Login

लग्नाचीबेडी -पायातली नव्हे हातातली भाग ४

Story Of One Marriage
लग्नाचीबेडी -पायातली नव्हे हातातली भाग ४


मागच्या भागात आपण वाचले अनिकेत मानसी ला फोन करून भेटण्याचे कळवतो... आता पुढे

अनिकेतचा भेटण्यासाठी फोन आल्यामुळे मानसीचे बाबाही या गोष्टीला तयार होतात.
अनिकेतला भेटायला मिळणार यामुळे मानसीही खुश असते.
संध्याकाळच्या सहा वाजण्याची ती आतुरतेने वाट पाहत असते.
बरोबर सहा वाजता ती अनिकेत ने मेसेज करून पाठवलेला रेस्टॉरंटच्या ऍड्रेस वर पोहोचते.
ठरल्याप्रमाणे बुक केलेल्या टेबलवर मानसी जाते. तिथे आधीच अनिकेत आलेला असतो. तिला पाहून अनिकेत उभा राहतो....
गुलाबी रंगाची कुर्ती, स्ट्रेट केस, ओठांवर हलकीशी गुलाबी लिपस्टिक,एका हातात घड्याळ तर दुसऱ्या हातात एक सोन्याची बांगडी, कपाळावर छोटीशी टिकली,गळ्यामध्ये नाजूक चैन आणि कानामध्ये खड्यांचे कानातले. असे हे सिम्पल मानसीचे रूप बघून तो थोडावेळ हरवून जातो.
सगळ्यांमध्ये बघितल्यामुळे त्यानेही मानसीला व्यवस्थित बघितलेले नव्हते. आज पहिल्यांदाच तो तिला एवढ्या जवळून बघत होता.
अनिकेत काहीच बोलत नाही हे पाहून मानसी म्हणाली, बसले तर चालेल ना मी.

तिचे हे बोलणे ऐकून भानावर येत अनिकेत
अरे हो सॉरी बसा ना....

एक दोन मिनिट दोघांनाही सुचत नाही काय बोलावे ते.

काय घेणार...... अनिकेत

काहीही चालेल...... मानसी

असं काही मिळत नाही इथे....... अनिकेत मस्करी करत म्हणाला.

मानसी ही हसून म्हणाली ...कॉफी चालेल.

ओके..... अनिकेत कॉफीची ऑर्डर देतो.

बोला. तुम्हाला काय बोलायचे होते माझ्याशी?.... अनिकेत मानसीच्या डोळ्यात बघत विचारतो.

हो ....म्हणजे ... मानसीला कसे सांगावे ते समजत नाही.

तिला बोलताना अडखळताना बघून अनिकेत म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या मनात जे काही असेल ते बिनधास्त बोला.

अनिकेतच्या अशा बोलन्यामुळे मानसीलाही धीर येतो.
मानसी तिची जॉब करण्याची इच्छा अनिकेत समोर व्यक्त करते.

यावर अनिकेत शांत बसतो. थोड्यावेळ तो काहीच बोलत नाही.

हे बघून मानसीचीही धडधड वाढते.

काय झाले ?तुम्ही काहीच का बोलत नाही?...... मानसी
काय बोलू? तुम्ही तर मला मोठ्या संकटात टाकले आहे.... अनिकेत

म्हणजे?..... मानसी टेन्शनमध्ये विचारते.

"नाही,मला नाही चालणार जॉब केलेला." अनिकेत जरा गंभीर आवाजात म्हणतो.

यावर मानसीला काय बोलावे ते सुचत नाही. तिचा चेहरा एकदमच रडवेला होतो. हे बघून अनिकेतला हसू आवरत नाही; तो मोठ्याने हसतो.

मानसीला काहीच कळत नाही. ती अनिकेत कडे नुसती बघत असते.

"सॉरी!मी चेष्टा केली तुमची." अनिकेत हसू आवरत म्हणतो.

"चेष्टा! ही काय चेष्टा करायची वेळ आहे. किती टेन्शन आले होते मला." मानसी चिडून म्हणाली.

तिला चिडलेले बघून, अनिकेत टेबलवर असलेल्या तिच्या हातावर हात ठेवत म्हणतो,
" मला खूप बर वाटलं एकूण की,माझ्या होणाऱ्या बायकोला जॉब करण्याची इच्छा आहे.तिला स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे आहे. मला अशीच बायको पाहिजे होती. तुम्ही जॉब केलेला मलाही आवडेल.पण....."

पण काय ? मानसीने अधीर होऊन विचारले.

पण यात एक अडचण आहे. आमच्या घरच्यांना नाही आवडणार जॉब केलेला?

पण अस का ? काय प्रॉब्लेम आहे त्यांना?

घरात आम्ही एवढे सगळे जेंट्स आहोत कमवायला तर मग बायकांनी कशाला जॉब करायचा अस त्यांचं मत आहे.

म्हणजे, मी कधीच जॉब करू शकणार नाही का.

अरे,अरे अस लगेच नाराज होऊ नका.मी म्हणालो एक अडचण आहे पण ती सोडवता येणार नाही असे नाही म्हणालो.

तुम्ही मला समजेल असं बोलता का प्लिज. मानसी वैतागून म्हणाली.

ओके ओके... रिलॅक्स.

तुम्हाला जॉब करायचा आहे ना, माझ्या घरच्यांना तयार करण्याची माझी जबाबदारी पण त्यासाठी तुम्हालाही थोडेसे कष्ट घ्यावे लागेल.माझ्या घरच्यांची मंन जिकावी लागतील,मग होईल सगळे तुमच्या मनासारखे.

मानसी पूर्णपणे गोंधळून जाते.
तिला गोंधळलेले पाहून,
तुम्ही याचा जास्त विचार करू नका सगळं माझ्यावर सोपवा....हो पण त्याआधी मला सांगा तुम्ही माझ्याशी लग्न करणार आहेत का नाही.

दुसरा पर्यायच नाही माझ्याकडे काही ...मानसी एकदम बोलून जाते.
ओके ... म्हणजे पर्याय नाही म्हणून लग्नाला हो म्हणताय. ...मी आवडलो म्हणून नाही.

मानसीला यावर काय बोलावे सुचत नाही. जीभ दाबत ती म्हणते सॉरी मला अस म्हणायचे नव्हते.

काय म्हणायचे नव्हते?
तुमचं माहीत नाही पण मला तर तुम्ही आवडल्या.
हे ऐकून मानसी लाजून उभी राहतेआणि म्हणते,
मला निघायला हवं उशीर होतोय.

लगेच काय निघालात.अजून तर बरच काही बोलायचे आहे मला. तुमच्या भावाशी बोललो आहे, मी सोडतो तुम्हाला घरी.
हे ऐकून मानसी मनोमन सुखावते.

दोघंही गप्पांमध्ये हरून जातात.

अनीकेतला भेटून आल्यापासून मानसी खूप खुश होती. आता ती लग्नाची सगळी तयारी छान एन्जोय करत होती.हे बघून घरातले सर्वजण पण खूप खुश होते. संध्या ताईंनी तर गीताला देवासमोर पेढे देखील ठेवायला सांगितले होते.
लग्नाला दोनच दिवस राहिले होते.

क्रमशः

काय होईल लग्नानंतर? ठरल्याप्रमाणे अनिकेत देईल का मानसीला साथ. ही लग्नाची बेडी मानसीच्या पायातली बेडी तर होणार नाही ना ....वाचू पुढील भागात.





फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0

🎭 Series Post

View all