मागील भागात.
हेमंतच लग्न झाल्यावर राजेश आणि गौरीचा साखरपुडा करण्याच ठरवल होत. ते सगळ ठरविण्यासाठी राजेशच्या घरचे गौरीच्या घरी जाणार होते. मग राजेश त्यांना घ्यायला गावी गेलेला होता.
त्याच रात्री गौरीच्या वडीलांच्या छातीत दुखायला लागल होत. घरात ती न तिची आई दोघीच होत्या. दोघीही खुप घाबरुन गेलेल्या होत्या. गौरीने अॅब्युलन्सला फोन केलेला होता. त्यांनी आजुबाजुला मदत मागुन पाहीली, पण फक्त सल्ल्याच्या मदतीशिवाय दुसरी कुठलीच मदत त्यांना भेटत नव्हती. मग दोघींनीच अॅब्युलन्समधल्या माणसाच्या मदतीने गौरीच्या वडीलांना अॅब्युलन्समधे चढवले होते.
त्यांना जबरदस्त हर्ट अॅटेक आला होता. रक्तवाहीन्या काही ठिकाणी ब्लॉक झालेल्या होत्या. इमरजन्सी ऑपरेशन कराव लागणार होत.
“मग वाट कसली बघताय, घ्या करायला” गौरीच्या आईने तिथल्या डॉक्टरला सुनावले होते.
“तेवढे अडव्हान्स तुम्हाला भरावे लागतील.” डॉक्टर
“आत्ता घरात नाहीयेत, सकाळी बॅंक उघडली की सगळेच भरतो न.” गौरीची आई
“सॉरी, पण थोडे अडव्हान्स भरायला लागतील. पाहीजे तर कोणी नातेवाईकांना फोन करुन अरेंज करा.” डॉक्टर निर्विकारपणे बोलुन निघुन गेला होता.
“सॉरी, पण थोडे अडव्हान्स भरायला लागतील. पाहीजे तर कोणी नातेवाईकांना फोन करुन अरेंज करा.” डॉक्टर निर्विकारपणे बोलुन निघुन गेला होता.
आता पुढे.
आता तिथे त्यांचे कोणीच नातेवाईक नव्हते. दोघीही प्रचंड घाबरलेल्या होत्या. काय कराव सुचत नव्हत. छोटी रक्कम असती तर एटीएम मधुन काढुन दिली असती पण किमान ७० ते ८० हजार भरायला सांगत होते.
गौरीला राजेशचा फोन आला होता. तिचा फक्त हुंदका ऐकूनच राजेशला काहीतरी गंभीर झाल्याची जाणीव झाली होती. गौरीच बोलण ऐकुन त्यालाही खुप टेन्शन आल होत.
“कोणत्या हॉस्पीटलमध्ये आहेत ते??”.आजोबा
“*****प्रायव्हेट हॉस्पिटल आहे.” राजेश
मग आजोबांनी त्यांचा मोबाईल काढला आणि एक फोन लावला.
“काय रे ए दोडक्या.” आजोबा
“किती वर्षांनी हा शब्द ऐकतोय मी, बोला न परत गुरूजी” जयेशचे डोळे पाणावले.
“तुझ मन भरायला मी काही करमणुक करत नाहीये.” आजोबा कडक आवाजात बोलले.
“अजुन पण बदलले नाहीयेत तुम्ही गुरूजी, आज्ञा करावी.” जयेश हसत बोलला.
“तु म्हणाला होतास न, तु पैशांसाठी कोणालाही अडवणार नाहीस??” आजोबा.
“हो गुरूजी, मी तसाच वागतोय. शब्द मोडला नाहीये मी” जयेश आता जरा सिरियस झाला.
“तु म्हणाला होतास न, तु पैशांसाठी कोणालाही अडवणार नाहीस??” आजोबा.
“हो गुरूजी, मी तसाच वागतोय. शब्द मोडला नाहीये मी” जयेश आता जरा सिरियस झाला.
“मग तुझ्या हॉस्पीटलमध्ये माझ्या सुनबाईच्या वडीलांना का अडवुन ठेवल आहेस??” आजोबा.
जयेश ने त्याच्या हॉस्पीटलमध्ये फोन केला. तशी हॉस्पीटलमध्ये धावपळ सुरू झाली. गौरी न तिची आई बघतच बसल्या होत्या. गौरीच्या वडीलांना ताबडतोब ऑपरेशनसाठी घेऊन गेले होते. गौरीने एका नर्सला विचारल पण कि नक्की काय झाल म्हणून.
“तुम्ही आधीच सांगायच न की आमच्या सरांच्या फॅमिली मधल्या आहात म्हणून. सरांनी सगळ्यांनाच झापलय.” नर्स वैतागून निघुन गेली.
दोघी मायलेकी गोंधळल्या. कोणत्या सरांच्या फॅमिली मधल्या म्हणून. परत गौरीचा फोन वाजला.
“बाबांच ऑपरेशन सुरू झाल न???”.राजेश
गौरी परत गोंधळली. “हो तुम्हाला कस कळल??”
“अगं, आजोबांच्या विद्यार्थ्यांच हॉस्पीटल आहे ते. मग त्यांनी त्यांचा विद्यार्थ्यांला झापल की, माझ्या सुनबाईला का अडवल आहे म्हणून. मग काय झाल की सगळ निट.” राजेश
लग्न ठरल पण नव्हत अजुन, तरी आजोबांनी हक्काने सांगितलेल्या सुनबाई वरुन गौरीच्या आईला अजुनच भरुन आल होत.
“उद्या आम्ही येतोय. तोवर बाबा पण पोहोचतील तिथे.” राजेश दोघींना आधार देत होता.
त्याने सांगितल्या प्रमाणे राजेशचे वडील तिथे आलेले होते. प्रतिक पण सोबत होता. मग दोघांनी मिळून बाकी सगळीच धावपळ केली होती. गौरी आणि तिच्या आईला खुप आधार भेटला होता. दुसऱ्या दिवशी सोमनाथ पण अनिता आणि शांतीसोबत तिथे येऊन लागले होते. कार्तिकी पण पोहोचली होती. राजेश त्याच्या आजोबांना सोबत घेऊन आला होता. सोबतीला गणेश पण आलेला होता. कार्तिकीला पाहुन गणेशचा चेहरा उजळला होता.
“भान ठेव, आपण हॉस्पीटलमध्ये आहोत.” राजेशने गणेशचा हात दाबला.
जयेश नुकताच ऑपरेशन थिएटरमधुन त्याच्या केबिनमध्ये गेला होता. त्याच लक्ष सीसीटीव्हीच्या डिसप्ले वर गेल. तो तसाच धावत सुटला होता. का नाही धावणार? त्याचे आदर्श शिक्षक जे आले होते पहिल्यांदा त्याच्या हॉस्पीटलमध्ये.
रिसेप्शन वर पोहोचताच जयेश ने आजोबांना साष्टांग दंडवत घातला होता. एवढा मोठा पंचक्रोशीतील प्रसिद्ध डॉक्टर एका साध्या माणसाच्या पाया पडतोय बघुन तिथल्या स्टाफला आश्चर्य वाटल होत.
“किती उशीर केलात गुरूजी, या गरीबांच्या दाराला पाय लावण्यासाठी.” जयेश
आजोबांनी जयेशला उठवल, “डॉक्टर साहेब, अस वागण शोभत का??” जयेशला त्यांनी मिठीत घेतल.
जयेश त्यांना त्याच्या कॅबीनमध्ये घेऊन गेला. जयेश ने आजोबांना त्याच्या खुर्चीवर बसायला सांगितले. आजोबांनी त्यासाठी नकार दिला.
“अरे तु तुझ्या मेहनतीने ते कमवल आहेस, मी कस काय बसु??” आजोबांनी जयेशच्या खांद्याला पकडुन त्यालाच त्याच्या खुर्चीवर बसवल.
“पण त्या लायक तर तुम्हीच बनवले न.” जयेशच्या चेह-यावर आज आनंद ओसंडून वहात होता. “तुम्ही आणि तुमच्या शिक्षा नसत्या न, तर आजही मी कुठल्यातरी चौकात हमालीच करत असतो.”
आजोबांनी प्रेमाने जयेश च्या डोक्यावरून हात फिरवला. नंतर खुप सा-या जुन्या आठवणींना उजाळा भेटला होता.
नंतर ते सगळे गौरीच्या बाबांना बघायला आले, त्यांना नुकतच दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केले होते. त्यांना आता चांगलीच शुध्द आली होती.
“मुलीच्या लग्नाच्या बोलणीचच इतक टेन्शन घेतल का काय??” आजोबा गौरीच्या बाबांना बोलत होते.
“मुलीच नाही ओ, आमची कटकट आता तुमच्या डोक्यावर जाणार आहे न. म्हणून मला तुमच टेन्शन आल होत.” गौरीचे बाबा. अशा परिस्थितीतही त्यांना मस्करी सुचत होती. सगळेच टेन्शन मध्ये होते. त्यामुळे वातावरण जरा हलक करण्यासाठी ते बोलले होते. सगळेच हसायला लागले होते.
