चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदकथा फेरी
जलदकथा फेरी
शीर्षक : प्रेम की आकर्षण? भाग १
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
"भेटुयात ना उद्या..."
अनयचा मेसेज मोबाईलवर झळकला आणि ती खूश झाली.
"उद्या लगेच नको ना." मनाला कितीही आनंद झाला असला तरी वास्तवाचे भान येऊन तिने, म्हणजेच रजिताने मेसेजला उत्तर पाठवले.
"नो! उद्याच..." पलिकडून अनयचा मेसेज आलेला.
"अरे घरी आयत्या वेळी काय सांगू मी? जरा कारणांची सोय करू दे की! सध्या कॉलेजला सुट्टी सुरू आहे ना."
"तरीही उद्याच भेटायचं आहे." अनयचा हट्टीपणा दाखवणारा मेसेज आलाच तरीही.
"काय यार... मॅनेज करावं लागतं मला घरच्यांना. तुला याबद्दल काही वाटत नाही का? ट्राय टू अंडरस्टॅण्ड यार..." शेवटी रजिताने पण काहीसा वैतागूनच मेसेज केला.
"तू पण घे ना मग समजून. आय जस्ट कान्ट वेट... मी मिस करतोय तुला म्हणून सांगतोय ना भेटुयात."
"बरं हो; पण उद्या नाहीच रे जमणार भेटायला. आपण परवा नक्की भेटुयात. करते मी काहीतरी. प्लीज आता रागवू नकोस हां." अनयच्या बोलण्यावर क्षणात पाघळलेली रजिता म्हणाली आणि दोघांच्या प्रेमाच्या गप्पागोष्टी पुन्हा एकदा रंगू लागल्या होत्या.
तर हे अनय आणि रजिता. रजिता कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकत होती. तर अनय काही महिन्यांपूर्वीच नोकरीला लागला होता. एकाच कॉलेजमध्ये असल्याने ओळख झाली आणि मैत्रीच्या नात्याला कधी प्रेमाचे वळण मिळाले हे त्यांनाही समजले नव्हते. अनय कॉलेजमध्ये असताना दोघांच्या भेटीगाठींना काही बंधनच येत नसे. बरेचदा लेक्चर चुकवून कधी कॅन्टीनमध्ये, कधी कॉलेजच्या बागेत, कधी बाहेरच्या कॅफेमध्ये तर कधी सिनेमाला जाणे वगैरे सुरूच असायचे. या काळात दोघांचे प्रेम चांगलेच बहरले होते. त्यामुळे भेटणे, कॉलवर बोलणे, मेसेजेस करत राहणे,.. हे सगळे काही त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आताशा मात्र दोघांच्या भेटीगाठी कमी व्हायला लागलेल्या. कारण अनय कामाला जायचा आणि रजिता कॉलेजमध्ये. दोघांचे रस्ते अगदी विरुद्ध असल्याने आपसूकच भेटीगाठींवर परिणाम झाला होता आणि कदाचित नात्यावरही!
या हट्टी मेसेजेसनंतर मात्र दुसऱ्या दिवशी रजिताने अनयला बोलल्याप्रमाणे घरी काहीतरी कारण सांगितले आणि अनयला भेटण्याची तयारी सुरू केलेली.
“अनय प्लीज...” अखेर भेटल्यावर नेहमीपेक्षा जरा जास्तच जवळीक साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनयला रजिताने दूर करण्याचा प्रयत्न करत म्हटले.
तिच्या अशा वागण्यामुळे अनय काहीसा वैतागूनच तिच्याकडे बघत होता.
क्रमशः
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
क्रमशः
© कामिनी खाने ( संघ कामिनी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा