मासिक पाळी (भाग 10)
(माघील भागात आपण पाहिले अदिती हे प्रेझेन्टेशन असते व ती त्यासाठी पाळी लवकर येण्यासाठी गोळ्या घेते)
आता पुढे ...........
अदिती ला तिच्या कामात कुठलीही अडचण नको असते
म्हणून ती पाळी लवकर येण्यासाठी गोळ्या घेते,
ती तिच्या कुठल्याही निर्णयामध्ये जय चे मत विचारत नाही,
ती त्याला सांगायची पण तिचे फायनल झाले की मग ,
आणि जय देखील त्यात नाक खुपसत नव्हता,
त्यामुळे त्यांचा संसार अगदी सुरळीत चालला होता,
अदिती पूर्ण आत्मविश्वासाने प्रेझेन्टेशन सादर करते,
सर्वाना ते प्रेझेन्टेशन आवडते व ती डील देखील होते,
अदिती च्या या यशामुळे ती आणखी खुश होती,
मी प्रत्येक गोस्ट करू हे आता तिला पक्के माहीत झाले होते,
घर नोकरी सांभाळताना तिची खुप ओढाताण होऊ लागली,
पण कोणत्याही ठिकाणी माघार घ्यायची नाही या तिच्या स्वभावामुळे ती शरीराचा विचार न करता दिवसरात्र काम करायची,
मी कुठेच कमी नाही हे तिला नेहमी सिद्ध करायचे असायचे,
आज अदिती ऑफिस वरून घरी आली, ती खुप थकलेली होती,
आता कुणीतरी मला चहा द्यावा अशी तिची ईच्छा होती,
पण चहा सोडा पाणी पण देण्यासाठी कुणी नव्हते,
घरात दोघे च असल्यामुळे तिसरी व्यक्ती कशी येणार ना,
अदिती चे अंग खुप कणकण करत होते, पोटही दुखत होते, हातपाय जड पडले होते, तिला कळून चुकले की आपली डेट जवळ आलीये म्हणून असे होत असेल,
सगळी कामे तशीच टाकून ती झोपी गेली,
आज त्या सुपर वुमन ला कुणाच्या तरी आधाराची गरज होती,
स्वबळावर सगळ्या जबाबदाऱ्या हिंमतीने पार पाडणारी ती आज तिच्या स्त्रीत्वा पुढे झुकली होती,
पण मी हरले हे तिला मान्य च नव्हते, म्हणून ती पुन्हा कामाला लागली जय येण्यापूर्वी सगळं व्यवस्थित झालं पाहिजे म्हणून,
तितक्यात तिला ऑफिस मधून कॉल येतो दोन दिवसांनी तुला दौऱ्यावर जायचे आहे,
तर तयार राहा,
आता काय करावं ऑफिस की घर,
स्वतः चा जीव की संसार
या विचारात अदिती पडली,
आता काय करू
आता तर माझ्या हातात इतका वेळही नाही की मी पाळी लवकर येण्यासाठी किंवा पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेऊ शकते,
पण मला ही संधी हाताने घालवायची देखील नाहीये,
खुप मेहनती ने आले मी इथपर्यंत व आता इथून माघे जायचं म्हणजे,
बिल्कुल नाही,
मी जाणारच,
पण मला एक कळत नाही,
पाळी तर मला लग्नापूर्वी पण येत होती मग मला तेव्हा त्रास का नाही झाला कधी?????
तेव्हा तर मी खेळायचे मस्त,
व मला आजही आठवते जेव्हा मी 10 वि ला होते, व आमची क्रिकेट ची फायनल मॅच होती व मला पाळी आली,
पण तेव्हा मला ते जाणवत देखील नव्हते, मग या नैसर्गिक गोष्टी चा मी आता इतका बाऊ का करते किंवा मला तिचा त्रास, तिची जाणीव, तिची अडचण का वाटते,
काही कळेना,
काय करू???
ती या विचारचक्रात अडकलेली असते , व तिच्या डोक्यात येते चल आई लाच विचारते,
काय वाटते तिला नेमके,
हॅलो आई , काय करतेस,अदिती
काही नाही ग बाळ बोल ना, आई
आई, मला अगोदर पाळी चा कधीच त्रास झाला नाही
मग आताच का होतो ???
अदिती
तिची आई हसायला लागली,
आई हसू नको ना ग सांग, अदिती ओरडत म्हणाली,
अग, अगोदर तुला ते चार दिवस फक्त आराम असायचा म्हणजे तू फिरायची खेळायची पण मर्यादित वेळेसाठी, व मला तर आठवते पाहिले दोन दिवस तू फक्त लोळत पडायची दिवसभर मलाच मागे लागावे लागायचे तुझ्या
उठ , अंघोळ कर, आवर, तयार हो,
आठवते का ???
आई
हो आई आठवते, अदिती,
मी तुला पालेभाज्या, सकस जेवण जेऊ घालायचे,
संध्याकाळी आठवणीने दूध द्यायचे, कधी कधी जर खुपच ओटीपोटात दुखू लागले तर तुला कोमट पाण्याची पिशवी द्यायचे,
तुला कधीच कुठलीही दगदग होईल असे काम करू देत नव्हते, आम्ही सगळे तुझ्या मनाने वागायचो,
त्यामुळे तुला कधी त्रास जानवलाच नाही,
पण आता लग्न झालं
तू वेळेवर जेवत नाहीस, घर व नोकरीमुळे तुझी ओढाताण होते,
त्यामुळे स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष न दिल्यामुळे तुझी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली,
त्यातच तुझी सगळी कामे तुलाच करावी लागतात,
इथे आवाज दिला की मी हजर
असायचे सेवेत,
पण आता तुलाच सगळं करावं लागतं,
त्यामुळे मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की तुझी चिडचिड होते,
आणि तुम्ही मुली हाताने कसल्याही गोळ्या घेऊन शरीराची चाळणी करून घेता,म्हणून तुला आता त्रास जाणवतो, आई
अदिती च्या डोळ्यात नकळत पाणी येते,
आई खरच तू किती केलेस ग माझ्यासाठी व मला कधी जाणवले देखील नाही,
अदिती
अग वेडाबाई मीच नाही हे प्रत्येक आई करते तिच्या वयात आलेल्या मुलींसाठी, आई,
अदिती ला आई शी बोलून छान वाटते, पण तीची मूळची समस्या अजूनही तशीच होती,
आता काय करू,
आता तिला वेदनाही जाणवत होत्या,
तितक्यात जय येतो,
आलास, अदिती
हो , ये खूप भूक लागली
जे असेल तर दे, जय
Please थोडा वेळ थांब आता बनून देते, अदिती
का ग ??
आवाज का खोल गेला बरं वाटतंय ना, जय
हो अरे, थोडं अंग कणकण करतंय,
ती डेट जवळ आलीये ना म्हणून होत असेल,
त्यात ऑफिस चे पण काम आले काय करावे कळेना,
अदिती
काय करावं म्हणजे,
त्यात काय विचार करतेस,
तुला बरं वाटत नसेल तर नको जाऊ ऑफिस ला त्यांना सांग सुट्टी पाहिजे,
आणी राहिला घरातील कामाचा प्रश्न तर ते मी करेल
जसे जमेल तसे तू फक्त आराम कर, जय
हे याचे माझ्यावरील प्रेम बोलतय की मला वेगळं बसवायचा प्लॅन आहे याचा,
ते काही नाही,
मला माझी हिम्मत जोडून ठेवावी लागेल,
काय विचार करतेस,
अग पटकन स्वीकार
व एक सांगू कदाचित हाच त्रास लक्षात घेऊन,
आजी आई व काकू ला वेगळं बसवत असेल, असे नाही का वाटत तुला, जय
झालं याच चालू,
मला तू शिकऊ
नको मी बघून घेईल माझे, तू जा फ्रेश हो
मी बनवते काही, अदिती
चालेल, तसेही तू कधी ऐकतेस म्हणून आज ऐकणार आहेस,
जातो मी, म्हणून जय निघून जातो,
अदिती ला त्रास तर होत होता व माघार पण घ्यायची नव्हती मग काय करूयात,
चल वेदनाक्षमक (पेनकिलर)गोळी घेऊन बघते,
हो तीच बेटर राहील व जय ला माहीत पण होणार नाही,
वा वा.........
अदिती तू खरच ग्रेट आहेस,
अदिती ने स्वतः च स्वतः ची पाट थोपटली,
अदिती जे करतेय ते योग्य होत का तिच्यासाठी,
की आणेल तिच्या जीवनात काही अडथळे,
जाणून घेण्यासाठी
सोबत राहा,
लाईक करा,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा