Login

मासिक पाळी पर्व दुसरे(भाग 15 अंतिम )

Social

मासिक पाळी ( भाग 15) 


माघील भागात आपण पाहिले मॅडम शी बोलून अदिती च्या सगळ्या शंकांचे निरसन झाले होते, 
मॅडम चा निरोप घेऊन ती व आजी घराकडे निघाल्या, 

आता अदिती च्या मनात कुठलाही गोधळ नव्हता, 
ती शांत वाटत होती, 


त्या दोघी घरी पोहोचल्या , 
आजी च्या हातात पाणी देत 
अदिती आजीला बिलगली 
ये पोरी हळू 
पाडशील म्हतारीला, आजी म्हणाल्या, 


नाही पाडत, अदिती 

आजी एक सांगू , अदिती 


बोल ना,आजी

 तुम्ही नका जाऊ ना गावाकडे,अदिती 


आजी तिच्याकडे बघत 
तुला कोण म्हणाले मी गावाकडे जाणार आहे, 
आता मी बाळ घेऊनच घरी जाईल, 
व तसेही च्याकडे देवाला नवस बोललं तरी लेकरं होतात,
आता दोघीही हसू लागल्या, 


चल मी पडते थोडी, 
व तू स्वयंपाक कर व नीट कर, आजी 


हो , आजी झोपा 
तुम्ही बघा किती भारी करते, अदिती 


आजी निघून जातात, 

अदिती विचार करू लागते, 
खरच प्रत्येक नाते किती सुंदर असते ना फक्त त्या नात्यांना उलगडण्यासाठी वेळ द्या, 
त्यांना त्यांचा स्पेस द्या, 
जर तेव्हा जय चे ऐकले नसते व या लोकांशी संबंध तोडले असते तर आज मला या कठीण परिस्थितीत कुणी साथ दिली असती, 


आता अदिती चे रूटीन छान चालू झाले होते, 
ती जय व आजी बरोबर स्वतः ची देखील काळजी घेत असते, 

काही दिवसांनी जय व अदिती गोड बातमी देतात, 
ती बातमी ऐकून आजी ला इतका आनंद होतो, की तो शब्दांत मांडणे कठीण आहे, 

खरच स्त्री च्या आयुष्यातील इतका गरजेचा विषय स्त्रीया किती सहजपणे हाताळतात ना, 

एक लेखिका म्हणून ही कथा लिहणे सोपे नव्हते, 
पण ही कुठलीही काल्पनिक कथा नसून , फक्त शेवट काल्पनिक केलाय , नाहीतर या मासिक पाळी न येण्यामुळे मूल होणं तर दूर ,
पण एका स्त्री ला तिचा पती देखील वाटून घ्यावा लागला वंशाला दिवा देण्यासाठी, 
तिचे पूर्ण आयुष्य बदलले या मासिक पाळी मुळे ,
त्यामुळे तुम्ही तुमच्या स्त्री स्त्रीत्वाला जपा, 
कारण शरीराची एकदा झालेली झीज पुन्हा भरून येत नाही, 

स्त्री च्या आयुष्यातील इतका नाजूक विषय 
पण आपण त्याला त्या नाजूकपणे 
हाताळतो का???

आपण सर्रास 
काही सण असेल घे गोळी 
काही कार्यक्रम आहे घे गोळी 
बाहेर जायचे घे गोळी 
पण या गोळ्या शरीराची चाळणी करतात हे आपण विसरून जातो, 


या कथेतून बोध घेऊन कथा वाचणाऱ्या स्त्री वर्गानी स्वतः ची काळजी जरी घेतली तरी माझी कथा सार्थकी लागेल, 
कारण B
तू पाया आणी  कळस आहेस तुझ्या घराचा , 
पण स्वतः ची काळजी घेतली तरच हा पाया मजबूत आणि कळस डौलाने झळकेल,

@कथा आवडल्यास नक्की कळवा, 
धन्यवाद

🎭 Series Post

View all