Login

संसारातले राजा राणी भाग १

राजेश गाडी हळु चालवतो हा दामिनीचा भ्रम आज दुर झाला होता. पण राजेशच्या घरी त्याचंया स्वागतासाठी उभे असेलली आई आणि बायको याबद्दल त्याला पुसटशी ही जाणीव नव्हती.
“अग तो बघ” अनिता जोरात बोलली.

सगळे तिने दाखवलेल्या दिशेने बघायला लागले.

“राजु चालला आहे, थांबव त्याला.” अनिता

“नको न मावशी तो गाडी खुप हळु चालवतो आणि आम्हाला लवकर जायच आहे.” दामिनी जशी बोलली. तस तिच्या चेह-यावर पाण्याचा फवारा उडाला होता.

“येडपट निट पि न पाणी.” दामिनी जवळजवळ खेकसलीच.

अनिता तिची मुलगी तन्वी आणि तन्वीची मैत्रीण दामिनीसोबत बसस्टँडवर उभी होती. अनिता काही दिवसांसाठी तिच्या माहेरी गेलेली होती. त्यांना सोडायला घरातले पण आलेले होते. त्या गावच बसस्टँड म्हणजे चौकातल्या वडाच्या झाडाचा कठडा. त्यांना आजच्या आज मुंबईला पोहोचायच होत. दोघींचा व्हायवा लागला होता दुपारी ३ च्या सुमारास. त्या गावापासुन मुंबईला पोहोचायला किमान ४ ते ५ तास लागत होते आणि बसने जायच म्हटलं कर ५ ते ६ तास. त्यात आज एकही बस भेटत नव्हती. प्रायव्हेट गाडीवाले पण बाजाराच्या गावाकडचेच भाड घेत होते. तेवढ्यात अनिताला तिच्या भाच्याची गाडी दिसली. अनिताने त्याला थांबवण्यासाठी जसा आवाज दिला तस दामिनी हळुच बोलली होती आणि तिच ते वाक्य ऐकुन पाणी पिणा-या तन्विला ठसका गेला होता.

“काय बोलली तु??” तन्वी खोकतच बोलत होती. “तो गाडी हळु चालवतो??”

तिला दामिनीच हसायला आल होत.

“तु कधी बसली होतीस गं?” अनिताने ते ऐकल होत.

“ते इकडे येताना निम्मया रस्त्यावरुन त्याच्या गाडीत तर आलो होतो.” दामिनी

तोवर राजेश गाडी एका बाजूला लावुन स्टॅडवरच्या हॉटेलवर आला होता. तिथला पाववडा त्याला खुप आवडायचा. तो आत घुसणार तोच अनिताने त्याला आवाज दिला. राजेश ने तिकडे पाहील तर त्याला अनिता दिसली. तिच्या सोबत दामिनीला पाहुन त्यालाही जाम हसायला आल होत.

“काय ग काकु??” राजेश “इकडे कुठे?”

“अरे पोरींचा व्हायवा लागाला आहे आज ३ वाजता. आता तेवढ्या वेळात पोहोचू अस वाटत नाही. एकही गाडी भेटत नाहीये.” अनिता वैतागून बोलत होती.

“म्हणजे घरी चालले न??” राजेश “मी पण घरीच चाललोय. चल जाऊ मग सोबतच.”

“तु कस काय अचानक इकडे??” अनिता.

“अगं त्या जमीनीच काम होत. काल झाल मग आज निघालो.” राजेशचे पाववडे तोवर त्याच्या हातात आले होते. तो हॉटेलमालक राजेशला चांगलाच ओळखत होता. त्याला बघीतल्या बघीतल्या त्यांना गरमागरम पाववडे काढले होते.

इकडे दामिनीच्या मनात कालवाकालव झाली. ‘इथे आम्हाला उशीर होतोय आणि ह्याला पाववडे खायचे आहेत.’

“खायचे आहेत का तन्वी??” राजेशने तन्वीला विचारल. तिने नाही मध्ये मान हलवली.

तो खात होता तोवर तन्वी आणि दामिनीने त्यांच सामान गाडीच्या थर्ड रॉ मध्ये ठेवल. दामिनीने तर आता आशाच सोडली होती की त्यांना वायव्हा द्यायला भेटेल म्हणून. आता राजेशपण बाकीच्यांसोबत गप्पा मारुन गाडीत येऊन बसला होता.

“दाद्या ३ वाजता वायव्हा द्यायचा आहे आम्हाला.” तन्वी

“३ ला न, खुप वेळ आहे.” राजेश “पोहोचून जाऊ.”

‘ह्याच्यासाठी तर एवढा वेळही कमी पडेल पोहोचायला' दामिनी मनातच बोलली.

राजेशने गाडी काढली. दोन लेन असलेला, सिंगल रोडचा स्टेट हायवे होता. लवकर पोहोचायच म्हणून राजेशने त्याच्या स्टाईलने गाडी चालवायला सुरवात केली. गावाजवळचा घाट संपल्यावर तर गाडीचा स्पिडोमीटरचा काटा १०० च्या पुढे होता. दामिनीने तर आता भितीने सिट घट्ट पकडुन ठेवले होते. जेव्हा ते नॅशनल हायवेला पोहोचले, त्या ४ लेनच्या हायवेवर गाडीचा स्पीड १२० च्या वर होता. दामिनी आता व्हायवा विसरुन गेलेली होती. फक्त घरी निट पोहोचु दे एवढाच देवाला धावा करत होती. कारण त्या दिवशी राजेश तिला सहज बोलला होता का त्याला गाडी एवढी जमत नाही म्हणून, पण त्याची आजची ड्राईव्हींग बघुन तिला सगळेच देव आठवले होते.

सकाळी ९ वाजता निघालेले ते दुपारी १२.३० वाजताच त्यांच्या घरी पोहोचले होते. गाडीतून उतरल्यावर दामिनीला थोड गरगरल होत. राजेश पुढच वाक्य ऐकून तिच गरगरण पण तिला सोडुन पळुन गेल होत.

“तरी आज आरामातच आलो न??” राजेश तन्वीला बोलला होता.

“हो का??” अनिता. “मग सांगु का तुझ्या आईला आम्ही साडेतीन तासात पोहोचलो घरी म्हणून.”

“का गं काकु??” राजेश “मी सुखात असलेलो बघवत नाही का तुला??”

तशी अनिता आणि तन्वी हसायला लागल्या. दामिनी तर अजुनही गोंधळलेली होती. राजेशने त्यांना सोडल्यावर त्याच्या घरी निघुन गेला होता. दोघींना आता २ तास भेटले होते तयारीसाठी. पण दामिनीला काहीच सुधरत नव्हत.

“काय गं?? कुठे हरवलीस??” तन्वी

“मग त्या दिवशी तो एवढ्या मरत मरत का गाडी चालवत होता??” दामिनी

“अग त्या दिवशी गावाकडच्या घरी कोणी नव्हत. त्यातसगळ्यांना घरी पोहोचायला खुप वेळ होता. लवकर जाऊन नुसते बसाव लागल असत म्हणून तो हळुहळु चालवत होता.” तन्वीने खुलासा केला.

“पुढच्या वेळेस तुच बस बाई. मी नाही बसणार. एवढी डेंजर आणली गाडी, वरुन बोलतो आरामात आलो म्हणून. याच्या आधी काय विमान चालवत होते का तो??” दामिनी अजुनही थरथरत होती. तर तन्वी तिची हालत बघुन खुपच हसत होती.

“ते तुला त्यांची सवय नाही न अजुन. चल आवर लवकर, वेळ भेटलाय तर.” तन्वी. मग दामिनी पटकन तिच्या घरी गेली.

राजेशच्या गावाकडे, त्याचे आजोबा पांडुरंग तर आजी रमाबाई. त्या आजोबांना तीन मुल तुकाराम, ज्ञानदेव, सोमनाथ. अनिता ही सोमनाथची बायको, तन्वी आणि प्रतीक त्यांची मुल. तर राजेश ज्ञानदेव आणि शांतीचा (फक्त नावच शांती आहे) मुलगा. तुकाराम आणि हिराबाईंना दोन्ही मुले. एक हेमंत आणि दुसरा गणेश. पुर्ण खानदानात तन्वी एकुलती एक मुलगी असल्याने तिचे भारीच लाड व्हायचे.

राजेशच्या वडीलांना नोकरी लागल्यावर ते मुंबईकडे शिफ्ट झाले होते. नंतर सोमनाथला पण मुंबईला नोकरी लागल्याने ते पण राजेशच्या घराजवळच रहायला आले होते. तेव्हापासून त्यांची बॉंडींग अजुनच घट्ट झालेली होती.

तुकाराम त्याच्या मुलांसोबत सगळी शेती बघत होते. आजोबाही त्यांना होईल तितकी मदत करत रहायचे. बागायती शेती होती. हेमंत त्याच्या वडिलांप्रमाणेच मेहनती होता. एकदा कामाला भिडला की तो कोणालाच ऐकायचा नाही. गणेशने अॅग्रिकल्चरमध्ये डिग्री घेतली होती. परदेशातल्या लाखो रुपयांचा पॅकेज सोडुन, तो गावातल्या शेतक-यांसाठी त्यांच्या गावातच राहीला होता. त्यांच्या शेतीच्या एका भागात गणेश त्याचे वेगवेगळे प्रयोग करत रहायचा. सोबतीला गावातल्या वयस्कर शेतक-यांचा अनुभव पण सोबतीला ठेवायचा. प्रयोग यशस्वी झाला की हेमंतच्या मदतीने शेतात राबवायचा. त्यांच्या सोबतच गावातल्या ब-याच शेतक-यांना प्रगतीच्या वाटेवर त्याने आणलेले होते.

तन्वी आणि प्रतिक अजुनही शिकत होते, त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही कामाचा लोड दिला जात नव्हता. बाकी ज्याला जस जमेल तस गावी जाऊन तुकाराम, हेमंत आणि गणेशला मदत करत होते.

राजेश घरी पोहोचल्यावर त्याने घराच्या दारातच त्याच्या स्वागतासाठी आईला आणि होणाऱ्या बायकोला पाहील होत.
0

🎭 Series Post

View all