मराठीतील नवीन सुविचार : ५० सुविचार

दिवसाची नवी सुरुवात नव्या विचाराने.. सुविचाराने
सदर लेखामध्ये तुम्ही वाचू शकता,
suvichar marathi
marathi suvichar
success marathi suvichar
suvichar in marathi
inspirational marathi suvichar
good morning marathi suvichar
marathi suvichar good morning
marathi suvichar on life
50 suvichar in marathi
shubh sakal suvichar marathi
##################################
१) श्रीमंती विचारांची असायला हवी, पैसा काय भिकारीही कमावतो.

२) मौन हा मनाचा व्यायाम आहे.

३) सुखाच्या पाकळ्या ओंजळीत भरताना काटा आपोआप येतो आणि आनंदाच्या क्षणी तोच काटा रुतून सुखाची ओंजळ रीती करतो.

४) सुखात दुःख देणारी खूप आहेत पण दुःखात सुख आपणच शोधाल पाहिजे.

५) जर तुम्ही तुमचे अपयश साजरे करायला सुरुवात केली तर तुम्ही या ग्रहावरील सर्वात आनंदी व्यक्ती व्हाल.

६) परिस्थिती माणसाला हतबल बनवते हे खोटं आहे, आपणच त्या परिस्थितीत स्वतःला कमजोर समजतो आणि तिच्या स्वाधीन होतो.

७) उपवास असताना देखील प्रसादाचा शिरा चालतो, पण मासिकपाळीत पेढा ही वर्ज्य असतो..

८) मन तस सगळ्यांचं हळवंच असतं, फक्त परिस्थिती कठोर राहायला शिकवत.

९) जगमगत्या प्रकाशच्या सवयीमुळे हल्ली चंद्र चांदण्याकडे पाहतच नाही,मोबाईलच्या स्क्रिन मुळे हल्ली काळरात्र समजतच नाही

१०) पानगळ पानांची ऋतुबदलांमुळे होते, तरीही झाडे बहारण्याची कला काही सोडत नाही..आयुष्य ही असचं! नाही का?

११) माणूस हा एक विचारशील प्राणी आहे पण, तो ही एक प्राणी आहे हा विचारच करत नाही..

१२) सुकलेल्या मोगऱ्याला काही महत्व राहत नाही पण त्या तुटलेल्या दोऱ्यात त्याचा सुगंध नेहमी दरवळत राहतो.

१३) परमेश्वराला जाणून घ्यायचे असेल तर, त्यासाठी भक्तीचे, नम्रतेचे, वैराग्याचे, प्रेमळपणाचे अंजन डोळ्यात घालावे लागते.

१४) कोणत्याही कलेविना असणारा मानवी समाज म्हणजे पशूंचा कळप होय.

१५)ध्येयाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे अविरत प्रयत्न करणे हाच असतो.

१६) भविष्य त्यांच्या मालकीचे आहे जे त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवतात.

१७)दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस नेहमीच होतो
म्हणून नव्या दिवसाची नवी सुरुवात नव्या स्वप्नांनी करावी.

१८) तुम्ही तुमच्या विश्वासापेक्षा शूर आहात, तुम्ही दिसता त्यापेक्षा बलवान आणि तुम्ही विचार करता त्यापेक्षा हुशार आहात.

१९) व्यक्ती जितकी हसते तितकी जास्त दुखी असते
त्यामुळे कमी हसावं पण आयुष्य आनंदाने जगावं.

२०) दुसऱ्यांना नाव ठेवताना आपल्या हे लक्षातच येत नाही की, आपण आपल्यातलीच कमतरता इतरांजवळ बोलून दाखवतोय. !!

२१) सकाळी फक्त एक छोटासा सकारात्मक विचार तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो

२२) सुरुवात करण्यासाठी तुम्ही उत्तम असण्याची गरज नाही, पण तुम्हाला उत्तम व्हायला सुरुवात करावी लागेल

२३) आयुष्याचे गाणे सुरेल व्हायचे असेल तर समाधानाचा रियाज करा.

२४) जी व्यक्ती रखरखत्या उन्हात भाजून निघते तीच खर आयुष्य जगायला शिकते.

२५) वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे लोक आपली सारासार बुद्धी, तारतम्य ज्ञान, व सामान्य ज्ञान वापरून आपली वैज्ञानिक वृत्ती वाढीस लावतात. असे वैज्ञानिक वृत्ती चे लोक समाजात जास्त असतील तर तो समाज 'प्रगल्भ' होतो.

२६) मातीमध्ये मायेचा, पाण्यामध्ये औदार्याचा, व बर्फात शीतलतेचा गुण असतो.

२७) संयमाचा क्षण ओळखता आला की अनेक अनर्थ टाळता येतात.

२८) मनावर तवंग नकोत, तरंग हवेत..स्थिती नको, गती हवी..
नैराश्य नको, आशावादी दृष्टिकोन हवा..नकार घंटा नको, ठोस प्रयत्न हवेत..

२९) रंग तर सरडा बदलतो पण सगळ्यात जास्त रंग बदलणारा प्राणी माणूस असतो. जो त्याचे रंग वेळ आल्यावर दाखवतो. कधी स्वतःला वाचवायला तर कधी दुसऱ्यावर आरोप लावायला.

३०) दारूची नशा तर सगळेच करतात पण खरी नशा तर हातात कवडी नसताना ती कमावण्याची धडपड आणि रचलेला इतिहास असतो.

३१) सोनं तापवून त्यावर घाव घातला की ते आकार घेत.. तसच आयुष्यात कठीण परिस्थितीवर मात करायला शिकल की विजयी होता येत.

३२) शब्दाची मर्यादा नात्यात ओलांडता..हृद्यातला आपलेपणा नकळत नाहीसा व्हायला लागतो.. म्हणून नात्यात शब्द वापरताना विचार करून वापरावे..

३३)खरी हिम्मत तर एकट उभ राहायला लागते.. गर्दीसोबत काय कुणीही उभे राहील..

३४) नाती जपावी फूलांसारखी, पाहता क्षणी चेहऱ्यावर हसू आणणारी!

३५) अक्षरांच्या ओळीसारखी माणसांची नाती असतात. गिरविली तर अधिक लक्षात राहतात, वाचली तर अधिक समजतात.

३६) मित्र परिसासारखे असावेत, म्हणजे आयुष्याचा सोनं होतं.

३७) डोंगर दर्यावरून वाहणारी पाण्याची एक छोटीशी धार, पुढे झरा बनते, थोडी मोठी होऊन नदी बनते. त्याचप्रमाणे व्यक्तीने स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः कर्तुत्वाने घडवावे, संपत्तीने नव्हे.

३८) सायकलवरून रॉकेट उडवणारी आज चंद्रावर पोहोचली..आपण सुद्धा इच्छा शक्तीच्या जोरावर आपली ध्येय पूर्ण करू शकतो.

३९) प्रत्येक क्षणाचे सोने करणारा कधीच जगण्या मरणाची चिंता अन् खंत करत नाही.

४०) बालपण कसं जगावं, हे माणसाला तरुणपणी
कळतं. तरुणपण कसं जगावं, हे मध्यमवयिन झाल्यावर कळतं. संपूर्ण जीवन कसं जगावं, हे समजेपर्यंत जगायला काही उरलेलं नसतं.

४१) हिरा आणि कोळसा या दोघांमध्येही एकच कार्बन तत्त्व असतं. फक्त आपण कुणाकडून कार्बन तत्व घ्यावं, हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.


४२) माणसाने निसर्गाप्रमाणे असायला हवं, कोणत्याही अपेक्षेशिवाय फक्त देत राहावं.. शेवटपर्यंत फक्त देत राहावं

४३) "शब्दांचे एक सामर्थ्य आहे, ते वारंवार ऐकल्याने किंवा उच्चारल्यामुळे आपल्या मनात विश्वास निर्माण करतात."


४४) स्वतःच कौतुक करायला पण " पण " असावा लागतो, इतकं सोप्प नाहीये ते..

४५) "टपोऱ्या मोत्यांच्या माळेतल्या मोत्यांना.. एका सूत्रात धरून ठेवणारा धागा तितकाच बळकट असावा लागतो"


४६) सगळ्यात जास्त धारदार हत्यार कूठल असेल तर ते म्हणजे जीभ आणि शब्द.. समोरचा फक्त जखमीच नाही होत तर जिवानिशी जाऊ शकतो.

४७) संघर्षाची झळ जितकी तीव्र असते, यशाची अनुभूती ही तितकीच सुगंधी असते.

४८) ज्या व्यक्तीने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन प्रयत्न केला नाही.

४९) ह्या जगात सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होत नाहीत
काहींच्या बाबतीत स्वप्न अपूर्ण राहण्यासाठी जबाबदारी जबादार ठरते.

५०) स्वतः साठी आनंदाचे क्षण निर्माण करणारा समाधानी आयुष्य जगतो