Login

मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 14)

Social

मासिक पाळी (भाग 14) 

(माघील भागात आपण पाहिले आजी अदिती ला डॉक्टर कडे घेऊन जाणार होत्या आता पुढे ...................

आज आजी लवकर उठल्या, 
त्यांनी स्वतः चे आवरले, 
आता अदिती देखील आजी प्रमाणे वागायला शिकली होती,
जास्त नाही पण थोडी का होत नाही ती आजी चे अनुकरण करत होती, 
तिने व आजी ने मिळून सगळं आवरून घेतले, 

मी ऑटो बोलावू का??
अदिती 

का तुला आहे ना ती गाडी तिच्यावर जाऊ, आजी 

पण तुम्हांला बसता येईल का??
अदिती 

मग न बसता यायला काय झालं, 
मी तुला धरून बसेल ना 
तुला चालेल ना, 
आजी 


काही पण काय विचारता आजी 
चालेल, उलट तुम्ही मला घट्ट धरून बसा काही हरकत नाही, अदिती 


यांचे बोलणे जय ऐकत होता त्याला छान वाटले ऐकून 
तो मनात समाधान मानून निघून गेला, 


इकडे आजी व अदिती डॉक्टर कडे पोहोचल्या, त्या नंबर ची प्रतीक्षा करत बसलेल्या असतात तेवढ्यात त्यांचा नंबर येतो, 

चला आला एकदाच अदिती म्हणते, 

त्या दोघी आतमध्ये जातात, 
फक्त जाऊन बसत नाहीत तोच एक बाई डॉक्टर जवळ  येते,
आणि त्यांच्या हातातील पेन खाली ठेवत त्यांना हाताला धरून थोडे आडोशाला घेऊन जाते,
10 मिनिटं नंतर त्या डॉक्टर बाहेर येतात व ती बाई निघून जाते, 

आजी व अदिती ला प्रश्न पडतो, 
एवढी मोठी डॉक्टर व ही बाई दिसायला साधी , आणि मॅडम नि पण तिचे ऐकलं व तिच्यासोबत गेल्या,

काय झालंय तुम्हांला, मॅडम 

आता काय झाले म्हणजे काय सांगू 
असे कसे सांगू की मुलं होत नाही, त्या मलाच रागावतील काय केलं किंवा अजून कुठे जास्त दिवस झाले लग्नाला, अदिती विचारात पडते,

तितक्यात आजी म्हणतात, मॅडम 
तिला खुप थकवा येतो, 
गळून जाते ती व त्या चार दिवसात तर तिला जीव नकोसा होतो, 
बघा ना कशी बारीक झालीये, आता मुलं ठेवायचं म्हणते पण आई निरोगी असेल तर बाळ निरोगी होईल ना, 
ही अशी नेहमी नेहमी आजारी पडते, मग त्या बाळाचे काय होईल 
म्हणून आलोय, 
तपासण्या करायला पुढे काही अडचण नको म्हणून, 


अरे वा, आजी नि कमी शब्दात माझ्या मनातील किती सहज मांडले, मी असेल डबल ग्रॅज्युएट पण आज आजी मला भारी भरल्या होत्या, 
काय झालंय तुम्हांला , मॅडम च्या या एका वाक्याने स्वतः ला खुप हुशार समजणारी मी गोधळून गेले 
पण आजी ने मोजक्या शब्दात सगळं कसं व्यवस्थित मांडले, 
खरच आजी ग्रेट आहेत, अदिती मनातल्या मनात म्हणाली, 


मॅडम च्या बोलण्याने मी भानावर आले, अगोदर माझ्या प्रश्नांची उत्तरे दे, 
कधी कुठल्या गोळ्या घेतल्यास का?? 

मूल होऊ देण्यासाठी मानसिक व शारीरिक तयारी आहे का?? 

ती  फक्त हो म्हणाली कारण दोनी प्रश्नांची उत्तरे हो च होती, 


तिने हळूच आजीकडे पाहिले, 
माझ्याकडे नको बघू सगळं खरं खर सांग, आजी म्हणाल्या, 


हो म्हणजे, 
कधीतरी पाळी लवकर येण्यासाठी किंवा उशिरा येण्यासाठी किंवा त्रास कमी होण्यासाठी, मी गोळ्या घेत होते, 
पण आता बंद केल्यात, 
अदिती 


मॅडम अदिती कडे बघत म्हणाल्या , आता त्या बाई आल्या होत्या ना त्या माझ्या सासूबाई आहेत, गावाकडे असतात पण आता मला दिवसगेलेत म्हणून त्या इथे आल्यात मी माझी काळजी घ्यावी म्हणून आता त्यांनी मला हक्काने दूध दिले व मग त्या गेल्या, मी त्यांना नाही सांगू शकत होते पण मी तुम्हांला बसवले व अगोदर दूध घेतले, 


तू नेमकी इथेच चुकली , 
तुम्ही मुली काय करता, मुली च नाही तर खुप स्त्रीया देखील करता, 
काही सण असेल, 
कार्यक्रम असेल, 
बाहेर कुठे जायचे, 
ऑफिस चे काम आहे, 
प्रत्येकवेळी स्वतः ला काहीतरी कारण सांगून पाळी पुढे ढकलण्यासाठी किंवा लवकर येण्यासाठी गोळ्या घेता, 
पण तुम्ही याच्या परिणामाचा विचार च करत नाही, ती 28 दिवसाची एक साखळी असते जर तुम्ही तिला छेडले तर नुकसान तर होणारच ना, 
मग ब्लिडिंग न होणे, किंवा जास्त ब्लिडिंग होणे, लवकर न येणे किंवा खुप लवकर म्हणजे 15 दिवसात येणे , गर्भ न राहणे, राहिला तरी न टिकणे अशा अनेक अडचणी येतात,
तुमचे शरीर म्हणजे खेळणं नाही 
त्याला जपा त्याची काळजी घ्या, 
कारण ही जी झीज होते ना ती कधीच भरून न येणारी असते, 
त्यामुळे तू अगोदर सकस आहार घे 
भरपूर पाणी पीत जा, 
तुझी स्वतः ची रोगप्रतिकारक शक्ती वाढव तर तू निरोगी मूल जन्माला घालू शकते, 
तुम्ही नोकऱ्या करा, आधुनिक राहा पण स्वतः ची काळजी घ्या, 
तुमच्या शरीराला खेळणं समजू नका, 
आताच नाही तर भविष्यात कधीच अशा गोळ्या खायच्या नाहीत, 
यामुळे तुला मुल होणारच नाही असे नाही म्हणत मी पण यामुळे तुझ्या शरीराचे न भरून येणारे नुकसान होईल हे नक्की,

यादिती च्या मनातील खुप साऱ्या संकचे निरसन झाले होते,
मॅडम च निरोप घेऊन ती व आज्जी घराकडे निघाल्या, 
क्रमशः ...............

🎭 Series Post

View all