Login

लग्नाचीबेडी - पायातली नव्हे हातातली भाग २

Story Of One Marriage
लग्नाचीबेडी - पायातली नव्हे हातातली भाग २

मागच्या भागात आपण वाचले मानसीला लग्न करायचे नसते परंतु घरच्यांच्या आग्रहाखातर ती तयार होते. आता पुढे ......


मानसीला लाल रंगाच्या साडीत बघून,
"वा! किती छान दिसतय माझं पिल्लू.दृष्ट नको लागायला."
मानसीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आज्जीने बोटं मोडली.

"हो तर आजी,सगळ्यांचे लक्ष आज तुमच्या नातिकडेच असणार आहे. खासकरून एका व्यक्तीचं."
गीता मस्करी करत म्हणाली.

मानसीने मात्र रागाने बघितल्याने ती शांत बसली.

"खरंच हो, दृष्ट नको लागायला माझ्या बाळाला खूप गोड दिसतीये आज! "डोळ्यातले काजळ मानसीच्या कानामागे लावत संध्याताई म्हणाल्या.

पुरे झाले कौतुक. चला आता,उशीर होतोय.
सुवर्णाताई मोठ्याने म्हणाल्या.

सर्वजण बाहेर उभ्या असलेल्या गाडीमध्ये जाऊन बसले.
थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या साड्यांच्या शॉप बाहेर येऊन थांबली.

मानसी,गीता,संध्याताई आणि सुवर्णाताई उतरून आत गेल्या.

तिथे मानसीचे बाबा आणि काका आधीच पोहोचले होते. मुलाकडची मंडळी अजून पोहोचायची होती.

मानसीला उदास बघून, तिचे बाबा तिला एका बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले
" मानसी मला माहिती आहे तुला हे लग्न करायचे नव्हते; पण बाळा विश्वास ठेव, मुलगा खूप चांगला आहे. तो तुला तुझे सगळे स्वप्न पूर्ण करू देईल."

बाबांचे हे बोलणे ऐकून मानसी म्हणाली,
"जाऊ द्या बाबा असेही मी आता जे माझ्या नशिबात असेल त्यासाठी तयार आहे."

मुलाकडची मंडळी आले.
नमस्कार सूर्यवंशी साहेब! असं म्हणत मानसीच्या बाबांनी त्यांच्या हातात हात दिला.

"सूर्यवंशी" परिवार हा एक मोठा परिवार.
तिघ भाऊ एकत्र राहत होते.
अनिकेत हा सगळ्यात छोट्या भावाचा मुलगा. अनिकेतला आई नव्हती.
मोठ्या काका काकूंना दोन मुलं आणि त्यांच्या दोन बायका तर दोन नंबरच्या काका काकूंना एक मोठी मुलगी आणि एक मुलगा होता. मोठ्या मुलीचे लग्न झाले होते तर मुलाचे अजून व्हायचे होते.
अनिकेत चे बाबा परिवारामध्ये सगळ्यात लहान होते तर अनिकेत हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

अनिकेत लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे घरामध्ये सगळ्यांचा लाडका होता तसेच त्याच्या लग्नाची ही सगळ्यांना उत्सुकता होती.


सगळे एकमेकांना भेटल्यावर खरेदीसाठी गेले.
मानसीने सगळे जरी नशिबावर सोडले असले तरीसुद्धा तिची नजर त्या सगळ्यांमध्ये अनिकेतला शोधत होती.

तिची ही अवस्था बघून गीताने मोठ्या काकूंना विचारले, अनिकेत कुठे दिसत नाहीये.

यावर काकू म्हणाल्या,"आज अनिकेतची महत्वाची मीटिंग होती त्यामुळे त्याला यायला जमले नाही."

हे ऐकून मानसीचा चेहरा अजूनच पडला.
तिला अनिकेतला भेटायचे होते. तिच्या स्वप्नांबद्दल त्याच्याशी बोलायचे होते. पण अनिकेतच आला नसल्याने तिने केलेल्या विचारांवर पाणी फिरले होते.

गीताने कशीबशी मानसीची समजूत काढली.

थोड्याच वेळात सगळेजण खरेदीमध्ये रंगून गेले. साड्यांची खरेदी झाली. माना पानांच्या सगळ्या गोष्टींविषयी दोन्ही बाजूंनी चर्चा झाली.
गीताने मानसीला विचारले,झाले ना सगळे व्यवस्थित; अजून तुला काही घ्यायचे का?

"काय व्यवस्थित झाले का म्हणून विचारते वहिनी, ज्याला भेटायचे होते तो तर आलाच नाही आणि एक महिन्यात लग्न!"

हे मानसीचे बोलणे अनिकेतच्या वडिलांनी ऐकले. त्यावेळेस ते काहीच बोलले नाही पण त्यांच्या लक्षात आले की मानसीला अनिकेतला भेटायचे आहे.

खरेदीनंतर सर्वजण आपापल्या घरी गेले.

क्रमशः

काय होईल? मानसीला भेटता येईल का अनिकेतला लग्नाच्या आधी? वाचू पुढच्या भागात....


फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0

🎭 Series Post

View all