मासिक पाळी (12)
( माघील भागात आपण पाहिले जय व अदिती चा संसार पुन्हा पूर्वपदावर आला होता )
आता पुढे ..........
जय व अदिती आता पुन्हा गुण्यागोविंदाने नांदत होते, 
अशात सहा महिने निघून गेले, 
पण आणखीही गोड बातमी काही मिळाली नव्हती, 
अदिती आता या गोष्टी चे टेन्शन घेऊ लागली जर मी आई च होऊ शकत नसेल तर???
या धास्ती ने च ती खचली होती, 
म्हणजे न झालेल्या आजारावर उपचार काय करायचे हाच विचार ती करत असते, 
सतत विचार करणे, जॉब चे टेन्शन, यामुळे ती नेहमी नेहमी आजारी पडू लागली,
आता त्या दिवसात तिला जास्त त्रास जाणवत होता, 
कसेतरी करून अदिती तिचे रूटीन सांभाळू लागली, 
खुप दिवस झालेत जय व अदिती ला भेटले नाही म्हणून आज्जी त्यांना भेटण्यासाठी येतात,
अदिती ला बरे नसल्यामुळे अदिती देखील घरीच असते,
आजी ला समोर बघून 
ती दचकते , 
आजी अचानक कशा आल्या याचे तिला नव्वल लागते, 
त्यांना बसायला सांगून ती रूम मध्ये निघून जाते,
हॅलो , जय 
तू लवकर घरी घे, 
आज्जी आल्यात अचानक, 
तू काही पण कर पण ये मला प्रॉब्लेम आलाय अरे, व त्यात आज्जी आल्यात, 
त्याचे काहीच ऐकून न घेता अदिती फोन ठेऊन देते, 
अरे देवा, आता काय करू 
लपवून ठेऊ का त्यांच्यापासून की सांगू त्यांना काय करू, 
पण त्यांना जर सांगितले तर घरात ठेवतील चार दिवस, मग ऑफिस चे बारा वाजतील , 
व पुन्हा तेच इकडे हात लावू नको व तिकडे हात लावू नको , 
काय करू, 
आई ला विचारू का?? 
की आशु ला ??? 
पण त्या काय सांगणार फेस तर मला करावे लागेल ना, 
खोटं बोलू का ?? 
पण त्यांच्या भावनांचे काय त्या दुखावल्या जातील, 
अदिती, ये पोरी कुठे गेलीस, 
भायर ये ,आजी 
हो आले, अदिती
मला इथे अस बसून तू कुठं गायप झाली, आजी
ते आजी , मला करायचं नाही आहे,
हाव का ?? 
बर बर मला दाखव सगळं मी करते, आजी 
पण आजी , तिने बोलणे मधेच तोडले,
मी करते ग, आजी
आजी ने सगळी काम आवरली
तितक्यात जय देखील आला, 
आजी ला बघून तो खुश झाला, व आजी ने स्वयंपाक केलाय म्हणल्यावर मोठ्या आनंदाने जेवायला बसला, 
आजी ने सर्वाना जेवायला घेतले, 
अदिती तिच्या रूम मधेच होती 
तिला बाहेर यावं की नाही कळेना, 
तेवढ्यात तिला आजी नि आवाज दिला अदिती तू पण ये, 
अरे, मी पण चक्क, 
म्हणजे मला तिथे येऊ देणार, 
अदिती पाऊले चोरत चोरत 
त्यांच्या जवळ आली, 
तिच्यासाठी हे अनपेक्षित होते, 
आजी ने तिच्यासाठी ताट केले व तू जय च्या बाजूला एक खुर्ची सोडून बस अस म्हणाल्या,
जय साठी देखील हे अनपेक्षित होत,
पण ते दोघेही काही बोलले नाही, 
अदिती ला कसला तरी त्रास होत होता, तिचे जेवणाकडे लक्ष च नव्हते, तिने दोन घास खाऊन, ताट ठेऊन दिले, 
का ग, जेवत नाहीस, आजी
काही नाही, भूक नाही मला, अदिती
पण अदिती चा सुकलेला चेहरा आजी ने हेरला होता,
आजी नि सगळं आवरलं, 
अदिती ला बघून येऊ म्हणून त्या तिच्या रूम कडे जातात,
अदिती ला  ताप आलेला असतो,
हे आजी ला जय कडून समजते, 
अदिती ला ताप आला हे समजताच , आजी तिच्या बाजूला जाऊन बसतात, तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात,
अदिती ला तो फिरणारा हात खुप छान वाटतो पण तो अदिती चा आहे हे समजताच 
ती पटकन उठून बसते, 
आजी तुम्ही, अदिती
हो , मग काय झालं , आजी
तुम्ही मला स्पर्श केलात, अदिती 
 
हो , आजी 
पण आजी तुम्ही तर विटाळ मानतात ना मग ,अदिती
हे बग आम्ही विटाळ मानतो, म्हणजे ती स्त्री काही वाईट झाली तिला रोग झाला, असे नाही, 
अग पूर्वीच्या काळी स्त्री ला खुप काम करावं लागायचं , कधी कधी तर खुप सासुरवाशीनीना पोटभर जेवण देखील  मिळत नव्हत,  
त्यांना घरातील पुरुष जेवले की उरलेले अन्न दिले जाई,
त्यांना दळण दळणे पाणी भरणे, असे घरातील खुप जड कामे करावी लागे,आणि या दिवसात स्त्री ला जास्त त्रास होतो व या कामाचा आणखी भार, म्हणून पाळी ला विटाळ मानून , त्या स्त्री ला थोडा आराम दिला जातो, पण मुळात पाळी म्हणजे वाईट किंवा रोग नाही तर ती एक क्षमता असते नवनिर्माणाची 
 आजी चे बोलणे ऐकून जय व अदिती फक्त बघतच राहिले, 
त्यांना त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता,
असेल का ही बदलाची नांदी ???
जाणून घेण्यासाठी भेटू पुढील भागात,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा