लग्नाची बेडी- पायातली नव्हे हातातली भाग ३
मागच्या भागात आपण वाचले मानसीला अनिकेतला भेटायचे असते पण अनिकेत खरेदीसाठी येतच नाही आता पुढे......
अनिकेत न भेटल्यामुळे मानसीची चिडचिड चालू असते आई आणि वहिनी तिला समजावत असतात. पण ती काहीच ऐकून घेत नाही. शेवटी कंटाळून संध्याताई तिच्या रूममधून बाहेर हॉलमध्ये येतात.....
"काय मुलगी आहे ही सतत नुसती चिडचिड. ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाहीये काही. कसं समजायचं आता हिला."
संध्याताई काळजीच्या स्वरात म्हणाल्या.
संध्याताई काळजीच्या स्वरात म्हणाल्या.
काय झाले
दोन दिवसांनी घरी परतलेल्या गिरीशने विचारले.(गिरीश,मानसीचा मोठा भाऊ)
बघ बाबा, तूच समजाव आता तुझ्या बहिणीला. लग्नाच्या आधी एकदा अनिकेतला भेटायचं म्हणते.
दोन दिवसांनी घरी परतलेल्या गिरीशने विचारले.(गिरीश,मानसीचा मोठा भाऊ)
बघ बाबा, तूच समजाव आता तुझ्या बहिणीला. लग्नाच्या आधी एकदा अनिकेतला भेटायचं म्हणते.
"काही नको? उगाच काहीतरी वेडेवाकडे बोलायची." मानसीचे बाबा काळजीने म्हणाले.
अहो असं काय करता? तेवढेच ती आधी भेटली तर समाधान होईल तिचं.
"मी बोलतो तिच्याशी" गिरीश आईला मध्येच थांबवत म्हणाला.
गिरीश मानसीच्या रूममध्ये जातो तिथे मानसी इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या मारत असते.
ते बघून गिरीश,
इथल्या इथे फेऱ्या मारल्याने वजन कमी होणार नाही. त्यासाठी तुला बाहेर जावा लागेल.
इथल्या इथे फेऱ्या मारल्याने वजन कमी होणार नाही. त्यासाठी तुला बाहेर जावा लागेल.
काय रे दादा तू. तु ही चिडव आता.एकही चान्स सोडू नको.
अग मग काय करू.अशी काय फेऱ्या मारत बसलीये.ये इथे ये एका जागेवर बस.
गिरीशने मानसीचा हात धरून तिला बेडवर बसवले.
अग मग काय करू.अशी काय फेऱ्या मारत बसलीये.ये इथे ये एका जागेवर बस.
गिरीशने मानसीचा हात धरून तिला बेडवर बसवले.
"तू फिर बाहेर आणि माझ्या पायात मात्र लग्नाची बेडी टाका. बरोबर आहे मी मुलगी आहे ना."
हे बोलताना मानसीच्या डोळ्यात अश्रू आले होते.
हे बोलताना मानसीच्या डोळ्यात अश्रू आले होते.
असं काही नाही ग बछड्या. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत गिरीश म्हणाला.
मी काय सांगतो आहे ते समजून घे,
ही जी लग्नाची बेडी म्हणतेस ना तू ,ती आम्ही तुझ्या पायात नाही तर हातात टाकतोय.आणि तुझ्या हाताबरोबर असा हात या बेडीत अडकवतोय जो तुला नक्कीच तुझ्या स्वप्नांच्या वाटेवर घेऊन जाईन.
ही जी लग्नाची बेडी म्हणतेस ना तू ,ती आम्ही तुझ्या पायात नाही तर हातात टाकतोय.आणि तुझ्या हाताबरोबर असा हात या बेडीत अडकवतोय जो तुला नक्कीच तुझ्या स्वप्नांच्या वाटेवर घेऊन जाईन.
मानसी हे एकूण गिरीशच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणते,
दादा असंच होईल ना नक्की.
दादा असंच होईल ना नक्की.
मी बोललो आहे अनिकेतशी. खूप चांगला मुलगा आहे. तो स्वतः एवढ्या मोठ्या कंपनीत जॉबला आहे,तो नक्कीच तुला समजून घेईल.
गिरीशच्या बोलण्याने मानसीचे समाधान होते.
इकडे सूर्यवंशी यांच्या घरी देखील लग्नाचा विषय चाललेला असतो.
वेळ बघून अनिकेतचे बाबा सगळ्यांच्या समोर म्हणाले,
"मला वाटते अनिकेतला आणि मानसीला आपण लग्नाच्या आधी एकदा भेटू दिले पाहिजे.
तेवढाच थोडा का होईना दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळेल."
"मला वाटते अनिकेतला आणि मानसीला आपण लग्नाच्या आधी एकदा भेटू दिले पाहिजे.
तेवढाच थोडा का होईना दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळेल."
"हो हो भेटू दिलेच पाहिजे "अनिकेतची मोठी वहिनी बाजू घेत म्हणाली."
मोठे काका अनिकेत कडे बघून म्हणाले,"ठीक आहे अनिकेत तुला ज्यावेळेस वेळ मिळेल तेव्हा बोलव भेटायला मानसीला."
अनिकेतलाही मानसीला भेटायची इच्छा होती. ती अशी अचानक पूर्ण झाल्यामुळे तो ही खुश होता.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याचे बाबा त्याला म्हणाले,
"काय जरा थँक्यू वगैरे म्हणा बापाला. तुला जे जमलं नाही ते मी केलं."
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याचे बाबा त्याला म्हणाले,
"काय जरा थँक्यू वगैरे म्हणा बापाला. तुला जे जमलं नाही ते मी केलं."
बाबा काय हो तुम्ही? आणि तुम्हाला कसं कळालं की मला मानसीला भेटायचे ते?
अच्छा तुला पण भेटायचे होते तर....
म्हणजे? अनिकेतने आश्चर्याने विचारले.
म्हणजे? अनिकेतने आश्चर्याने विचारले.
अरे काल मानसीच्या बोलण्यावरून तिला तुला भेटायचे आहे हे समजले म्हणून मी दादाकडे हा विषय काढला.
बर ठीक आहे ,तिला फोन करून सगळं काही ठरव. आणि बाहेरच भेटा म्हणजे निवांत बोलता येईल.
बर ठीक आहे ,तिला फोन करून सगळं काही ठरव. आणि बाहेरच भेटा म्हणजे निवांत बोलता येईल.
घरच्यांची परवानगी मिळाल्यावर अनिकेत ने लगेच मानसीला फोन लावला,
समोरून एक नाजूक गोड आवाज आला.
"हॅलो"
समोरून एक नाजूक गोड आवाज आला.
"हॅलो"
हाय, मी अनिकेत.
एकदम अनिकेत नाव ऐकून मानसीला धक्का बसला. थोड्या वेळात भानावर येत ती म्हणाली,
हाय, मी मानसी.
हाय, मी मानसी.
मला असं कळालं,तुम्हाला मला भेटायचं होतं... अनिकेत
हो ....म्हणजे ..ऍक्च्युली. तुम्हाला कोणी सांगितलं भेटायचं होतं...... मानसी
ते महत्त्वाचं नाहीये.भेटायचं आहे की नाही ते महत्त्वाचं... अनिकेत
हो म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर भेटूया.... मानसी
कधी भेटायचे..... अनिकेत
तुम्ही सांगा...मानसी
उद्या संध्याकाळी सहा वाजता जमेल..... अनिकेत
हो.... चालेल पण कुठे?......मानसी
मी तुम्हाला थोड्या वेळात मेसेज करून ऍड्रेस कळवतो..... अनिकेत
ओके
बाय
गुड नाईट.....मानसी
बाय
गुड नाईट.....मानसी
गुड नाईट.... अनिकेत फोन ठेवतो.
क्रमशः
अनिकेत मानसीला भेटायला तयार झाला आहे पण तो तिचे स्वप्न पूर्ण करायलाही तयार होईल. वाचू पुढच्या भागात.
अनिकेत मानसीला भेटायला तयार झाला आहे पण तो तिचे स्वप्न पूर्ण करायलाही तयार होईल. वाचू पुढच्या भागात.
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा