Login

गुंतवणूक भाग 1

गुंतवणुक जशी पैशांची असते तशीच भावनांची



गुंतवणूक.

" सारिका ह्या दिवाळीला काय खरेदी करतेस स्पेशल?"
संजनाने फोनवर विचारले.
" आपण मागच्या वेळी पैठणी पाहिली होती. तीच घेणार आहे."
सारिका मनाने दुकानात पोहोचली सुद्धा.
"आई,मी निघते ऑफिसला. मावशी येतील थोड्या वेळाने."
समीक्षा भरभर बोलत गेलीसुद्धा निघून.

"बघितलेस! महाराणी गेल्या ऑफिसला. तुला सांगते यांनाही सुनेचे फार कौतुक. सी. ए. आहे ना."
सारिका आता चिडली होती.

"तिने केली का खरेदी? तिचीही पहिलीच दिवाळी आहे ना?"

संजनाने विचारले.

"जाऊ दे,सासरे आणि सून मिळून घेतील शेअर्स वगैरे. मी आपली छान खरेदी करणार आहे."

सारिका फोनवर बोलत असताना गिरीश मागे उभा राहून हसत होता.

"काय सांगत होतीस मैत्रिणीला?"
गिरीशने खडा टाकला.

"ऐकलेत ना आताच. मला वाटलं महाराणी सोबत गेलात तुम्ही पण."

नाक मुरडत सरिकाने उत्तर दिले.

"निघतच होतो,एक फाईल सापडत नव्हती."

गिरीश चप्पल घालून बाहेर पडत बोलला.

"अहो,ऐका,उद्याचा दिवस मोकळा ठेवा माझ्यासाठी." सारिकाने बाहेर पडता पडता ऐकवलेच.


खाली गाडीत समीक्षा वाटच पहात होती.
"बाबा, आजपण युद्ध झाले का?" समीक्षाने हसत विचारले.

"आजचे काहीच नाही. आता उद्या खरे मरण आहे. उद्या परत एका सी. ए.च्या...एका नाही दोन सी. ए. च्या नाकावर टिच्चून मृत गुंतवणूक होणार."

गिरीश उसासा टाकत म्हणाला.

दोघेही ऑफिसला गेले. तेवढ्यात ग्रुपवर संजनाने शॉपिंगला जायचा मॅसेज केला. मेघा,अश्विनी,संजना,राधिका सगळ्या लग्गेच तयार झाल्या. अर्ध्या तासात सगळ्या तयार होऊन खाली आल्या.

"राधिका,आधी साड्या घेऊ बाई. डिझाईनर ब्लाऊज शिवायला वेळ लागतो."

संजनाने बेत जाहीर केला.यावर सगळ्यांचे एकमत झाले. शहरातील प्रसिद्ध साडीच्या दुकानात जायचे ठरले. जवळपास दोन किलोमीटर लांब पार्किंग करून रिक्षाने सगळ्याजणी दुकानात पोहोचल्या.


"येस! येस! येस! " गिरीश उत्साहाने ओरडला.

"बाबा,काय?" रामने विचारले.

"हे बघ,मृत गुंतवणुकीची सी. ई. ओ. संजना तिच्या मैत्रिणीना घेऊन खरेदीला गेली. आता निवांत उद्या लोळत पडणार."
गिरीश मॅसेज दाखवत म्हणाला.

"बाबा,आई एवढाही खर्च करत नाही हा!" रामने उत्तर दिले.

"मातृभक्त मुला,तू आता जा. मला हा आनंद उपभोगू दे." गिरीश केबिनमध्ये घुसला.

"आई,अग इथे भरपूर कामे पडलीत. मी नाही येऊ शकत आता खरेदीला."
समीक्षा वैतागत म्हणाली.

"समू अग मी पोहोचले आहे. तू फक्त व्हिडिओ कॉल वर सांग."
मिनाक्षीताई लेकीला विनवत होत्या.

"अजिबात नाही. आज मी दिवसभर क्लाएंट बरोबर आहे." समीक्षाने उत्तर दिले.

तेवढ्यात मिनाक्षीताईंना सारिका आणि त्यांचा ग्रुप दिसला.

त्यांनी फोन ठेवला आणि आवाज दिला.

"विहीनबाई! अहो विहीनबाई!"

सारिकाने मागे पाहिले.

"अय्या मीनाक्षीताई! तुम्ही कशा काय इकडे? ये ह्या आमच्या समीक्षाच्या आई बरं का!"

सारिकाने ओळख करून दिली.

"गेले आठ दिवस तुमच्या सुनेच्या मागे लागले आहे. पहिली दिवाळी आहे. पैठणी घ्यायला चल. तर मला म्हणाली की कॅश दे."
मिनाक्षीताई तक्रार करत बोलल्या.


"मिनाक्षीताई,चला आपण मस्त खरेदी करू." संजनाने आवाज दिला.

सगळ्याजणी आत घुसल्या.

"मला की नाही पडवळी हिरवा आणि कांदा कलरचे काठ असलेली पैठणी हवी." मेघाने जाहीर केले.

"मला तर बाई गाजरी रंग हवा. पण थोडासा गर्द बरं का!" राधिका म्हणाली.

"तुम्हाला सांगते सारिकाताई,माझ्याकडे एक छान शेवाळी रंग होता. आता मेला मिळतच नाही कुठे." अशी जोरदार चर्चा सुरू झाली.


जवळपास चार ते पाच तास घालवल्यावर साडीची खरेदी झाली.
"मला खूप भूक लागली आहे." अश्विनी कुरकुरली.
सगळ्याजणी जेवायला गेल्या.
"सारिकाताई आमच्या इथे एक टेलर आहे. खूप छान शिवते ब्लाऊज. सगळ्या डिझाईनची."
मिनाक्षीताई माहिती पुरवत होत्या.

जेवण आटोपून ज्वेलरी खरेदी करायचे त्राण न उरल्याने सगळ्याजणी घरी निघाल्या. इकडे गिरीश लॅपटॉप बंद करून फोन पाहू लागला. जवळपास पंचवीस हजार उडाले होते. समीक्षा आणि गिरीश रामची वाट पाहत असताना अचानक समीक्षाच्या बाबांचा फोन आला.

"समीक्षा,अग माझे क्रेडिट कार्ड सापडत नाहीय. कुठे गेले असेल?"
त्यांनी आठवायचा प्रयत्न केला.

"बाबा,मोबाईल चेक करा. उत्तर मिळेल." समीक्षा हसत होती.

तेवढ्यात राम घाईने खाली आला.

"चला लवकर,परत आईला घेऊन मला सुहानाझ वर्ल्डमध्ये जायचे आहे."
राम पटकन गाडीत शिरला.

"एक मिनिट! सुहानाझ वर्ल्ड! " समीक्षाने डोक्याला हात लावला.


सुहाना वर्ल्ड काय आहे? खरच साडी मृत गुंतवणूक आहे की रसरशीत रसिकता.
वाचत रहा.
गुंतवणूक.
©®प्रशांत कुंजीर.
0

🎭 Series Post

View all