Login

संसारातले राजा राणी भाग २

शेवटी राजेशचा उद्धार झालाच. पण आता तर त्याच्या आईने गौरीला गावीच यायच निमंत्रण दिल होत. ते ऐकून राजेशला शॉकच बसला होता.
मागील भागात.

तुकाराम त्याच्या मुलांसोबत सगळी शेती बघत होते. आजोबाही त्यांना होईल तितकी मदत करत रहायचे. बागायती शेती होती. हेमंत त्याच्या वडिलांप्रमाणेच मेहनती होता. एकदा कामाला भिडला की तो कोणालाच ऐकायचा नाही. तर गणेशने अॅग्रिकल्चरमध्ये डिग्री घेतली होती. परदेशातल्या लाखो रुपयांचा पॅकेज सोडुन तो गावातल्या शेतक-यांसाठी त्यांच्या गावातच राहीला होता. त्यांच्या शेतीच्या एका भागात गणेश त्याचे वेगवेगळे प्रयोग करत रहायचा. सोबतीला गावातल्या वयस्कर शेतक-यांचा अनुभव पण सोबतीला ठेवायचा. प्रयोग यशस्वी झाला की हेमंतच्या मदतीने शेतात राबवायचा. त्यांच्या सोबतच गावातल्या ब-याच शेतक-यांना प्रगतीच्या वाटेवर त्याने आणलेले होते. तन्वी आणि प्रतिक अजुनही शिकत होते, त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही कामाचा लोड दिला जात नव्हता. बाकी ज्याला जस जमेल तस गावी जाऊन तुकाराम, हेमंत आणि गणेशला मदत करत होते.

राजेश घरी पोहोचल्यावर त्याने घराच्या दारातच त्याच्या स्वागतासाठी आईला आणि होणाऱ्या बायकोला पाहील होत.

आता पुढे.

राजेश दोघींजवळ गेला. दोघींना मिठी मारली. तो आत जाणार तोच त्याला त्याच्या आईचा मृदु आवाज आला.

“किती वाजता निघाले होते साहेब?” आई

तिचा तो मृदु आवाज म्हणजे वादळापुर्वीची शांतता असते हे त्याला चांगलच ठावूक होत. तो आवाज ऐकून राजेश जरा चपापला. “ते ७.३० च्या आसपास. एकदम आरामात आलो मी.” एकदम निरागस चेहरा करत राजेश बोलला.

“मग दाखवा मोबाईल, गुगल मॅपवरची हिस्ट्री बघते मी.” गौरी राजेशची गर्लफ्रेंड.

दोघांची मैत्री कॉलेजमधली. मग मैत्रीच रुपांतर प्रेमात झाल होत.

राजेशला आता पश्चाताप झाला होता की गुगल मॅपची हिस्ट्री तिला का शिकवली म्हणून.

“ते लोकेशन ऑफ केल होत. बॅटरी जास्त जाते न त्याने.” राजेश बाथरुमकडे वळणार, तोवर राजेशचा मोबाईल गौरीने घेतला सुध्दा होता.

राजेश पटकन बाथरुममध्ये पळाला. नंतर राजेशला ज्या शिव्या सुरू झाल्या त्याच्या आईच्या. त्या बंद झाल्यावरच राजेश हळुच बाथरूमच्या बाहेर आला होता. तरी दोन तीन शिव्या त्याच्या नशिबी आल्याच.

राजेश लहान असताना, त्याच्या पत्रिकेमध्ये वाहन दोष सांगीतलेला होता. तेव्हापासून त्याची आई राजेशला गाड्यांपासुन जास्तच जपत होती.

राजेश कॉलेजच्या कॅम्पस इन्टरव्ह्यु मधुन एका मल्टी नॅशनल कंपनीत उच्च पदावर जॉब लागणार लागला होता. त्याच काम ऑफीसमधूनही व्हायच. पण त्याला फिरायची इतकी हौस की गरज नसतानाही स्वतः फिल्डवर्क वर जायचा. ड्राईव्हिंगची भयंकर आवड. गाडीतून एकटाच प्रवास म्हणजे त्याच्यासाठी पर्वणीच रहायची. ह्या गोष्टी घरच्यांना पण माहीत रहायच्या. पण राजेश काहीही थापा मारुन तो हळुच ड्राईव्हिंग करतो अस पटवून द्यायचा.

जेव्हापासून गौरीची ओळख त्याच्या आई वडीलांसोबत झाली, तेव्हापासून त्याच्या थापांनीही त्याची साथ सोडली होती. आजही तसच झाल. हळुहळु आलेला सांगीतल होत, पण गुगल हिस्ट्रीच विसरुन गेला होता तो. ज्यात अंतर आणि वेळ सगळ व्यवस्थित दिसत होत.

“गौरे, नको तिथे शहाणपणा नको करत जाऊ न” राजेश चिडून बोलला. तस गौरीला अजुनच चेव आला.

“आई” गौरीने जोरात सुर लावला. “हे बघा मला दम देतायेत.”

राजेश तिच तोंड दाबेपर्यंत ती सगळच बोलुन मोकळी झाली होती. परत राजेशच्या उद्धारासाठीचे शब्द त्याला ऐकायला आले होते. तरी नशीब त्याचे बाबा आत्ता घरात नव्हते.

