Login

संसारातले राजा राणी भाग ४

Marathi Story Sansaratale Raja Rani
मागील भागात.

थोड्यावेळाने जेवणाच्या तयारीसाठी किचनमध्ये महिलांचा गोतावळा गेला तर बाहेरच्या खोलीत पुरुषांचा राहीला होता. आज गणेश गरजेपेक्षा जास्तच किचनमध्ये जाऊन लुडबुड करत होता.

“गण्या आज तुझे किचनमध्ये जास्तच राऊंड चालु आहेत अस नाही वाटत का??” राजेश.

गणेश जरा चपापला. “माझी मर्जी, मी कुठेही जाऊ शकतो.” राजेश ला त्याचे उत्तर समाधानकारक वाटल नाही.

गौरी मात्र किचनमध्ये खेळीमेळीच वातावरण बघुन हरखून गेली होती. सगळ्याच जणी एकमेकींना मदत करत होत्या. त्यामुळे स्वयंपाक लगेच झालेला होता.

जेवताना हेमंतच्या लग्नाचा विषय निघाला होता. दूरच्या मामाच्या नात्यातली मुलगी होती. तिचा फोटो आणि माहीतीवर सगळ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. गौरी फक्त बघत बसली होती. पण हेमंत जरा शांतच बसलेला होता. ते बघुन गौरीच बोलली.

“मी बोलली तर चालेल??” गौरी.

“नाही चालणार.” आजोबा मोठ्या आवाजात बोलले. गौरी शांत बसली.

आता पुढे.

बाकीच्यांना तर आजोबांचा मस्करीचा स्वभाव माहीती होता. मग आजोबाच पुढे बोलले, “अशी परक्या सारखी परमिशन मागणार असशील तर आजीबात नाही चालणार.”

तेव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावर हसू आल.

“अगं, तु पण आता आपल्या घराचा हिस्सा आहेस, बिनधास्त बोल.” आजी

एवढे सगळे एकत्र राहूनही प्रत्येकाच्या मताचा आदर होता. प्रत्येकाला ज्याची त्याची स्पेस तिथे मिळत होती. ते बघुन एकत्र कुटूंबाविषयीच गौरीच मत कुठेतरी बदलु पहात होता.

“ते हेमंत दादाला आवडली का विचारल नाही कोणी. तो शांतच आहे कधीचा.” गौरीने तिची शंका मांडली.

“त्याने त्याच्या पुर्ण आयुष्यात एखाद्या मुलीसोबत बोललेल सगळ्यात मोठ वाक्य कुठल माहितीये??” प्रतिकने गौरीकडे पाहील. गौरीला इंटरेस्ट आला. “कुठल??”

“तानी म्हणजे तन्वी नाही आली?” गणेश “ते पण कोणाला तर दामिनीला.

त्याव्यतिरिक्त मुलींसोबत तो बोलण म्हणजे.” गणेश आणि प्रतिकने त्यांच्या दोन्ही कानाला आळीपाळीने हात लावुन नकारार्थी मान हलवत होते. तर हेमंत खाली मान घालून जेवत होता तर बाकी सगळेच हसायला लागले होते.

“अगं, संसार त्याला करायचा आहे न मग त्याच मत विचारल्याशिवाय, त्याने हो म्हटल्या याशिवाय थोडीच आम्ही पुढे जाणार” आजोबा हसत बोलले.

“पण मुळात मला लग्नच करायचं नाहीये.” हेमंत बोललाच. “आपण एवढे सगळे आनंदात एकत्र रहातो, भांडतो. पण एकत्र पण लगेच येतो. आणि एक चुकीची मुलगी येईल आणि हे सगळ बिघडवून टाकेल. मला तुमच्या पासुन दुर नाही जायच.” हेमंतचे डोळे पाणावले.

“तुला काय वाटत, आम्ही काय तुझ्यासाठी अशीतशी मुलगी बघु का??” आजोबा.

“पण आजोबा” हेमंत

“दादा” कार्तिकी पण बोलली आता. “तुझा आजोबांवर विश्वास नाही का?? मी पण पहिल्यांदाच अशी फॅमिलीत आलीये. पण मला तर खुप आवडली. कोणालाही आवडेल अशीच फॅमिली आहे ही. मला तर आता गौरीचा खुप हेवा वाटतोय.”

सगळ्यांनीच कार्तिकीच्या बोलण्याला दुजोरा दिलेला होता.

गौरीने मात्र चमकून कार्तिकी कडे पाहील होत. हेमंतला आता जरा धीर आला होता.

असच हसत खेळत जेवण झाली होती. जेवणानंतरही गप्पांना आज ब्रेक नव्हता. कार्तिकी तर रमून गेली होती त्या गोतावळ्यात. ती तर तिच्या घरीच असल्यासारखी फिरत होती. एवढ्या मोठ्या वाड्यात गौरी मात्र कार्तिकीला शोधत फिरत होती.

कार्तिकी कधी आजोबांच्या रुममध्ये तर कधी काका काकूंच्या, तर कधी टेरेसवर. तिचा तर पुर्ण वाडा फिरुन झाला होता. एकदम समरस झाली होती ती त्या कुटुंबात. गौरी मात्र अजूनही बिचकत होती.

“कार्तिकी तुला पण खुप आवड आहे वाटत मोठ्या कुटुंबाची” आजीने तिला जवळ घेतल. “तुझ्याकडे पण अस आहे का??”

“नाही न आज्जी.” कार्तिकी नाराज होत बोलली, “मी आणि ममा-डॅडा. बस तिघच. बोर होत मला.”

“मग येत जा की इकडे. तुझच घर समज.” आजी बोलली तस कार्तिकीची कळी खुली होती.

रात्री टेरेसवर सगळी मंडळी जमली होती. पिलावळ तर गौरीला आत्तापासुनच वहिनी वहिनी करत चिडवत होती. मग हेमंतला पण आयडीया आली.

“आता राजुने ठरवलच आहे तर त्याच घ्या न उरकुन.” तिथे लाजण्यामध्ये हेमंतचा हात कोणीच धरु शकत नव्हतं.

“अस कस?? सर्वात आधी घरातल्या मोठ्या मुलाच लग्न होत. मग तुझ्या आधी मी कसा नंबर लावु??” राजेश “अजुन तिच्या घरी पण विचारण बाकी आहे अजुन.”

“त्याची काळजी तु नको करुस.” आजोबा. “मग दोघांची लग्न एकाच मांडवात करुया??”

“नको न दादा.” तुकाराम आणि त्याचे दोघ भाऊ त्यांच्या वडीलांना दादा बोलायचे. “ह्या पोरांना एकमेकांच्या लग्नात नाचता नाही आल न, तर नंतर आमच्या बोकांडी बसतील ते.”

“अप्पा तुम्हालाच आम्हा मुलांची काळजी.” राजेशने तुकारामांना मिठी मारली होती.

तशी सगळीच पिलावळ हसायला लागली. कारण तुकारामांनी त्यांच्या मनातल सांगीतल होत

“पहीले गौरीच्या घरी पण बोलाव लागेल न??” ज्ञानदेव.

राजेशवर सरकलेली गाडी बघुन राजेशच बोलला. “अरे आपण हेमंत दादाच ठरवत आहोत न, मग माझ्यावर कुठे घसरत आहात??”

तेव्हा कुठे हेमंतच्या लग्नाच्या विषयाला सुरवात झाली होती. दोन दिवसांनी ते सगळेच मुलीच्या घरी जाऊन आले होते. मुलगी पसंत पडली होती.

आठवडाभराच्या आतच साखरपुडा उरकुन घेतला गेला होता. गौरीला त्यांच्याकडचे होणारे कार्यक्रम आठवले तिथे फक्त ज्यांच्या कार्यक्रम आहे त्यांचीच धावपळ व्हायची, नातेवाईक तर फक्त नावालाच रहायचे. पण इथे मात्र सगळे नातेवाईक मिळुन त्यांच्या घरची कार्य असल्यासारखे करत होते. कार्तिकी तर सगळ्यांचा मेकअप करत बसली होती. जो सगळ्यांनाच आवडला होता. तिनेही भरपुर मदत केलेली होती.

सुट्टी संपवून सगळे परतीच्या मार्गावर लागणार होते. कार्तिकीला तर खुप जड जात होत. ब-याच वर्षांनतर ति इतकी नाती जगली होती.

“पाहीजे तर तुझ्यासाठी पण अशीच फॅमिली शोधु.” राजेश गणेशकडे बघत जाणीवपुर्वक बोलला. त्याने लगेच नजर चोरली होती.

“मला आवडेल अशा या फॅमिलीत यायला.” कार्तिकी हसुन बोलली.

“हे बघ वहीनी, आता सोडतो. पण पुढच्या वेळेस किमान साखरपुडा झाल्याशिवाय तुला सोडणार नाही.” तन्वी गौरीकडे बघत बोलली. त्यावर गौरीने फक्त हसुन रिप्लाय दिला.

मग ति पण बाकी वरिष्ठ मंडळीच्या पाया पडली होती. सगळे परत आपआपल्या घरी आले होते.

“मग नाही आवडला न, मोठ्ठ कुटुंब??” गौरीची आई

“इतक पण वाईट नव्हतं ग” गौरीने तिथे झालेल सगळ सांगुन दाखवल होत.

“आता पाहुणे म्हणून सगळेच निट वागवतात, जरा जास्त दिवस झाले कि खरें रंग दाखवायला लागतात.” गौरीची आई.

“तुला राजेश वर अजुनही शंका आहे का??” गौरीची आवाज किंचीत जड झाला.

“नाही गं, कॉलेज पासुन बघतेय त्याला, मला तर प्रश्न पडतोय, त्याने तुला कस काय होकार दिला.” गौरीच्या आईने तिची मस्करी केली होती.

“जा बाबा,” गौरी वैतागून तिच्या रुममध्ये निघुन गेली.

असेच दिवस चालु होते. गौरीचे राजेशच्या गावी अजुन दोन तीन चक्कर झाल्या होत्या. तिच्या मनात खुप द्वंद्व झाल होत. कारण तिने पाहीलेले एकत्र कुटुंब एकदम वेगळ होत, जिथे फक्त हेवेदावे, रुसवे फुगवे. एकमेकांना पाण्यात बघणे एवढच तिला माहीती होत. पण राजेशची फॅमिली बघुन तिच मत बदलायला बघत होत. पण बुद्धी त्यासाठी तयार होत नव्हती. तिला नवरा बायकोचाच राजा राणीचा संसार अस मनात ठरवुन झालेल होत.

हेमंतच लग्न झाल्यावर राजेश आणि गौरीचा साखरपुडा करण्याच ठरवल होत. ते सगळ ठरविण्यासाठी राजेशच्या घरचे गौरीच्या घरी जाणार होते. मग राजेश त्यांना घ्यायला गावी गेलेला होता.

त्याच रात्री गौरीच्या वडीलांच्या छातीत दुखायला लागल होत. घरात ती न तिची आई दोघीच होत्या. दोघीही खुप घाबरुन गेलेल्या होत्या. गौरीने अॅब्युलन्सला फोन केलेला होता. त्यांनी आजुबाजुला मदत मागुन पाहीली, पण फक्त सल्ल्याच्या मदतीशिवाय दुसरी कुठलीच मदत त्यांना भेटत नव्हती. मग दोघींनीच अॅब्युलन्समधल्या माणसाच्या मदतीने गौरीच्या वडीलांना अॅब्युलन्समधे चढवले होते.

त्यांना जबरदस्त हर्ट अॅटेक आला होता. रक्तवाहीन्या काही ठिकाणी ब्लॉक झालेल्या होत्या. इमरजन्सी ऑपरेशन कराव लागणार होत.

“मग वाट कसली बघताय, घ्या करायला” गौरीच्या आईने तिथल्या डॉक्टरला सुनावले होते.

“तेवढे अडव्हान्स तुम्हाला भरावे लागतील.” डॉक्टर

“आत्ता घरात नाहीयेत, सकाळी बॅंक उघडली की सगळेच भरतो न.” गौरीची आई

“सॉरी, पण थोडे अडव्हान्स भरायला लागतील. पाहीजे तर कोणी नातेवाईकांना फोन करुन अरेंज करा.” डॉक्टर निर्विकारपणे बोलुन निघुन गेला.

आता तिथे त्यांचे कोणीच नातेवाईक नव्हते. दोघीही प्रचंड घाबरलेल्या होत्या. काय कराव सुचत नव्हत. छोटी रक्कम असती तर एटीएम मधुन काढुन दिली असती पण किमान ७० ते ८० हजार भरायला सांगत होते.