Login

रंगात तुझ्या रंगतांना भाग 15 अंतिम

कथा सहवासाची कथा पुन्हा प्रेमात पडतांनाची
रंगात तुझ्या रंगतांना भाग 15 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

दिपू सुमीत खेळायला गेले होते. अनघा प्रदीप रूम मधे सोबत होते. "प्रदीप मुल एकटे आहेत."

"केअर टेकर आहे त्यांच्या सोबत अनघा. आता तू बाकीचा विचार सोड बर. आपण एवढ छान फिरायला आलो ना एन्जॉय कर." प्रदीप तिला समजावत होते.

जरा वेळाने ते दोघ दिपू, सुमीतला घेवून गेम झोन मध्ये आले. तिकडे खूप गेम होते. दोघ मुल खेळत होते. छोट्या कार राईड होत्या. सुमीत सोबत प्रदीप होते. तो खूप एन्जॉय करत होता. त्यांना कार बाबत खूप प्रश्न विचारत होता. दीपु सारख तो हि त्यांना डॅडी डॅडी बोलत होता. प्रदीप खुश होते. सुमीत माझ्याशी बोलायला लागला. खूप मजा येत होती.

" चला पुरे झाल खेळण आता जेवून घ्या." अनघाचा आवाज आला. तिघे तिच्या मागे गेले.

जेवण झाल्यावर मुलांनी आराम केला. संध्याकाळी तिथे गार्डन मधे मुल खेळत होते. अनघा प्रदीप गप्पा मारत होते.

"उद्या सकाळी वॉटर पार्कला जावू. तिथून घरी जावू. खूप काम बाकी आहेत ." प्रदीप पुढचा प्लॅन सांगत होते.

"खूप छान वाटत ना इकडे. आपण नेहमी येवू." अनघा बोलत होती.

रात्री ते दोघ मुलांशी बोलत होते. किती लहान लहान गोष्टी असतात मुलांच्या जगात. खूप गोड होते दोघ मुल.

सकाळी ते वॉटर पार्कला गेले. चौघ कपडे बदलून आले. छोट्या राईड मुल एन्जॉय करत होते. दोघांना प्रदीप छान सांभाळत होते. अनघा खूप खुश होती. ती पण पाण्यात उतरली होती. रेन डान्स मधे खुप मजा आली. अनघा इतक छान नाचते प्रदीपला माहिती नव्हत. ती प्रदीप सोबत खुलली होती.

सगळे थकले होते. जेवण करून ते घरी यायला निघाले.

अनघा प्रदीप कडे बघत होती.

"काय झालं अनघा ?"

थँक्यु.

"कश्या साठी?"

"असच. तू खूप छान आहेस. बर झाल मी तुला होकार दिला."

"कश्या साठी होकार? पिकनिक साठी का ?" प्रदीप मुद्दामून तिला चिडवत होते.

"नाही रे लग्नासाठी."

"मग तर मी तुला थँक्यु म्हणतो. मला.. दिपूला खूप खूप छान वाटत अनघा तू आणि सुमीत आमच्या आयुष्यात आले तर .अनघा सुंदर तर तू आहेच पण मला माहित नव्हत तू एवढी गोड आहेस. "

अनघा लाजली. "प्रदीप पुरे. आपण असाच एकमेकांना वेळ द्यायचा."

"मी तर अगदीच तयार आहे. तुला समजल असेल एवढ्या दिवसात." प्रदीप तिला जवळ घेत बोलले.

अनघा आता खूप हसत होती. "प्रदीप मला बोलू दे ना. "

" बर बोल. "

" आपण एकमेकांना वेळ द्यायचा. लग्न जून झाल तरी अस रहायच प्रेमाने. "

" जस तू म्हणशील तस. ठीक आहे का? आता काय बाबा तू बॉस. तू म्हणशील तस आम्ही मान हलवायच. अजून काही."

"नेक्स्ट टाइम आपण सगळे सोबत पिकनिकला जावू. मालती काकू, माझे आई बाबा, सासुबाई. ते घरी आहेत तर मला चांगल वाटत नाही. "

" हो चालेल. गुड आयडिया. मुल राहतील त्यांच्या कडे आपण दोघ सोबत अजुन जास्त एन्जॉय करू. "

" प्रदीप काय हे? "

" अरे मग बरोबर आहे. "

घर आल. मुल झोपलेले होते. अनघाने त्यांना उठवल. मालती काकू बाहेर पर्यंत आल्या होत्या . सगळ्यांना बघून त्या खुश होत्या. "तुम्ही लोक नव्हतात तर मला घरात बोर झाल. "

" आई आली होती का काकू ? "

"हो काल मी तिकडे होती दिवस भर. माझ, रेखा ताई, प्रतिभा ताईंच ठरलं रोज बागेत फिरायला जायच. छान वाटत ग तिकडे. बरेच मित्र मैत्रिणी आहेत समवयस्क. "

" हो काकू ड्रायवर सोडून देतील तुम्हाला."

" छान आहेत तुझ्या माहेर लोक. तुझ्या सारखे." मालती काकूंना किती बोलू किती नको अस झाल होत.

" चला मुलांनो फ्रेश व्हा. आता जरा वेळ अभ्यास करा. खूप मजा झाली. पिकनिक झाली. उद्यापासून स्कूल आहे."

दोघा मुलांनी थोडा वेळ अभ्यास केला. होमवर्क पूर्ण आहे का अनघा बघत होती.

प्रदीपही त्यांच्या कामाचं बघत होते. अनघाने आईकडे फोन केला. "आम्ही आत्ताच आलो आहोत थोड्या वेळापूर्वी. "

" कशी झाली ट्रीप? दिपू सुमीतला मजा आली असेल ना. "

" हो छान मजा केली त्यांनी."

रेखा ताईंशी बोल.

" आई कशा आहात तुम्ही?"

"मी मजेत आहे ग. कशी झाली तुमची ट्रिप?

" चांगली झाली सुमित दिपू मजेत आहेत. तुमची तब्येत ठीक आहे ना?"

"हो अनघा अग आपल्या घरी चार मुली आल्या रहायला. "

" बर झाल विद्यार्थिनींना दिल घर भाड्याने."

हो ना.

"मी उद्या येते आई भेटायला."

"हो ठेवते ग फोन. "

जेवण झालं. मुलं त्यांचं त्यांचं खेळत होते. अनघा विचार करत होती.

"काय झालं आहे अनघा? "

" मी असा विचार करते आहे की पुढच्या आठवड्यात आईंना इकडे घेऊन येईल आपल्या सोबत रहायला. "

" चालेल पण त्याआधी जरा दोन-तीनदा त्यांना सांगून दे की त्यांना इकडे यायच आहे अस . म्हणजे त्यांच्या मनाची तयारी होईल. त्यांच्या गोळ्या औषध व्यवस्थित आहेत ना ते बघ." प्रदीप सांगत होते. अनघा नीट ऐकत होती. आईंच्या मनाचीही काळजी घ्यायला हवी. तर तब्येत नीट राहील.

" प्रदीप एक बर झाल की आता आईंची मालती काकूं सोबत पण मैत्री झाली आहे. काकू रोज बागेत जायचं बोलत आहे. त्यांच्यासोबत आई पण जातील बागेत. "

" उद्यापासूनच काकूंना जाऊदे बागेत."

सकाळी लवकर उठून मालती काकू ड्रायव्हर सोबत बागेत गेल्या. तिथे त्यांना प्रतिभाताई आणि रेखाताई भेटल्या. रेखाताईंना बरं वाटत होतं की त्या घरूनही इकडे येता येईल. तसं त्यांना सुमितची खुप आठवण येत होती. त्याच्यापासून दूर राहावल जात नव्हतं. आता बागेत यायची सोय झाली बर झालं म्हणजे तिकडे सुमित जवळही राहता येईल आणि आपले छंदही जोपासता येतील. मालती काकूंना त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. त्यांचा हास्य क्लब होता. नंतर त्या फिरायला जायच्या.

अनघा आवरून बँकेत गेली. संध्याकाळी ती जरा वेळ प्रतिभाताईंकडे गेली होती. रेखाताई भेटल्या. खूप छान वाटत होतं. खूप बोलत बसल्या त्या. आधी सारख्या वाटत होत्या.

"रविवार पासून तिकडे राहायला या आई."

रेखाताई खूप खुश होत्या. "येईल ग मी मला पण सुमितची खुप आठवण येते आहे."

"आम्ही येतो रविवारी इकडे, दिवसभर राहू संध्याकाळी तुम्ही पण सोबत चला. आता नाही तरी मालती काकू तुमच्यासोबत येतातच बागेत फिरायला."

"हो काहीच अडचण नाही. "

अनघा घरी आली." सुमीत दीपू रविवारी आजी इकडे येणार आहे."

दोघ मुल खुश होते.

रविवारी मुलं आजीकडे जायचं म्हणून तयार होते.

" अनघा या दोघांना तिकडे सोडून तू घरी ये. " प्रदीपच्या बोलण्याने अनघा खूप लाजली होती.

" नको अस. " ती बोलली.

" सांग काहीतरी काम आहे. आय एम सिरीयस. तु जर वापस आली नाही तर मी तुला तिकडे घ्यायला येईल. सगळ्यां समोर उचलून इकडे घेवून येईल. मग मला सांगू नको."

" नको ना प्रदीप. असं करता येणार नाही. "

"मग तू जाऊ नको. मालती काकूंना मुलांना कार सोबत पाठवून दे. "

मुलं नाश्ता करत होते. मालती काकू समोर बसलेल्या होत्या. प्रदीप आले. "काकू तुम्ही मुलांना घेऊन पुढे जा. मी आणि अनघा येतो दुपारनंतर. आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे थोडं काम आहे."

ठीक आहे.

अनघाला समजतच नव्हतं कुठे बघावं. प्रदीप पण जास्त करतो.

" चालेल ना दिपू सुमीत. काकूं सोबत जायच आजीकडे." प्रदीप सांगत होते.

हो.

"तिथे घराबाहेर जायच नाही खेळायला. आजी बाबांच ऐकायच." अनघा काळजीत होती मुलांनी त्रास दिला तर.

हो मम्मी.

थोड्यावेळाने मुलं आणि मालती काकू प्रतिभाताईंकडे गेले. आत मध्ये आल्यानंतर प्रदीपने अनघाला मिठीत घेतलं." हे ऑप्शन छान आहे ना? आपण दोघ. मस्त. आता बराच वेळ आहे आपल्या कडे."

हो. अनघा पण खुश होती.

"मुलांना आजी कडे सोडून द्यायच मग तू आणि मी. "

" प्रदीप मुलं राहतील ना तिकडे?"

" आता काहीच अडचण नाही. तीन आजी आहे तिकडे त्यांना सांभाळायला. तू आता जरा माझ्याकडे लक्ष दे."

" लक्ष दे म्हणजे काय? "

"समजून सांगू का व्यवस्थित?" अनघा लाजली होती ती प्रदीप जवळ उभी होती. त्यांनी तिला उचलून आत नेल. हनीमून फेज संपला नाही अजून आपला अनघा. एन्जॉय कर जरा.

ते दोघं खूप छान रमले होते सोबत.

" अनघा मला अशा ब्रेकची खूप गरज आहे. खुपच छान वाटत आहे तुझ्यासोबत. मोकळ्या वातावरणात तू पण छान खुलते."

अनघा खूपच लाजली होती. प्रदीप पुरे.

दोघांचे जेवण झालं. "चल आता आपण शॉपिंगला जावू. येतांना मुलांना घेऊन येवु."

"शॉपिंगला का?"

"माझ्या बायकोला छान साडी घ्यायची आहे. "

" आणि ही लाडीगोडी का? "

" असच. आजचा दिवस छान गेला. बाकीचे दिवस असे गोड जाण्या साठी."

अनघा आता प्रदीपला मारत होती. "मला चिडवायच नाही."

"बर बाबा मला वाटत म्हणून घे साडी. " दोघ दुकानात गेले. सुंदर दोन साड्या घेतल्या. एक दोन ड्रेस घेतले. मुलांसाठी ही ड्रेस घेतले. रेखा ताई, मालती ताई, प्रतिभा ताईं साठी फिरायला जायला कॉटनचे ड्रेस घेतले.

दोघं प्रतिभाताईंकडे गेले. त्यांनी खूप छान स्वागत केलं. मुलांनी तर खूप खाऊ खाल्ला होता. मालती ताई, रेखाताई खुश होत्या.

"चला आता घरी संध्याकाळी अभ्यास आहे. मग उद्याची तयारी करायची आहे."

अनघा खरेदी दाखवत होती. सगळ्यांना ड्रेस आवडले.
मस्त पोहे केले होते.

"अहाहा काय चव आहे. अजून द्या काकू." प्रदीप खुश होते. "अनघा असे पोहे हवे मला रोज."

चहा पाणी झाल्यावर ते घरी आले. रेखाताई पण आता खुश होत्या. त्यांनी आल्या आल्या मुलांसोबत दिवा बत्ति केली. आरती केली. दिपू सुमीत खुश होते.

त्या आणि मालती ताई किचन मध्ये काहीतरी करत होत्या.

" काय करता आहात आई?"

"मुलांसाठी खीर करते आहे. आता ठरवल आहे मी रोज एक पदार्थ करेन तुमच्या सगळ्यांसाठी." रेखा ताई आधी सारख्या कामाला लागल्या होत्या.

अनघाला बर वाटल.

मुलांना खीर खूप आवडली. प्रदीप हॉस्पिटल हून आले. त्यांना खीर आवडीची होती. "वाह काकू मस्त बेत झाला."

रेखाताई, मालती काकू एकाच रूम मध्ये होत्या. त्या दोघांनीच तो पर्याय निवडला होता. त्यांच्यात सुमीत दिपू पण लुडबुड करत होते.

सकाळी दोघी उठून ड्रायव्हर सोबत गार्डन मध्ये फिरायला निघून गेल्या. मुलांची तयारी झाली. ते मुलं शाळेत गेले.

प्रदीप नेहमीप्रमाणे अनघाच्या मागे मागे करत होते. "मुलं शाळेत गेले. दोघी काकू घरी नाहीत. आता काय अनघा?"

" प्रदीप मला खूप उशीर होत आहे बँकेत जायला."

"मला माहिती नाही काही."

"प्लीज प्रदीप मी ओरडेन ह."

"मी सोडून देईन तुला कारने बँकेत. वाटलं तर तुमच्या साहेबांशी पण बोलेल."

"काय बोलणार?"

"हेच की बँकेचा वेळ बदला. मला सकाळी बायको सोबत वेळ घालवता येत नाही. ती नकार देते. माझ्या जवळ येत नाही ."

"प्रदीप तुझ म्हणजे म्हणजे काहीतरी असतं."

"अनघा चल ना. हो बोल .प्लीज ..काय हव तुला? शॉपिंग करायची का? फिरायला जायच का? दागिने हवे? की पाणीपुरी, भेळ खायची , तू म्हणशील ते करेन मी. एक काम करू आपण आज तुझ्या आई बाबांना इकडे बोलवून घेवू. आइस्क्रीम पार्टी करू. " त्यांना अनघाची आवड माहिती होती.

अनघा खूप हसत होती. " प्रदीप तू मला खूप त्रास देतो आहेस . चल..." प्रदीप खुश होते. मनाप्रमाणे होत होतं. ते तिच्या मागे गेले.

दुसऱ्या लग्नाचा दोघांचा निर्णय बरोबर होता. आनंदी राहायचा प्रेम मिळवण्याचा दोघांनाही हक्क होता. आता ते खूप सुखी झाले होते.