार का उद्या."
"हो शक्यतो एकटाच येईन, बघू.. आन्याला विचारलं आहे, त्याला सुट्टी मिळाली तर तो येईन सोबत."
"ओके, या घेऊन त्यांना पण. मी वाट बघेन तुमची."
"हम्मम, चल झोपतो आता मी पण, उशीर खूप झालाय बारा वाजून गेले. सकाळी लवकर उठायचं पण आहे."
आदित्य घड्याळ बघत बोलला.
आदित्य घड्याळ बघत बोलला.
"हो हो, मी पण झोपते आता. बाय गुड नाईट."
"गुड नाईट स्वीटहार्ट, सी यु सून."
दोघांना आता उद्या कधी भेटतोय असे झाले होते. नवीन लग्न झाल्यावर नवीन नवीन प्रेमात पडल्याचा आनंद खूप गोड असतो.. आणि त्याहून जास्त एकमेकांची वाट बघण्याचा.
बराच वेळ गप्पा मारून मेघना तशीच तिच्या बेडवर उशाजवळ फोटोंचा अल्बम घेऊन झोपी गेली.
बराच वेळ गप्पा मारून मेघना तशीच तिच्या बेडवर उशाजवळ फोटोंचा अल्बम घेऊन झोपी गेली.
तिकडे आदित्य पण तिच्याच विचारात हरवून गेला होता. उद्या भेटणार म्हणून मनातल्या मनात खुश होत उद्याची वाट बघत झोपी गेला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा