Login

मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 13)

Social

मासिक पाळी (13) 

(माघील भागात आपण पाहिले आजी अदिती ला समजावत होत्या की आम्ही विटाळ मानतो म्हणजे आम्ही त्या स्त्री ला रोग झाला असे नाही समजत तर तिच्या शारीरात होणारे बदल तिला अगोदरच खुप त्रासदायक असतात
त्यात आणखी त्रास नको, 
तिला आराम मिळावा म्हणून तिला आम्ही वेगळं बसवतो) 


आता पुढे .......................

आजी चे बोलणे व वागणे जय व अदिती ला अनपेक्षित होते, ते फक्त आजीकडे बघत राहिले, 

तेवढ्यात आजी कडाडल्या 
अरे भूत बघितल्यासारखे नका बघू माझ्याकडे, 

त्या दोघांनी मान खाली घातली, 

चल ये माझ्या समोर, आजी अदिती ला म्हणाल्या , 


आता काय करतील आजी, 
अदिती विचारात पडली, 

तेल लावून देते झोप येईल तुला पटकन, 
आता या तेलाचा पाळीशी काहितरी संबंध आहे का, 
अदिती हा विचार करून मनातल्या मनात हसली, 
पण आजी चा हुकूम होता, 
म्हणून ती खाली बसली, 

एक काम कर मीच येते वरती, 
असे म्हणून आजी तिच्या जवळ बसल्या, 

आजी तिला तेल लावून देत होत्या व थोड्या वेळाने तिला खुप झोप आली, 
तिला झोप येतेय हे कळताच आजी म्हणाल्या आता पड तू, 


लाईट बंद करून त्या निघून गेल्या , 
अदिती ला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली होती, 
आजी नि सगळी कामे आवरून ठेवली होती, अदिती तिचे आवरून खाली आली, 


आलीस बस , खायला देते, आजी 

अदिती ला काय बोलावे कळेना, 
तिने गुपचुप नाष्टा केला, 
व आजी जवळ बसली, 

आजी, आता मी वेगळी बसलेली नाहीये तरी तुम्ही च काम करताय मला कसे तरी वाटतेय, अदिती


असू दे, माझे म्हातारपणी तुलाच करायचे आहे, आजी म्हणाल्या, 


अदिती चारही दिवस घरीच राहिली, 
आजी सोबत तिचा वेळ मस्त जात होता, 
आता त्या दोघी मध्ये छान बॉंडिंग झाली होती, 

त्यांच्या ओरडण्यातील प्रेम, 
प्रश्नां माघील काळजी अदिती ला जाणवू लागली होती, 
आता ती लवकर घरी येऊ लागली, 
आजी करून वेगवेगळे पदार्थ शिकू लागली, 
तिला आजी च्या बटव्यातील खुप गोष्टी कळू लागल्या, 
तिला प्रत्येक गोष्टीमाघील सायंटिफिक रिजन कळतं होत, 
तिला आजी ला रोज त्यांच्या आठवणी सांगायला लावायची व ती त्या मस्त एन्जॉय करायची 
एखाद्या कथेप्रमाणे ती ऐकायची, 


जय ला देखील अदिती मध्ये झालेला बदल आवडला होता , 
प्रत्येकवेळी ,
तुझ्या  घरचे असे तुझ्या घरचे
तसे असे म्हणणारी अदिती आता आपल्या घरचे म्हणू लागली, 

आजी ला घाबरणारी अदिती आता जय ला बोलणे घालण्यासाठी आजी कडे हट्ट करू लागली, 

आजी ला बाजारात घेऊन जाणे, 
मंदिरात घेऊन जाणे, 
फिरायला नेणे हे काम ती आवडीने करू लागली, 

एकदा आजी व अदिती स्वयंपाक करत असतात, 

आजी, खरं सांगू तुम्ही आलात तेव्हा मी मनात म्हणाले तुम्ही उगाच आलात पण आता कळतंय तुम्ही घरात आलात व घराला घरपण आले, 
आम्ही दोघे च होतो 
पण तुम्ही तिसऱ्या सामील झालात व आयुष्यात आनंद आला, अदिती 

हो का, मग कायमचा तिसरा येऊ द्या आता, 
आजी 

म्हणजे पाळणा हळू दे, आजी 


आजी नि आता तिच्या मर्मावर बोट ठेवलं होतं, 
ती अचानक शांत झाली, 
तिला काय बोलावे ते कळेना,
ती बावरली हे आजी ला कळले, 

काय ग काय झालं, 
नजर का चोरलीस, 
काही कुटाणे केले की काय, आजी 


कुटाणे नाही केले 
पण मला राहत नाही आहे,अदिती

अरे देवा, आमच्याकडे देवाला नवस बोललं तरी लेकरं होतात, मग तुमच्या विज्ञानामध्ये काही नाही का, आजी 


तसे नाही आजी पण मी जास्त मनावर नाही घेतले, अदिती 


तरी पण आपण जाऊ डॉक्टर कडे, आजी 

आपली लाडक्या नातसुनेला आजी आता डॉक्टर घेऊन जाणार आहेत, 

बघुयात काय आहे अदिती च्या नशिबात,

क्रमशः .........

🎭 Series Post

View all