अरे यार लतिका, मी सगळीकडे तुला शोधत होतो आणि तू इकडे येऊन का बसली आहेस ? " निरव धावतच तिच्या जवळ येऊन तिला विचारू लागतो....... लतिका मात्र उदास चेहरा घेऊन कुठल्यातरी दीर्घ विचारात हरवलेली असते......
" काय झालं, तू एवढी नाराज का आहे ? काही प्रॉब्लेम झाला आहे का ? " निरव तिचा चेहरा आणि हळद तिला विचारतो....
" हो निरव प्रॉब्लेम तर झाला आहे....... आपले शिक्षण पूर्ण झाले आहे त्यामुळे उद्या मला परत भारतात माझ्या घरी जावे लागणार आहे........ " लतिका नाराजीच्या स्वरात बोलते.....
" मग त्यात एवढं दुःखी होण्यासारखे काय आहे ? " निरव न समजून विचारतो........
" निरव गेल्या तीन वर्षापासून आपण एकत्र आहोत........ कॉलेजच्या पहिल्या वर्षीच आपली मैत्री झाली आणि ही मैत्री कधी प्रेमात बदलली आपल्याला समजले नाही....... आता मात्र तुला सोडून जायला मन मानत नाही आहे....... " लतिका तिच्या मनातली भावना सांगण्याचा प्रयत्न करते ......
" मग घरच्यांना सांग की , मी अजून थोडे दिवस इकडे राहणार आहे ...... " निरोप सहजपणे बोलून मोकळा होतो.......
" निरव मी काही दिवस अजून मागू शकते, पण कायमची तर इकडे राहू शकत नाही ना...... " लतिका रागानेच त्याच्याकडे बघून बोलते.........
" जर घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाहीस , तर असा चेहरा करून काहीही फायदा नाही...... त्यापेक्षा गप्प बॅग पॅक कर आणि भारतात स्वतःच्या घरी निघून जा...... " निरव बोलून तिचे काहीही न ऐकून घेतात तिकडून निघून जातो....... त्याचं बोलणं ऐकून लतिका च्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागतात....... ती तशीच रागाने तिकडून उठून घरी जाऊन आपले बॅग पॅक करते........ दुसऱ्या दिवशी एअरपोर्टवर बराच वेळ ती निरवची वाट पाहत असते...... त्याला फोनही करत असते परंतु तो नाही तिचा फोन उचलतो, नाही तिला भेटायला येतो..... शेवटी लतिका च्या फ्लॅटचे अनाउन्समेंट होते आणि ती फ्लाईट मध्ये बसून भारतात निघून येते..........
लतिकाला आता भारतात येऊन बरेच दिवस झालेले असतात........ ती आपल्या सगळ्या घरच्यांना भेटून त्यांच्यासोबत आनंदाने राहा तर असते , पण एकांतात मात्र निरवच्या आठवणीने झुरत असते...... लतिका एक दिवस अशीच आपल्या कझन सोबत बाहेर फिरायला गेल्यावर तीला अचानक एका अनोळखी नंबर वरून मेसेज येतो...... ती तो मेसेज वाचून इकडे तिकडे पाहू लागते आणि अचानक तिच्या डोळ्याला एक ओळखीची व्यक्ती दिसते, त्या व्यक्तीला आपल्यासमोर पाहून ती इतकी खुश होते की, आजूबाजूचे सगळं विसरून पळतच त्या व्यक्तीच्या दिशेने निघून जाते........
" निरव तू इकडे कधी आलास आणि मला सांगितले का नाही...... " लतिका आनंदाच्या भरात त्याला एकावर एक प्रश्न विचारू लागते........
" माझं प्रेम जेव्हा मला सोडून इकडे येत होते तेव्हा मी एकटा तिकडे कसे काय राहू शकतो, फक्त तेव्हा सांगितले नाही कारण तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद मला पाहायला भेटला नसताना....... " निरव तिला आपल्या जवळ घेऊन बोलू लागतो....... ते दोघे स्वतःच्याच विश्वात अडकलेले असतात....... तेवढ्यात लतिकाची कझण तिकडे येऊन त्या दोघांना पाहू लागते......... लतिका त्या दोघांची ओळख करून देते....... काही वेळ एकत्र घालवल्यानंतर ते दोघे आपापल्या घरी निघून जातात..........
आता परत एकदा लतिका आनंदाने राहत असते..... अधून मधून ते दोघे एकमेकांना भेटत असतात , फिरायला जात असतात, त्यांचे असेच दिवस चालू असतात........ एक दिवस लतिकाच्या घरी तिच्या लग्नाची चर्चा होऊ लागते , तेव्हा लतिका आपल्या मनातली गोष्ट घरच्यांना सांगून देते...... मुलाबद्दल सांगितल्यावर तिच्या घरचेही तयार होतात आणि मुलाच्या घरी जाण्याचा विचार करतात........ लतिकाला अचानक घरी जाऊन निरवला सरप्राईज द्यायचे असते म्हणून ती गोष्ट ती त्याच्या कानावर घालत नाही.........
लतिका चे आई-वडील निरवच्या आई-वडिलांना भेटतात...... त्या दोघांबद्दल बोलणे होते........ दोघांच्या घरचेही लग्नासाठी तयार होतात....... हे सगळं बोलणं निरवच्या कानावर पडते आणि तो त्याच्या रूम मधून बाहेर हॉलमध्ये सगळ्यांनच्या जवळ येऊन उभा राहतो.........
" निरो बेटा, आम्ही तुझं लग्न फिक्स केल आहे...... तुझ्या आवडीच्या मुली सोबतच तुझे लग्न होईल........ " निरव ची आई आनंदाने त्याच्याकडे बघून त्याला सांगू लागते......
" पण मला हे लग्न मान्य नाही. .... " अचानक निरव च्या तोंडातून निघालेल वाक्य ऐकून सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात........ लतिका ला तर त्याचं बोलणं ऐकून मोठा धक्का बसतो.......
" निरव तुझं माझ्यावर प्रेम आहे ना , तू माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेस ना , मग असे का बोलत आहे ? " लतिका रडक्या स्वरात नीरव कडे पाहून त्याला विचारू लागते......
" हो लतिका, माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे...... माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय दुसरी कोणीही नाही , पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासोबत लग्न करेल....... " निरव तिच्याकडे बघून शांत स्वरात बोलतो.......
" पण का ? " लतिका पण गंभीरपणे विचारते.......
" लतिका लग्न करून मला आपल्यातले प्रेम कमी करायचे नाही....... नवरा बायकोच्या नावाखाली माझ्या आई वडिलांना मी दिवस-रात्र एकमेकांसोबत भांडताना बघितले आहे....... त्यांनी लग्न केले पण ते पण एकमेकांवर उपकार केल्यासारखे...... माझ्या लहानपणीचा एक पण दिवस मला आठवत नाही की , त्या दोघांनी प्रेमाने मला त्यांच्याजवळ घेऊन दोन प्रेमाचे शब्द बोलले असतील....... त्यांना त्यांच्या भांडण्यातून फुरसत मिळेल तेव्हा माझ्याकडे लक्ष जाईल ना....... माझ्या भविष्यासाठी एकमेकांना घटस्पोट न देण्याचे कारण त्यांना मिळाले होते परंतु त्यांच्यामुळे माझे भविष्य दिवसांवर अंधारातच जात होते....... त्या घरात राहण्याचाही मला कंटाळा आला होता....... रोज रोजची भांडण ऐकून माझा या लग्नावरून विश्वासच उडून गेला........ शेवटी कॉलेजच्या निमित्ताने मी कसेतरी त्या घरातून बाहेर पडलो आणि लांब निघून गेलो......... तिकडे माझी ओळख तुझ्यासोबत झाली आणि मला तुझ्यावर प्रेम झाले....... हे प्रेम असेच टिकून राहू दे लतिका , त्याला लग्नाचे नाव देऊन अशा भांडणात अडकून नको देऊ.......... उद्या परत आपल्या मुलाची ही अवस्था तसेच होईल जशी माझी झाली होती.......... " निरव त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत होता, पण ते ऐकून त्याच्या आई-वडिलांना मात्र खूपच वाईट वाटत होते.........
" तू माझ्या मुली सोबत प्रेम करतो तर तुला तुझ्यासोबत लग्न करावे लागेल. .... " लतिका चे वडील जागेवरून उठत त्याच्याकडे बघून बोलतात.......
" एक्सक्युज मी सर , आम्ही प्रेम करताना हे डिसाईड केलं नव्हतं की पुढे जाऊन आम्ही लग्न करणार...... माझा लग्न या गोष्टीवरच विश्वास नाही त्यामुळे सॉरी मला हे लग्न मान्य नाही...... आता तुम्ही जाऊ शकता....... " निरव लतिकाच्या वडिलांकडे बघून रोखठोकपणे उत्तर देतो.........
निरव चे बोलणं ऐकून लतिका चे वडील रागाने लतिका आणि आपल्या फॅमिलीला घेऊन निघून जातात.......
" बाबा आपण एकदा बोलण्याचा प्रयत्न तरी करू........ मला मग विश्वास आहे की, त्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे..... तो माझ्यासोबत लग्न करायला एक दिवस नक्की तयार होईल..... " लतिका आपल्या वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करत बोलते......
" आणि तो दिवस उजाडेपर्यंत आपण वाट बघत बसायची काय ? नाही लतिका एकदा तुझ ऐकून आम्ही प्रयत्न केला ना, पण तो मुलगा तुझ्यासोबत लग्न करायला तयार नाही त्यामुळे आता तुला आमच ऐकावे लागेल आणि आम्ही निवडलेल्या मुलासोबत लग्न करावे लागेल...... " लतिका चे वडील पण रागाने आपला निर्णय सांगून मोकळे होतात........ लतिकाचे निरव वर मनापासून प्रेम तर होते , पण तिला आपल्या आई-वडिलांनाही दुखवायचे नव्हते........ त्यामुळे ती पण त्यांचा निर्णय मान्य करते....... लतिका चे वडील त्यांच्या ओळखीतलाच एक मुलगा शोधून तिचे लग्न हि ठरवतात......
" निरव तू हे काय करत आहेस ? अरे , एवढी चांगली मुलगी तुझ्या आयुष्यात आली आहे आणि तू असा तिला जाऊ देतोय..... " निरवला आपली बॅग भरताना पाहून त्याचे वडील रागाने त्याच्याजवळ येऊन विचारू लागतात......
" मग काय करू .... माझाही तिच्यावर प्रेम आहे पण तिने माझ्यासोबत असंच राहावे ना....... लग्न करून त्या प्रेमाचा अंत करण्यापेक्षा असा अंत झालेला बरा....... " तिच्या लग्नाची बातमी मिळाल्यापासून निरव पण तिकडे न राहता बाहेर निघून जाण्याच ठरवतो आणि म्हणून त्याची बॅग भरत असतो.........
" निरव बेटा मी मान्य करते की , आम्ही आयुष्यभर एकमेकां सोबत भांडतच बसलो..... कधीही आपल्या मुलाला समजून घेण्याचा, त्याच्यासोबत थोडे क्षण घालवण्याचा प्रयत्न केला नाही...... आम्ही आमच्याच आयुष्यात असलेले काटे काढून टाकण्याचा प्रयत्न करत राहिलो पण देवाने त्याच आयुष्यात दिलेल्या या सुंदर फुलाकडे कधी लक्ष दिले नाही........ निरोप बेटा एकच सांगेल , आम्ही कधीच चांगले आई-वडील होऊ शकलो नाही पण म्हणून तुझ्या बद्दल वाईट विचार नाही करत......... सगळ्यात लग्नामध्ये असे घडते असे नाही, काहीजण प्रेमानेही एकमेकांची साथ देतात आणि मला माहित आहे माझा मुलगा प्रेमाने त्याच्या बायकोची साथ देईल...... " निरव ची आई त्याच्या जवळ बसून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत बोलते.......
" आई मला लग्न करायचं नाही आणि हा डिसिजन माझा फायनल आहे....... मी येतों..... " असे बोलून निरव आपली बॅग घेऊन निघून जातो........ निरव एअरपोर्टवर पोहोचतो...m.. त्याने आधीच तिकीट काढून ठेवल्यामुळे तो फ्लाईटची वाट बघत तिकडे बसलेला असतो......... त्याच्या मनात लतिकाचे विचार असतात....... प्रेम तर त्यानेही मनापासून केलेले असते...... फक्त लग्न या बंधनावर त्याच्या विश्वास नसतो, त्यामुळे त्याला स्वतःला बंधनात अडकून घ्यायचे नसते.........
" एक्सक्यूज मी बेंगलोरच्या या फ्लाईटची एक तरी तिकीट अवेलेबल आहे का मला अर्जंटली तिकडे पोहोचायचे आहे....... " एक व्यक्ती त्याच्यासमोरच तिकीट काउंटर वर घाईघाईने बोलताना त्याला दिसतो.......
" नाही सर आताच्या फ्लाईटच्या सगळ्या तिकीट बुक झालेल्या आहेत...... तुम्हाला नेक्स्ट लाईटची तिकीट मिळून जाईल..... " तिकीट काउंटर वर बसलेली मुलगी आदबीने त्याच्याकडे बघून बोलते.........
" नाही मॅडम मी पुढच्या फ्लाईटची वाट नाही बघू शकत मला खूप अर्जंट ली तिकडे पोहोचायचे आहे तुम्ही बघा ना काही होऊ शकत का ? " तो माणूस हळव्या स्वरात बोलू लागतो........ निरव त्याचा चेहऱ्यावर पसरलेली उदासी आणि टेन्शन पाहून एक नजर आपल्या हातात असलेल्या बेंगलोरच्या फ्लाईट तिकीट कडे पाहतो........
" एक्सक्यूज , मी तुमचे इतके काय महत्त्वाचे काम आहे ? " निरव त्या व्यक्तीचा चेहरा पाहून त्याच्या जवळ जाऊन विचारतो.......
" माझं प्रेम , माझी बायको ती तिकडे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे....... खूप सिरीयस कंडिशन मध्ये आहे , त्यामुळे मला काहीही करून लवकरात लवकर तिच्या जवळ पोहोचायचे आहे........ " तो व्यक्ती निरव कडे पाहून वेदनेच्या स्वरात बोलतो........
" ती तिकडे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे तर तुम्ही एवढी घाई करून काय उपयोग होणार आहे का ? " निरव नकारार्थी मान हलवत विचारतो......
" तू असा बोलू शकतो कारण तू आज पर्यंत कोणावर प्रेमच केले नाही....... कधी कोणावर प्रेम करून बघ...... जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती कोणत्या संकटात सापडते , तेव्हा तिच्याजवळ जाण्यासाठी जीव धडपड करू लागतो........ माझं प्रेम आहे माझ्या बायकोवर , पाच वर्षाचा संसार आहे आमचा...... या पाच वर्षात आम्ही कधीच एकमेकांची साथ सोडली नाही...... ती माझ्या प्रत्येक संकटात माझ्या पाठी खंबीरपणे उभी होती...... एक वर्षापूर्वीच तिला कॅन्सर झाल्याचे आम्हाला समजले , पण तरीही आम्ही एकमेकांना प्रेमाने सांभाळून घेतले....... या एका वर्षात तिला बरी करण्यासाठी मी दिवस-रात्र कष्ट केले, खूप मेहनत घेतली, तिच्यासाठी खूप डॉक्टरांना भेटलो सगळ्यांचे सल्ले घेतले....... ती मला आयुष्यात स्वतःसाठी जगण्याचा सल्ला देत होती...... पण माझं आयुष्य तिच्याजवळ गुरफटले आहे त्यामुळे तिच्याशिवाय दुसरा कुठलाही विचार करणे मला शक्य होणार नाही....... जोपर्यंत माझ्या अंगात टाकत आहे आणि माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी प्रयत्न करतच राहणार आताही तिची रिपोर्ट घेऊन मी एका डॉक्टरांना दाखवण्यासाठी इकडे आलो होतो , पण आता थोड्या वेळापूर्वीच मला फोन आला की, तिची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे......... म्हणूनच मला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर तिच्यापर्यंत पोहोचायचे आहे....... " तो माणूस आपल्या मनातल्या भावना निरोप कडे मांडू लागतो......
त्या माणसाचं बोलणं ऐकत असताना निरव च्या डोळ्यासमोर ही लतिकाचा चेहरा फिरत असतो...... त्याचे तिच्यावर असलेले प्रेम त्याला थांबण्याचा प्रयत्न करू लागते .... तिचेही लग्न झाल्यावर ती आपल्यापासून लांब निघून जाईल हे त्याचं मन ओरडुन त्याला सांगू लागते..........
" हे घ्या आत्ताच्या लाईटची तिकीट तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बायको जवळ जा. . . " निरव आपल्या हातात असलेली तिकीट त्याला देत बोलतो.........
" तुमचे खूप खूप आभार .. मला माहित नाही की तुम्ही कोणावर प्रेम केले आहे की नाही पण एवढे मागणे देवाकडे नक्कीच मागेन की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमचे प्रेम नक्की भेटू दे.... " तो माणूस निरवचे आभार मानून तिकडून निघून जातो......
निरपण तिकडून गाडी पकडून डायरेक्ट लटिकाच्या घराजवळ येतो..........
" लतिका माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे आणि या प्रेमासाठी जर तुला लग्न हेच बंधन पाहिजे असेल तर , मी तुझ्यासोबत लग्न करायला ही तयार आहे....... " निरव तिच्या घरी गेल्याबरोबर तिच्याकडे पाहून प्रेमळ स्वरात बोलतो...... त्याचं बोलणं ऐकून नक्की काही रडतच धावत येऊन त्याच्या मिठीत शिरते........
समाप्त
एक नवरा बायको भांडत असताना हे विसरून जातात की ते आता एक आई-वडीलही आहेत आणि त्यांच्या या भांडणाचे परिणाम आपल्या मुलावर ही पडू शकतात त्यामुळे त्याचा या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो........