Login

मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 1)

Social

मासिक पाळी , पर्व दुसरे(भाग 1) 

नमस्कार मी गीता सूर्यभान उघडे, 
माझ्या मासिक पाळी या कथेला दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार, 
आपला प्रतिसाद असाच राहो निरंतर हीच ईच्छा, 

एक महिला लेखिका म्हणून कथेचा विषय हा माझ्या खुप जवळचा व अनुभवातला होता, 
आणि प्रतिक्रिया वरून जाणवले की वेदनादायक देखील होता, 

मासिक पाळी पर्व दुसरे यामध्ये मी त्याच कथेचे एक दुसरे अंग तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे, 


अदिती एक हुशार, सुंदर सुशिक्षित मुलगी, 
स्वतः कमवणारी त्यामुळे स्वतः चे निर्णय स्वतः च घेते, 
आणि तिने जोडीदार देखील स्वतः च निवडला अर्थात काही अटी ठेऊन, 

जय व अदिती चे लग्न झाले, 
तसे दोघे पण एकमेकांना साजेसे 
फक्त अजय चे आई बाबा खेड्यात राहतात, 

जय चे 10 वि पर्यंत चे शिक्षण गावाकडेच झाले, पण पुढील शिक्षणासाठी तो शहरात आला, 

तो दिसायला देखणा, 
राहायला नीटनेटका 
पण त्याच्या कुटुंबाला ग्रामीण वलय होते, 

नेमकी हीच गोस्ट अदिती ला खटकायची, 
तिला वाटायचे जय शी लग्न करावे पण गावी राहणे नको, त्या लोकांशी संपर्क नको, लग्नकार्यात आलात संपर्क तर तोही कामपूरता, 

अशा काही अलिखित अटीवर तिने लग्न केले होते, 


लग्न करून नवी नवरी घरी आली, सर्वांनी कौतुक केले, 
स्वागत देखील त्यांच्या पद्धतीने छान केले पण अदिती च्या मनातील पूर्वग्रह तिला तिथे रुळू देत नव्हता, 

ती जय कडे दुसऱ्याच दिवशी 
पुण्याला जाण्याची मागणी करू लागली, 

तिने लग्नापूर्वी च अगोदरच्या नोकरी चा राजीनामा देऊन, पुण्याला नवीन नोकरी शोधली होती, 

ती अगोदरच खुप काटेकोर होती तिच्या 
भविष्याच्या बाबतीत,

अदिती ची पुण्याला जाण्याची घाई व घरातील लोकांचा देवदर्शनासाठी चाललेला अट्टाहास या दोघांमध्ये जय पूर्ण अडकून गेला होता, 

जय , तुला सांगून ठेवते मी हे देवदर्शन वैगरे काही मानत नाही, 
आपण उद्या पुण्याला जातोय व हे फायनल आहे, अदिती रागाने म्हणाली, 


अग पण घरी काय सांगू, 
आत्या मामा, ताई भाऊजी हे सगळे थांबलेत देवदर्शनासाठी व तसेही ही परंपरा आहे की नवीन नवरीला घेऊन देवदर्शनासाठी जातात, जय तिला समजावत म्हणाला, 


हे बग 
आपलं अगोदरच ठरलंय मी तुझ्या व घरच्यांच्या मध्ये येणार नाही पण या रूढी परंपरा हे सगळं खुप आऊट डेटेड आहे, 
तुला मानायचं तर तू मान पण मला फोर्स करू नको, 
Please 
ती तिचे उत्तर सांगून निघून गेली, 

जय ची खुप कोंडी झाली होती, 
त्याला कुणाला समजवावे हेच कळेना, 
एकीकडे घरातील लोक तर दुसरीकडे अदिती, 

त्यांचे जाऊ द्या ते अशिक्षित आहेत त्याना नाही जास्त जाण पण अदिती तर समजदार पणे वागू शकते ना, जय मनातल्या मनात म्हणाला, 

चल जय खुप हाऊस होती ना 
लग्न करायची आता भोगा, 


अदिती चिडून रूम मध्ये निघून गेली, 
रूम म्हणजे तरी काय फक्त दरवाजा नसलेल्या भिंती, 
गावाकडे असे प्रत्येकाला वेगळी खोली नसते, सगळ्यांनी एकत्र च राहायचं
असतं, 


अदिती ला प्रश्न पडतो हे असे सगळे एकत्र राहतात मग प्रायव्हसी चे काय, 
तिचे तर 12 च वाजत असतील इथे, जाऊ दे मला काय मला कुठे इथे राहायचे, 
असे म्हणून ती विषय सोडून देते, 


भावड्या ,............
ये भावड्या 

तुझ्या बायकोला सांग , 
उद्या दर्शनाला जायचय 
जरा लवकर उठ, 
केसांची चोपून येणी घाल व साडी घाल म्हणावं तेव्ह झगा नको, 
आजी एका दमात सांगून गेली, 


आजी ने असे आकाशवाणी करून सांगितले की अदिती आणखी चिडली, 

आता जय ची कसोटी होती, 

ये राणी, 
ऐक ना, 
फक्त एकदा च 
प्रॉमिस, 
एकदा का आपण पुण्याला गेलो मग तू म्हणशील ते मी ऐकेल पण please एकदा ऐक ना, 
जय 


ये बिल्कुल नाही, 
आता तर मुळीच नाही,
व मी आणि साडी घालू, विसर
अदिती , 

आता जय चे सर्व मार्ग खुंटले, 
होते, त्याला काय करावे काही कळेना, त्याला अदितीला दुखवयाचे देखील नव्हते व घरातील लोकांसाठी परंपरेला देखील तडा जाऊ द्यायचा नव्हता, 


तो त्याच्याच विचारात गुंतलेला असताना, 
अदिती अचानक हसत त्याच्या जवळ आली, 

अरे आता तर तोंडावर बारा वाजले होते ईंच्या व आता हसतेय, काय झालं असेल, कदाचित तिची चूक लक्षात आली असेल का तिच्या, 
नाही नाही इतक्या सहजासहजी बदल स्वीकारणार्यामधील नाही ती, 
मग काय झाले असेल, 
चल विचारून तर बघू, जय मनात विचार करतो ,


काय ग 
काय झालं 
का हसतेस, जय 


काही नाही देवदर्शनासाठी जायचे आहे ना , अदिती 


हो 
तू तयार आहेस, 
Thanks यार 
मला माहित होतं तू माझे नक्की ऐकणार, 

अरे हो हो थांब पूर्ण ऐकून तर घे, 
मी आले असते रे तू इतकं संजावलस  तर 
पण प्रॉब्लेम आला अरे आता, 
बग ना आता, पण तुम्ही सगळे जाऊन या आपण दोघे पुन्हा जाऊ कधी ती काहीच विचार न करता म्हणाली, 

जय मनातल्या मनात हिर्मुसुन गेला, ही खोटं तर नसेल बोलत ना, 
शपथ घ्यायला सांगू का तिला माझी .....
नाही नाही तिच्या स्त्रीत्वावर आरोप केल्यासारखे होईल ते, 

घरातील सगळे किती खुश आहेत , त्यांची तयारी देखील करून झाली असेल व आता त्यांना कळले जाणे कॅन्सल तर काय वाटेल त्यांना , 

जय विचार मग्न व अदिती खुश होती जाणे कॅन्सल म्हणून, 
तिला देवाचा कंटाळा होता असे नाही पण तिला ते वातावरण नको होते, साडी वेणी, तो डोक्यावरील पदर याचा तिला तिरस्कार होता, 

अदिती बोलून मोकळी झाली पण घरातील लोकांना जय ला सामोरे जायचे होते , 
त्यांचे प्रश्न 
त्यांचा गेलेला मूड 
त्यांची चिडचिड हे सगळं जय ला सांभाळावे लागणार होते, 

काय असेल अदिती च्या बोलण्यामाघील रहस्य खारेपना की खोटेपणा, 
फक्त थोड्या आकसापोटी ती करेल का तिच्या स्त्रीत्वाचा अपमान, जाणून घेण्यासाठी सोबत राहा आणि खुप साऱ्या लाईक व कमेंट्स करा त्या लेखनास प्रोत्साहन देतात 
क्रमशः ..........
धन्यवाद

🎭 Series Post

View all