“चुकी झाली, तुला घरातल्यांशी ओळख करुन दिली” राजेश पटकन त्याच्या कामावर पळुन गेला.

“ताने, तुझ्यासाठी मी लवकर गाडी आणली आणि तुच धोका दिलास..” राजेशने ऑफिसवर जाता जाता तन्वीला कॉल लावला होता.

“दाद्या, पण मी काहीच बोलली नाहीये. घरात आल्या आल्या दोघा लाडक्या जावांचा फोन झालाय एकमेकींना. त्यासोबत बोलण्याच्या ओघात ९ ला निघाल्याचे सांगुन दिल होत.” तन्वीने खुलासा केला.

“काकु” राजेश ओरडून बोलला. तन्वीला समजुन गेल की राजेशला चांगलाच प्रसाद भेटायला. ती जाम हसत होती.

“अरे डब्बा तर घेऊन जा” आई बोले पर्यंत राजेश गेला सुध्दा होता.

“द्या माझ्याकडे, मी जाता जाता देईल.” गौरी. आई हसल्या. दोघी किचनमध्ये गेल्या.

“आई एक विचारु??” गौरी जरा कचरत बोलली.

“अशी का घाबरत विचारतेयस, मी काही सासुरवास नाही करणार तुझा.” आई खट्याळ होत बोलली.

“तुम्हाला गावापेक्षा इथेच भारी वाटत असेल न??” गौरी “म्हणजे बघा न, तिकडे कस कोणाचा न कोणाचा गोंधळ चालुच. इथे कस फक्त आपल आपणच. एकदम राजाराणीचा संसार.”

आनंदी गौरीकडे एक नजर टाकली. गौरीला वाटल की त्यांना राग आली की काय.

“तुझ्या घरी कोण कोण असत??” आई “इथे पण आणि गावाला पण??”

“इथे मी, आई न बाबा.” गौरी “आणि भाऊ तर पुणे ला सेटल झालाय. गावाचा जास्त संबंध नाही ठेवलाय.”

“हममममम” आईने एक दीर्घ श्वास घेतला. “ह्या वेळेस न तु पण आमच्या सोबत गावाला चल. तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर भेटुन जाईल. असही हेमंत लग्न ठरवायच आहे.”

“इयु, एवढ्या गर्दीत?” गौरी “हे बोलले होते की खुप मोठा सावळा गोंधळ आहे म्हणून.”

“सावळा गोंधळ आहे, पण आवडेल तुला. एकदा तर चल. असही तुमच लग्न ठरवायला आणि करायला तिथे तर जावे लागेल न. तर आत्ताच ओळख करुन घे.”

गौरीने विचार केला. असही तिला तिच्या आयुष्यात नवनवीन गोष्टी ट्राय करायला खुप आवडायच. म्हणून ती तयार झाली होती. तिच्या जॉब वर जाता-जाता तिने राजेशला टिफिन दिला होता. गौरीला राजेश सोबत बघुन त्याच्या ऑफीसच्या ब-याचश्या मुलींचा जळुन तिळपापड झाला होता. कारण त्याच्या ऑफीसच्या ब-याच मुलींचा तो क्रश होता. दिसायला ही चॉकलेट बॉय आणि वागणही डाऊन टु अर्थ होत. त्यामुळे अल्पावधीतच तो त्या ऑफीसमध्ये फेमस झाला होता. त्याच्यापुढे गौरी जरा गव्हाळ रंगाची होती. पण त्याला शोभेल अशी होती. गौरी तिथुन निघणार तेवढ्यात तिला आवाज आला.

“अय दिलचोर, फक्त त्यालाच भेटायचे असा काही नियम आहे का??”..

गौरी मागे न बघताच बोलली, “कार्ते सुधर न जरा.”

तर ही आहे कार्तिकी, राजेशची ऑफिसची कलीग. हिच्या व्यतिरिक्त राजेश इतर कोणत्याही मुलीला भाव देत नव्हता. कारण कार्तिकीची मैत्री निखळ होती. बाकी तर फक्त पैसा आणि रुप बघणा-या होत्या.

“अजीबात नाही, तु माझ्या क्रशचचं दिल चोरल आहे. म्हणून तु दिलचोरच.” कार्तिकी हसत गौरीच्या मिठीत शिरली.

“घालवा, माझी असेल-नसेल ती सगळी इज्जत घालवा.” राजेश दोघींच वागण बघुन बोलला. तशा दोघी हसल्या.

“अगं टिफीन द्यायला आली होती. तुला पाहील होत, पण तु धावपळीत दिसलीस. म्हणून तुला डिस्टर्ब नाही केल.” गौरी

“हो गं, आमच्या हेडला काही काम नाहीत न. स्वतः मस्त फिरतो आणि आम्हांला कामाला लावतो.” कार्तिकी राजेश कडे बघुन वाकड तोंड करत बोलली. राजेश फक्त हसला.

“बरं, ऐक न. ह्यावेळेस मी माझ्या सासरी जाणार आहे. तु पण चल न.” गौरी कार्तिकी कडे बघत बोलली.

“हे कधी ठरलं??” राजेश चमकून बोलला.