“मी काय कटकट आहे का??” गौरीने नाक फुगवल.
“अस का बोलता ओ, खुप गोड मुलगी आहे.” शांती ने तिला मिठीत घेतल.
“तुम्हालाच माझी काय ती काळजी.” गौरी फुल नौटंकी करत बोलली.
“राजा राणीचा संसार म्हणून आम्ही आता एकटेच पडलो होतो. पण तुम्हाला बघुन वाटतय. प्रजाच नाही तर राजा राणीला तरी काय अर्थ आहे.” गौरीच्या आईचा बांध सुटला होता.
“अस का बोलता ओ, खुप गोड मुलगी आहे.” शांती ने तिला मिठीत घेतल.
“तुम्हालाच माझी काय ती काळजी.” गौरी फुल नौटंकी करत बोलली.
“राजा राणीचा संसार म्हणून आम्ही आता एकटेच पडलो होतो. पण तुम्हाला बघुन वाटतय. प्रजाच नाही तर राजा राणीला तरी काय अर्थ आहे.” गौरीच्या आईचा बांध सुटला होता.
“प्रजेशिवाय राजा आणि राजा शिवाय प्रजा ही अपुर्णच असते.” आजोबा.
“अरे वा, खुप फास्ट रिकव्हर झाला पेशन्ट” जयेश गौरीच्या बाबांना बघायला आलेला होता. “आपल्या माणसांचा गोतावळा हा सगळ्यात मोठे औषध असते. उद्या घरीच घेऊन जा यांना.”
“अरे वा, खुप फास्ट रिकव्हर झाला पेशन्ट” जयेश गौरीच्या बाबांना बघायला आलेला होता. “आपल्या माणसांचा गोतावळा हा सगळ्यात मोठे औषध असते. उद्या घरीच घेऊन जा यांना.”
दोन दिवसांनी गौरीच्या वडीलांना घरी घेऊन आले होते. तोवर त्यांच्या गावाकडचेही येऊन पोहोचले होते. त्यांनीही काळजीने विचारपुस केलेली होती. लवकर का सांगीतल नाही म्हणून त्यांना झापल पण होत. मग राजेश आणि गौरीचा साखरपुडा ठरवायला सगळेच जमले होते.
दोघांना समोर बसवल होत आणि बाकी त्यांच्या अवती भोवती. त्यांना त्यांची मर्जी विचारत सगळ काही ठरवत होते.
“आली का फिलिंग राजा राणीची??” राजेशने गौरीचा हात हळुच पकडत विचारल.
त्यावर गौरीने लाजून होकारार्थी मान हलवली होती.
गणेशनेही कार्तिकीला एका साईडला नेऊन त्याच मन मोकळे केलेल होत. ति गणेशकडे बघतच राहीली होती. तोवर राजेश आणि तन्वी दोघांपर्यंत येऊन पोहोचले होते. सगळ काही ठरवुन आता ते सगळे घरी जायच्या तयारीत होते. त्यामुळे राजेशने त्याला सोबत यायला सांगितले होते. गणेश जरा चपापला होता. पण नंतर धीर धरून बोलला.
“अरे पण तिच उत्तर नाही आल अजुन.” गणेश नाराज झाला होता.
“तिने तिच उत्तर त्याच दिवशी दिल होत.” तन्वी हसली “चल आता.”
गणेश गोंधळला.
गणेश गोंधळला.
“अरे मंद.” आजोबांनी येऊन त्याच्या टपलीत मारली. “गावावरुन निघतानाच ति बोलली होती न, तिला या फॅमिलीत यायला आवडेल म्हणून.”
गणेशला झटकाच बसला आजोबांना बघुन. त्याची हालत बघुन सगळेच त्याला हसायला लागले होते.
कार्तिकी गणेशकडे बघत गालातच हसत आतल्या रुममध्ये निघुन गेली. गणेशला त्याच उत्तर भेटल होत. तो पण आता खुश झाला होता.
“चला तिसऱी पण राजा राणीची जोडी तयार झाली.” राजेशने गणेशच्या खांद्यावर हात ठेवला, तसा गणेश लाजला होता.
“चला पोरांनो लागा तयारीला पटपट.” आजोबांनी सगळ्यांनाच ऑर्डर सोडली. तसे सगळेच घरी निघाले होते. तिन्ही राजा राणीच्या संसाराच्या तयारीसाठी.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा