Login

लग्नाचीबेडी- पायातली नव्हे हातातली भाग-6(अंतिम)

Story Of One Marriage
लग्नाचीबेडी- पायातली नव्हे हातातली भाग-6(अंतिम)


मागच्या भागात आपण वाचले अनिकेतला घरातल्यांबरोबर काही बोलायचे असते. आता पुढे


दुसऱ्या दिवशी सकाळीच अनिकेत घरच्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतो.
सगळेजण एकत्र येतात.
अचानक असे काय झाले?काय बोलायचे अनिकेतला?
असे एक ना अनेक प्रश्न सगळ्यांनाच पडतात.

"अरे आता सांगशील का काय झालंय ते
कशासाठी बोलावलंय आम्हा सगळ्यांना इथे?."... मोठे काका.

"हो सांगतो.
मी काही निर्णय घेतले आहे. तेच तुम्हा सगळ्यांना सांगायचे आहे. माझ्या या निर्णयामध्ये तुम्ही सगळेजण सहमत असाल अशी अपेक्षा करतो.'

"अनिकेत आधी सांगशील का काय झालंय ते?."... अनिकेत चे बाबा

"असं कोड्यात बोलू नकोस बरं काय ते स्पष्ट बोल."..... मोठ्या काकू.

अनिकेत सुरुवात केली,
"काल माझ्या ज्या मित्राला मी भेटायला गेलो होतो,तो आता या जगात नाही. डोक्याला मार लागल्यामुळे डॉक्टर त्याला वाचू शकले नाही."

हे ऐकून सगळेच जण हळहळ व्यक्त करतात.

"पण इथे माझ्या डोक्यामध्ये वेगळ्याच विचार चालू आहे. तो तर गेला पण परंतु त्याच्या मागे त्याच्या दोन छोट्या मुली आणि त्याची बायको असे तिघीजणी आहेत. त्यांचे काय होणार आता. त्याची मिसेस तर जॉबही करत नाही. नातेवाईकांवर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे."
कोणती वेळ कोणावर कधी येईल हे सांगता येत नाही."

अनिकेत सगळ्यांकडे बघत म्हणाला
"अशी वेळ कधी आपल्यावर आली तर...

"अनिकेत, असं काही अभद्र बोलू नकोस".... मोठ्या काकू रागाने म्हणाल्या

"बरोबर बोलतोय तो वहिनी..... काय चुकीचं बोलला तो".....दोन नंबरच्या काकांनी अनिकेची बाजू घेतली.

"खरंय कोणती वेळ कोणावर कधी येईल सांगता येत नाही"....... मोठे काका.

"अनिकेत तुला नक्की काय म्हणायचे आहे स्पष्ट सांगशील का"...... अनिकेत चे बाबा.

एक मोठा सुस्कारा सोडत अनिकेत म्हणाला
"बाबा मला असं वाटतं आपल्या घरातल्या लेडीज ने आर्थिक दृष्ट्या सक्षम असावे. "
"जानवी वहिनी (मोठ्या काकांची दोन नंबरची सून)लग्नाच्या आधीही मुलांना शिकवत होत्या. त्यांनी आत्ता मुलांचे क्लासेस घेतले तर काय हरकत आहे.
आणि मानसीच म्हणाल तर ,मानसीला सुद्धा आधीपासून जॉब करायचा होता. तिला कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो. ती स्वतः आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकते.
गायत्री वहिनी ही त्यांच्या आवडीचं कोणतेही काम करू शकतात. काय हरकत आहे या सगळ्यांना त्यांच्या पायावर उभे करायला.
एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी वाईट गोष्टीची वाट का बघायची"

"अरे पण अनिकेत घरातली सगळी काम"...

मोठ्या काकूंना मध्येच थांबवत; दोन नंबरच्या काकू म्हणाल्या...
"ताई घरातल्या कामांची नको काळजी करायला.ते करायला मी सक्षम आहे. मला तर चालेल आपल्या सुनांनी जॉब केलेला.'

अनिकेतच्या या मताशी सगळेजण सहमती दर्शवतात.
आता प्रश्न असतो तो मोठ्या काकांचा
मोठे काका आता काय निर्णय घेतात यावर सगळ्यांचं लक्ष लागते.....

काकानी शांत बसून सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं... आणि म्हणाले
"मलाही पटतंय. एखादा चांगला बदल होण्यासाठी वाईट गोष्ट घडलीच पाहिजे असं नाही,
बाहेर घडणाऱ्या घटनांमुळेही आपण शिकले पाहिजे. काळ ही बदलला आहे. काळा बरोबर नाही चाललो तर आपण मागे पडू. म्हणून या गोष्टीसाठी माझी पूर्ण सहमती आहे.
बाकीचे सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा."

हे ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला. आता सगळेजण काकूंकडे बघतात....

"अरे असं सगळेजण माझ्याकडे काय बघतात. मी काय खडूस सासू नाहीये. मलाही चालेल माझ्या सुनांनी जॉब केलेला."

काकूंचे हे बोलणं ऐकून सगळेच जण हसतात.

काकू मानसीला विचारले
"मानसी तुला आयटी कंपनी जॉब मिळेल ना गं.
हो .पण का तुम्ही असं का विचारलं?"

"ती शेजारची सुशीला सारखी म्हणत असते माझी सून आयटी कंपनीत... आयटी कंपनीत.... मलाही सांगता येईल ना माझी पण सून आयटी कंपनी ते."

बघा इथे तर पुढचं प्लॅनिंग पण सुरू झालं......
मोठे काका असे म्हणून निघून गेले.

"हुश्श."....मानसीने सुस्कारा सोडला

ती अनिकेत कडे बघून, इशारानेच त्याला थँक्यू म्हणाली.

अनिकेत मानसीजवळ आला
"तयारी सुरू कर. आठ ते दहा दिवसात तुला इंटरव्यू साठी कॉल येईल."

"काय? " मानसी आश्चर्याने

"हो माझ्याच कंपनीत वेकेन्सी आहेत."
हे एकूण मानसीला खूप आनंद होतो. ती अनिकेतला मिठी मारणार तोच तिच्या लक्षात आले की इथे सगळेजण आहेत. तीने स्वतःला थांबवले.

जानवी सुद्धा क्लासच्या तयारीला लागते.

महिनाभरातच सूर्यवंशी घरातल्या दोन लेडीज स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. घरातले सगळेच खूप आनंदी होतात.

गायत्रीलाही (मोठी सून) वाटत असते आपण काहीतरी करावे. पण काय करायचे हेच तिला समजत नाहीं. गायत्रीने सगळ्यांसमोर आपली खंत व्यक्त केली. त्याच वेळेस मानसी ऑफिस मधून आली आणि पळत येऊन गायत्रीच्या गळ्यात पडली. ताई मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आणलेली आहे.

"माझ्यासाठी कोणती".... गायत्री.

"तुम्ही कुकिंग मध्ये एक्सपर्ट आहात ना तर आपण तुमच्या रेसिपींचा युट्युब वर एक चॅनेल चालू करू.".

"खरंच असं काही करता येईल."... गायत्री उत्साहाने विचारले

"हो तर .
तुम्ही एकटाच नाही तर या शोमध्ये काकूही तुमच्या बरोबर असतील."

"काय मी? मोठ्या काकू ओरडतात. नाही बाई मला नाही जमणार ते."

"जमेल हो काकू. मी सगळं सांगेन तुम्हाला"....मानसी

थोड्या दिवसात गायत्रीचा आणि मोठ्या काकूंचा युट्युब वर कुकिंग चा 'सासु वर्सेस सून' या नावाचा चॅनल चालू होतो. आणि त्याला खूप प्रतिसाद ही मिळतो.
आता घरातले सर्वजण खूप खुश असतात. विशेषता मानसी आणि अनिकेत.

मानसी आपल्या माहेरी जाते,
तिला आनंदी बघून माहेरचे ही सगळे खुश होतात.

गिरीश मानसी जवळ जाऊन तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला

"काय मग मनी माऊ ,कशी वाटते ही लग्नाचीबेडी"...
मानसी हसून म्हणाली...

"दादा तू म्हणाला होतास ना ही पायातली बेडी नसून हातातली आहे. ते अगदी खरं होतं. ही हातातली बेडी मला माझ्या स्वप्नांकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे ही हातातली लग्नाचीबेडी कायम ठेवणार आहे."

* लग्नाचीबेडी -पायातली नव्हे हातातली *

समाप्त.
सुजाता इथापे








फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0

🎭 Series Post

View all