Login

संसारातले राजा राणी भाग ३

कार्तिकी ने तिची गाडी घेतल्यामुळे दामिनीने सुटकेचा श्वास सोडला होता. गावच्या घरातल वातावरण पाहुन कार्तिकी तर खुश झाली होती. पण हेमंत च्या लग्नाविषयी बोलण्यासाठी गौरीने विचारल्यावर तिला आजोबांनी गप्प रहा याला सांगीतल होत.
मागील भागात.

“अय दिलचोर, फक्त त्यालाच भेटायचे असा काही नियम आहे का??”..

गौरी मागे न बघताच बोलली, “कार्ते सुधर न जरा.”

तर ही आहे कार्तिकी, राजेशची ऑफिसची कलीग. हिच्या व्यतिरिक्त राजेश इतर कोणत्याही मुलीला भाव देत नव्हता. कारण कार्तिकीची मैत्री निखळ होती. बाकी तर फक्त पैसा आणि रुप बघणा-या होत्या.

“अजीबात नाही, तु माझ्या क्रशचचं दिल चोरल आहे. म्हणून तु दिलचोरच.” कार्तिकी हसत गौरीच्या मिठीत शिरली.

“घालवा, माझी असेल-नसेल ती सगळी इज्जत घालवा.” राजेश दोघींच वागण बघुन बोलला. तशा दोघी हसल्या.

“अगं टिफीन द्यायला आली होती. तुला पाहील होत, पण तु धावपळीत दिसलीस. म्हणून तुला डिस्टर्ब नाही केल.” गौरी

“हो गं, आमच्या हेडला काही काम नाहीत न. स्वतः मस्त फिरतो आणि आम्हांला कामाला लावतो.” कार्तिकी राजेश कडे बघुन वाकड तोंड करत बोलली. राजेश फक्त हसला.

“बरं, ऐक न. ह्यावेळेस मी माझ्या सासरी जाणार आहे. तु पण चल न.” गौरी कार्तिकी कडे बघत बोलली.

“हे कधी ठरलं??” राजेश चमकून बोलला.

आता पुढे.

“तुम्ही गेल्यानंतर.” गौरी.

“नो वे. आई-बाबांसोबत ओळख करुन दिली म्हणून मी पस्तावलोय. आता डायरेक्ट गावी?? आज्जीबात नाही.” राजेश घाबरुन बोलुन गेला होता.

“पण तुला एवढ्या लोकांमध्ये रहायला आवडत नाही न??” राजेश आता तिला लांब ठेवण्याच्या सगळ्या पॉसीबीलीटज बघत होता. त्याला इतक्यात तिची गावी ओळख करुन द्यायची नव्हती. एकदा का गावी कळलं न, की लगेच त्याचा लग्नाचा बार वाजणारच हे त्याला चांगलच ठावूक होत.

“ते मी माझ पाहुन घेईल. असही मला आईंनी बोलावलय. आता तुम्ही आडकाठी करत असाल तर डायरेक्ट बाबांना विचारते.” गौरीने राजेशला शब्दांनीच बांधुनच टाकलं.

कार्तिकी मात्र जाम हसत होती. “आत्ता तर मी येणारच. माझ ह्रदय तोडलयस तु” राजेशकडे बघुन बोलली. “याचा बदला तर मी घेणारच न.” एक विजयी हास्य कार्तिकी च्या चेह-यावर होत.

आता इथे त्याच काहीच चालणार नाही, म्हणून त्याने तिथुन काढता पाय घेतला. गौरी देखील कार्तिकी सोबत थोड्या गप्पा मारून तिच्या ऑफिसवर निघुन गेली.

तन्वी आणि प्रतिकच्या कॉलेजला मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, तस सगळेच गावला जायची तयारी करायला लागले होते. ह्यावेळेस गौरी आणि तिची मैत्रीण कार्तिकीपण होती. तन्वीची शेपुट दामिनी होतीच सोबत. एवढ्या जणांचा गोतावळा बघुन सोमनाथांनी नवीन गाडी घ्यायचा विचार करत होते. पण राजेशने त्यासाठी मनाई केलेली होती. राजेश त्याच्या आई बाबांसोबत सोमनाथच्या घरी आलेला होता.

“अरे राजु, शेवटी काहीही झाल तरी तुझी ती कंपनीची गाडी. त्याचा खर्च तु एकटाच करतोस नेहमी.” सोमनाथ नाराज होत बोलले.

“आता कमावतो कोणासाठी?? आपल्यासाठीच न. मग खर्च पण आपल्यासाठीच करणार.” राजेशची फिलॉसॉफी, ज्यावर त्यांच नेहमीच भांड्याला भांड वाजायच. “तानेच लग्न होऊ द्या ओ, मग आपण चार आणि प्रतीकची बायको आली की तुम्ही चार असे आठ जण मस्त गावाला जात जाऊ. तोपर्यंत नवीन ८ सीटर गाडी आपल्या दारात येईलच.” राजेशच बोलुन होत नाही तोवर त्याच्यावर उशीचा एक वार आलाच होता.

“लग्न होऊन जेव्हा लांब जाईल न, तेव्हा माझी किंमत कळेल तुला.” तन्वी नाराजीच नाटक करत बोलली.

“आधी जा, मग बघुया” प्रतीक मध्येच पचकला. तशी त्याच्या पाठीवर पण एक चापट पडली. सगळेच हसत होते.

“गाडीचे निम्मे पैशे घेशील तरच मी त्या गाडीत बसेल” सोमनाथांना राजेशचा स्वभाव माहीती होता. गाडी घेताना तो सांगणार पण नाही. हे चांगलच माहीती होत.

“बरं, तेव्हाच तेव्हा बघु.” राजेश

“आपली गाडी बोलला आहेस तु, त्यामुळे तु फक्त पैसे घेऊ नकोस.” अनिताने राजेशकडे रोखुन बघीतल. “मग तु आहे न तुझे तासातासाचे रिपोर्ट आहेत.” आता मात्र राजेश गांगरला होता.

“गाडी बघायला न आपण दोघेच जाऊया.” राजेश आता त्याच्या लाडक्या काकुला लाडीगोडी लावत होता. थोड्याफार गप्पा मारत जेवण करुन राजेश आणि त्याचे आई वडील त्यांच्या घरी निघुन गेले.

शेवटी गावी जायचा दिवस उजाडलाच. राजेशने आठवडाभर सुट्टी टाकली होती. कार्तिकी ने तिची कार घेतली होती. तिच्यासोबत मग गौरी, तन्वी आणि दामिनी बसले होते. दामीनीने तर मनातच सुटकेचा श्वास सोडला होता. राजेशच्या ड्राईव्हिंगचा धसकाच तिने तेवढा घेतला होता.

यावेळेस मुली सेपरेट कारने येत असल्याने राजेश त्यांच्या कारवर लक्ष ठेवतच त्याची गाडी चालवत होता. मजल-दरमजल करत सगळे गावाला पोहोचले होते. मध्ये चाहा नाश्त्यासाठी थांबल्यावर राजेशने दामिनीला चिडवायची संधी सोडलेली नव्हती. तो सारखा तिला त्याच्या गाडीत बोलवत होता आणि दामिनी तेवढीच त्याच्यापासून लांब पळत होती.

दुमजली खुप मोठा असा वाडा होता. किचन एकच होत, पण प्रत्येकाची खोली वेगळी होती. गावातल्या पाटीलचा रुबाब त्या वाड्यात दिसुन येत होता. ब-याच दिवसांनी सगळा गोतावळा त्यांच्या घरी जमला होता. गप्पांना तर खुपच उत आला होता. राजेश त्याचे दोन काका-काकु, त्यांची मुल, आजी आजोबा एवढे सगळे बघुन गौरी गांगरून गेली होती. कार्तिकीने तिचा हात पकडुन तिला आश्वस्त केल होत.

पण कार्तिकीला अस भरलेल घर पाहून खुप भारी वाटत होत. तिच्या घरी ती, तिची आई न तिचे बाबा एवढेच. त्यामुळे तिला नात्याची ओढ खुप होती.

“बरं, हिच का आपल्या राजेशची गौरी.” रमाबाईंनी गौरीला बरोबर ओळखल होत.

राजेशच्या आईने फक्त तिच्या कानावर घातल होत. वरून गौरी आणि कार्तिकी सोबतच बसलेल्या असतानाही त्यांनी ओळखले पाहून गौरी त्यांना बघतच राहीली. इकडे राजेशने त्याच्या आई बाबांकडे रोखुन बघायला सुरवात केली.

“अगं पोरी, जरा जवळ ये. निट तर पाहु दे तुला??” रमाबाई. “तुझे डोळे, कान, मेंदु तर निट आहे न??”

तिच वाक्य ऐकुन गौरीला थोड वेगळच वाटल.

“म्हणजे तु याला पसंत केले न, म्हणून म्हटल. निट पाहिले की नाही म्हणून.” रमाबाई हसायला लागल्या.

राजेशच्या रोखुन बघण्यात अजुन एका व्यक्तीचा समावेश झाला. गौरी पण हसायला लागली. थोड्यावेळाने जेवणाच्या तयारीसाठी किचनमध्ये महिलांचा गोतावळा गेला तर बाहेरच्या खोलीत पुरुषांचा राहीला होता. आज गणेश गरजेपेक्षा जास्तच किचनमध्ये जाऊन लुडबुड करत होता.

“गण्या आज तुझे किचनमध्ये जास्तच राऊंड चालु आहेत अस नाही वाटत का??” राजेश.

गणेश जरा चपापला. “माझी मर्जी, मी कुठेही जाऊ शकतो.” राजेश ला त्याचे उत्तर समाधानकारक वाटल नाही.

गौरी मात्र किचनमध्ये खेळीमेळीच वातावरण बघुन हरखून गेली होती. सगळ्याच जणी एकमेकींना मदत करत होत्या. त्यामुळे स्वयंपाक लगेच झालेला होता.

जेवताना हेमंतच्या लग्नाचा विषय निघाला होता. दूरच्या मामाच्या नात्यातली मुलगी होती. तिचा फोटो आणि माहीतीवर सगळ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. गौरी फक्त बघत बसली होती. पण हेमंत जरा शांतच बसलेला होता. ते बघुन गौरीच बोलली.

“मी बोलली तर चालेल??” गौरी.

“नाही चालणार.” आजोबा मोठ्या आवाजात बोलले. गौरी शांत बसली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all